वारकरी आणि विहिंपचे पनवेल तहसीलदारांना निवेदन पनवेल : साहिल रेळेकर विश्व हिंदू परिषद आणि वारकरी संप्रदाय पनवेल प्रखंड यांच्या वतीने पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांना शनिवारी (दि.17) विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी महाराष्ट्रातून लाखो वारकरी पायी पंढरपुराला जात असतात, मात्र गेल्या वर्षापासून कोरोनामुळे सर्वांनीच समजुतदारपणे पायी वारीचे …
Read More »कोरोनाने हिरावला रोजगार
रानभाज्यांना नाही उठाव; पालीत आदिवासी भाजीविक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत पाली : प्रतिनिधी पावसाळ्यात रानावनात उगवणार्या रानभाज्या विकून सुधागड तालुक्यातील असंख्य आदिवासींच्या घरातील चुली पेटतात. मात्र कोरोनाचे सावट व लॉकडाऊन यामुळे सध्या या रानभाज्यांना उठावच नाही. त्यामुळे धंदा निम्म्याने कमी झाला आहे, असे पालीत बहुसंख्य आदिवासींनी सांगितले. परिणामी आदिवासींचा रोजगार हिरावला गेला …
Read More »महाडमधील अडीच हजार विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत
महाड : प्रतिनिधी तालुक्याचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून, या वर्षी अकरावी प्रवेशासाठी जागा कमी आणि विद्यार्थी संख्या जास्त असल्याने, अनेकांना प्रवेशासाठी संघर्ष करावा लागणार आहे. दरम्यान, पालकांनी लवकरात लवकर मुलांसाठी प्रवेश निश्चित करुन घ्यावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनाजी गुरव यांनी केले आहे. दहावीच्या …
Read More »गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना वडखळ पोलिसांनी केली अटक
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील वडखळ येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघाजणांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून सुमारे वीस हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. मुंबई- गोवा महामार्गावरील वडखळ जवळील डोलवी येथे गांजा विक्रीसाठी काही युवक येणार असल्याची बातमी वडखळचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने …
Read More »विश्व हिंदू परिषद, वारकरी सांप्रदायाकडून शासनाचा निषेध
कर्जत तहसीलमध्ये भजन आंदोलन; वारीच्या माध्यमातून निवेदन सादर कडाव : प्रतिनिधी पायी वारीला विरोध, वारकर्यांवर अत्याचार, भागवत धर्माच्या पताकांचा अपमान आणि ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना नजरकैदेत ठेवणार्या राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी वारकरी संप्रदाय आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शनिवारी (दि. 17) कर्जत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात भजन आंदोलन करण्यात …
Read More »म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे तीन स्मार्ट मार्ग
सध्या शेअर बाजारात म्युच्युअल फंडाच्या मार्गाने गुंतवणूक करणार्यांची संख्या वेगाने वाढते आहे. ती करताना थोडी स्मार्ट पद्धतीने केली तर अधिक परतावा मिळू शकतो. म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे असे तीन स्मार्ट मार्ग आहेत… स्मार्ट इनव्हेस्टरसाठी म्यच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी तीन सुपरस्टार पद्धती उपलब्ध आहेत. 1. सिस्टेमटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी)- हा पहिला पहिला सुपरस्टार …
Read More »शेअर बाजारासंबंधी कंपन्यांमधील विक्रमी तेजीचा अर्थ
शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीसंबंधी कंपन्यांनी गेल्या आठवड्यात विक्रमी तेजी अनुभवली. या कंपन्यांचे नफ्याचे आकडे एवढे फुगले नसताना हा बदल झाला आहे. याचा अर्थ असा की शेअर बाजारातील गुंतवणूक भारतातही वेगाने वाढत जाणार, असे संकेत आता मिळू लागले आहेत. शेअर बाजारात जे जे नागरिक गुंतवणूक करत आहेत, ते खरोखरच …
Read More »युनायटेड ब्रेव्हरीज कंपनीकडून पनवेल महापालिकेला रुग्णवाहिका
पनवेल : प्रतिनिधी तळोजा येथील युनायटेड ब्रेव्हरीज लिमिटेड या कंपनीने पनवेल महानगरपालिकेस शुक्रवारी (दि. 16) एक रुग्णवाहिका भेट दिली. ’बेसीक लाईफ सपोर्ट कार्डियाक’ ही रुग्णवाहिका कंपनीच्या 2021-22च्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर फंड) देण्यात आली आहे. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. युनायटेड ब्रेव्हरीज यांच्याकडून महापालिकेस मिळालेल्या …
Read More »उरणमध्ये सव्वा लाखाचा गांजा जप्त
दोघांना अटक; एक फरारी उरण : प्रतिनिधी उरण पोलिसांनी चारफाटा छापा टाकून सहा किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. एक लाख 20 हजार रुपये किमतीचा अमली पदार्थ असलेला गांजा बेकायदेशीररित्या विक्री करण्यासाठी बाळगल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आली. येथील रहिवासी …
Read More »गुळसुंद्यात ज्येष्ठांसाठी स्मार्ट कार्ड शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त गुळसुंदे येथील प्राथमिक शाळेत गुळसुंदे, लाडिवली, आकुळवाडी आणि तुराडे या गावातील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासासाठी स्मार्ट कार्ड काढून देण्याच्या शिबिराचे आयोजन गुरुवारी (दि. 15) करण्यात आले होते. गुळसुंदे जिल्हा परिषद विभागामध्ये सहा दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper