Breaking News

Ramprahar Team

शिपिंग क्षेत्रात आर्थिक फसवणूक; ‘सिफेरर्स’चे राज्यपालांना निवेदन

पनवेल : वार्ताहर शिपिंग क्षेत्रात नोकरीचे आमिष दाखवून अनेक तरुणांची आर्थिक फसवणूक केली जाते. याबाबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लक्ष घालून योग्य मार्गदर्शन करावे व उपाय योजना करावी, अशी मागणी ऑल इंडिया सिफेरर्स युनियनच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन केली आहे. या वेळी ऑल इंडिया सिफेरर्स युनियनचे अध्यक्ष संजय वासुदेव …

Read More »

चिपळूण येथील पूरग्रस्तांना जिजाऊ संस्थेची मदत

माणगाव : प्रतिनिधी येथील जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे पथक चिपळूण येथील पूरग्रस्त भागात गेले असून, तेथे त्यांचे मदतकार्य सुरू आहे. हे पथक पुरग्रस्तांना जीवनाआवश्यक साहित्याचे वाटप करणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी दिली. चिपळूणच्या पुरग्रस्त भागात मदतकार्य करण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे पथक गेले असून, त्यांच्या सोबत पाच …

Read More »

खोपोली नगरपालिकेकडून मालमत्ता कर वाढीचा निर्णय मागे

खोपोली : प्रतिनिधी चालू आर्थिक वर्षासाठी खोपोली नगरपालिका प्रशासनाकडून मालमत्ता कर वाढीचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला नगरसेवक आणि नागरिकांनी विरोध दर्शविला होता. त्याची दखल घेत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी मालमत्ता कर वाढीचा निर्णय मागे घेण्याच्या सूचना मुख्याधिकारी गणेश शेटे यांना दिल्या.  खोपोली नगरपालिका प्रशासनाने मालमत्ता कर वाढीचा निर्णय घेतला …

Read More »

महापुराने डोंगराची माती शेतात घुसल्याने भातशेती उद्ध्वस्त

शेतात भाताच्या रोपाऐवजी माती आणि दगड कर्जत : बातमीदार अतिवृष्टीमुळे कर्जत तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतांमध्ये पुराच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणावर दगड आणि माती वाहून आल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. कर्जत तालुक्यातील किमान तीन हजार हेक्टर जमिनीवरील भातपिके मातीत गाडली गेली आहेत. कर्जत तालुक्यात सतत तीन दिवस …

Read More »

समर्थांची पंढरपूरवारी

दासगाथेच्या अखेरिस 1372 व्या ओवीमध्ये समर्थांनी तुम्ही आम्ही रामदास एकचि। देव एकचि हा नाना वेषधारी। रे सखया। लटिके म्हणसी तरी तुझा देव। माझा होऊनी मज हृदयी धरी। रे सखया॥ असे म्हणून विठ्ठलभक्तीची अनुभूतीच प्रकट केली आहे. समर्थांनी बाडांक 1497 मध्ये श्रीविठ्ठल प्रेमदर्शक एक सुंदर अप्रतिम अभंग रचला आहे. वैकुंठीचा राणा …

Read More »

शिक्षणाचा खेळखंडोबा

गेले जवळपास दीड वर्ष देशात शाळा बंद आहेत. अनेक भागांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्तरातील मुलांनी शाळा सोडण्याचे प्रमाण वाढते आहे. निव्वळ शिक्षणासाठी नव्हे तर विद्यार्थ्यांच्या मनावरील महासाथीचे परिणाम दूर करण्याकरिता शाळा सुरू व्हायला हव्यात. अर्थात इतक्या सखोल विचाराची अपेक्षा गोंधळयुक्त कारभार करणार्‍या आघाडी सरकारकडून आपण करू शकतो का? देशात कोरोना अवतरल्यापासून …

Read More »

वरातीमागून घोडे नाचवण्याचा फायदा नाही

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा घणाघात मुंबई : प्रतिनिधी अनेक दिवसांपासून महाराष्ट्रावर दरडींनी घाला घातल्याचं चित्र पाहायला मिळालं असून अजूनही पुनर्वसन असो किंवा मदतीबाबत राज्य सरकारकडून कोणताही दीर्घकालीन निर्णय घेण्यात आला नाही. लोकांसाठी  पुनर्वसनाच्या योजना अनेक आहेत प्रश्न केवळ तत्काळ अमलबाजावणीचा आहे. पैशांची कमी नाही, योजनांची कमी, नाही केवळ राज्य …

Read More »

उरणमधील आदिवासींना मदतीचा हात

उरण : वार्ताहर शासनाच्या खावटी योजने अंतर्गत उरण तालुक्यातील बेलवाडी सारडे, पुनाडे वाडी, जांभूळपाडा वाडी, जासई वाडी येथील कातकरी वाडीवर धान्यवाटप करण्यात आले. उपस्थित सर्व शिक्षकवर्गाने अगदी पद्धतशीरपणे सर्व आदिवासी बांधवांना धान्याचे वाटप करून त्यांची योग्य प्रकारे ऑनलाईन नोंदणी देखील करून घेतली. या वेळी बेलवाडी सारडे कातकरी वाडीवर सामाजिक कार्यकर्ते …

Read More »

पूरग्रस्तांसाठी भाजपचा पुढाकार

विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या उपस्थितीत कोकणात मदत रवाना मुंबई ः प्रतिनिधी कोकणातील पूरग्रस्तांसाठी मुंबई भाजप आणि युवा मोर्चाच्या वतीने मंगळवारी (दि. 27) जीवनावश्यक वस्तू रवाना करण्यात आल्या. माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मदतीच्या साहित्याची वाहने कोकणाकडे मार्गस्थ झाली. अतिवृष्टीमुळे कोकणात अनेक ठिकाणी पूर येऊन …

Read More »

कळवळ्याचा काँग्रेसी कावा

काँग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी चक्क ट्रॅक्टर चालवत संसद भवनाकडे कूच केले. मोदी सरकारने आणलेल्या कृषी सुधारणा कायद्यांच्या विरोधात त्यांनी अभिनव आंदोलन छेडले असा त्यांचा दावा आहे. ट्रॅक्टरवरून संसदेत येण्यामध्ये अभिनव असे काय आहे हे काँग्रेसजनच जाणोत. शेतकर्‍यांबद्दल प्रामाणिक कळवळा असता, तर गांधी यांनी सध्या सुरू …

Read More »