अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग शहराला लागून असलेल्या चेंढरे येथील कृष्ण महल इमारतीत पहिल्या मजल्यावर असलेल्या ब्युटीपार्लरमध्ये मंगळवारी (दि. 20) संध्याकाळी अचानक आग लागली. थोड्याच वेळात आगीचा भडका उडाला आणि या आगीत पार्लरमधील फर्निचर जळून खाक झाले. इतर वस्तूंनाही आगीची झळ पोहचली. सुरुवातीला तिथे हजर असलेल्या नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, …
Read More »विद्युत ग्राहकांना नुकसानभरपाई द्या
मोनिका महानवर यांची मागणी; कळंबोलीत विजेच्या अति दाबामुळे उपकरणे निकामी कळंबोली : प्रतिनिधी महावितरणाच्या अति विद्युत प्रवाहाच्या दाबामुळे कळंबोलीतील एलआयजी सेक्टर 1 या परिसरातील अनेक रहिवाशांची विद्युत उपकरणे निकामी झाल्याने याबाबत महावितरण यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. तसेच याबाबत तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी नगरसेविका तथा सभापती महिला व …
Read More »…तर आम्हाला त्याचा विचार करावा लागेल
नाना पटोलेंचा शिवसेनेला इशारा मुंबई : प्रतिनिधी सोबत राहूनही वारंवार त्याच त्याच गोष्टी बोलल्या जात असतील, तर मात्र आम्हाला त्याचा विचार एकदा करावा लागेल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवेसेना दिला आहे. शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातील अग्रलेखात काँग्रेस पक्षावर भाष्य करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान …
Read More »ऑडिशन्सच्या आमिषाने पोर्नोग्राफी
राज कुंद्राच्या डर्टी पिक्चरची मुंबई पोलिसांनी सांगितली स्टोरी मुंबई : प्रतिनिधी पॉर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेल्या उद्योगपती राज कुंद्रा प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने पत्रकार परिषद घेत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तसेच राज कुंद्रा यांची कंपनी तरुणींना फसवून त्यांच्याकडून अश्लील व्हिडिओ बनवत असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पॉर्नोग्राफिक कंटेण्टप्रकरणी क्राईम ब्रांचने …
Read More »कर्जतमध्ये घरफोड्या करणार्या पाच आरोपींना बेड्या
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार घरफोड्या करणार्या अट्टल पाच आरोपींना कर्जत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी आठ घरफोड्या केल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी त्यांच्याकडून दोन लाख 55 हजार 900 रुपयांचा माल हस्तगत केला आहे. कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथील आय. पी. मार्केटिंग कंपनीच्या कार्यालयाच्या खिडकीचे ग्रील उचकटून अज्ञात चोरट्यांनी संगणक संच व …
Read More »कर्जत भाजप महिला मोर्चा उपाध्यक्षपदी अॅड. प्रिती तिवारी
कर्जत : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या कर्जत मंडल महिला मोर्चा उपाध्यक्षपदी अॅड. प्रिती तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आदेशानुसार कर्जत तालुका महिला मोर्चा अध्यक्षा स्नेहा गोगटे यांनी अॅड. प्रिती तिवारी यांची कर्जत मंडल महिला मोर्चा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. आमदार प्रशांत …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांच्याकडून रोठ ब्रु. ग्रामपंचायतीला औषधे वाटप
धाटाव : प्रतिनिधी कोरोना तिसर्या लाटेची शक्यता निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार रविशेठ पाटील यांच्या वतीने करोना प्रतिकारशक्तीवर्धक औषध वाटप सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमदार रविशेठ पाटील यांच्यातर्फे रोठ बुद्रुकचे सरपंच नितीन वारंगे यांच्याकडे प्रतिबंध औषधे सुपुर्द करण्यात आली. रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीला आमदार रवीशेठ पाटील त्यांनी …
Read More »उरणकरांचे पाणी कपातीचे संकट टळले
रानसई धरण ओसंडून वाहू लागले उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील नौदल शस्त्रागार, उरण शहर आणि काही गावांना पाणी पुरवठा करणारे रानसई धरण दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाची भर पडून ओसांडून वाहू लागले आहे. त्यामुळे उरण वासीयांचे पाणी संकट टळले आहे. उरण तालुक्यात दिवसेंदिवस नागरी वस्ती ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. …
Read More »मुसळधार पावसाचा एपीएमसीला फटका
ग्राहक नसल्याने माल पडून नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईसह मुंबई उपनगरात सलग दोन दिवसांपासून पडणार्या मुसळधार पावसाने वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा, फळे, भाजीपाला आणि धान्य बाजारांत मुंबईतील ग्राहक फिरकले नसल्याने बाजारात शुकशुकाट होता. भाजीपाला व फळ बाजारात शेतमालाची आवक जास्त आहे, मात्र बाजारात ग्राहक नसल्याने …
Read More »विठूमाऊलीच्या गजराने भक्तीचा सोहळा
19 हजार 709 भक्तांनी घेतला लाभ पनवेल : रामप्रहर वृत्त ’विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा’ या अभंगाच्या ओळींप्रमाणे लेकुरवाळ्या असणार्या विठुरायाला भेटण्याचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे लाखो भक्तांची वारी होऊ शकली नाही. लेकराला आईपासून दूर केल्यानंतर त्याची जी अवस्था होते तीच वारकर्यांची अवस्था झाली, परंतु …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper