Breaking News

Ramprahar Team

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाकडी गावात रस्त्याचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील वाकडी गाव येथे प्राथमिक शाळा ते शशिकांत खुटले यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि नवीन गटारांचे बांधकाम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक आमदार निधीमधुन करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 24) करण्यात आले. हा रस्ता काँक्रिटीकरण …

Read More »

दिबां’च्या नावासाठी 5000 वकिलांची फौज घेऊन आंदोलनात उतरणार -अॅड. मनोज भुजबळ

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा वाद विकोपाला जात असताना सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून जोरदार आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. येत्या 10 जूनला मानवी साखळी उभारून भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त बांधव राज्य सरकारला इशारा देणार असून जर सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर 24 जूनला प्रकल्पग्रस्त बांधव सिडकोच्या मुख्यालयाला घेराव टाकणार आहेत. …

Read More »

पशुपक्ष्यांकडून मिळणारे पावसाचे पूर्वसंकेत

1. चातक पक्षी – पावसाळा जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात. पाऊस अगदी वेळेवर येणार असेल तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते. जर त्यांचे आगमन लांबले तर पाऊसही लांबणार, ही काळ्या दगडावरची रेघ. त्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. चातक पक्षी ‘पिऊ.. पिऊ’ या त्यांच्या सांकेतिक आवाजात ओरडू …

Read More »

विमानतळाला ‘दिबां’चेच नाव दिले पाहिजे -नगरसेवक मनोहर म्हात्रे

पनवेल : वार्ताहर सिडकोच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा नवी मुंबई विमानतळ अगदी सुरुवातीपासून वादाच्या भोवर्‍यात राहिले आहे. या वेळेस वाद चिघळला आहे तो नामकरणाचा. स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त बांधवांची एक दिलाने अशी इच्छा आहे की, या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे कैवारी माजी खासदार लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले …

Read More »

कळंबोली वसाहतीत गरजूंना धान्यवाटप

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम कळंबोली : बातमीदार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू जनतेला एक मदतीचा हाथ म्हणून कळंबोली वसाहतीमधील हजारो गरीब व गरजू नागरिकांना मोफत वाटपाचा कार्यक्रम सोमवारी (दि. 24) राबविण्यात आला. या वेळी धान्यवाटप केल्यानंतर नागरिकांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. …

Read More »

पनवेल परिसरात पुन्हा चोर्यांचे प्रमाण वाढले

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीमुळे सर्व जण मेटाकुटीस आले आहेत. कोरोनाची दुसरी लाट आणि लादण्यात आलेले निर्बंध यामुळे असंख्य नागरिकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. बेरोजगारीमुळे चोरी, लुटमार, लुबाडणूक अशा अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना वाढत असलेल्या दिसत आहे. पनवेल परिसरात यामध्ये कामोठे, खारघर, नवीन पनवेल, कळंबोली आदी ठिकाणी मध्यंतरीच्या …

Read More »

पेण दादर येथे विठ्ठल-रखुमाई उत्सव साध्या पद्धतीने साजरा

पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील दादर गावात विठ्ठल-रखुमाईचा उत्सव गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही कोरोनाचे संकट असल्याने साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासकीय नियमांचे पालन करून विठ्ठल-रखुमाईचा उत्सव मोजक्याच भाविक भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. कोणताही कार्यक्रम ठेवण्यात आला नाही. या वेळी भाविकांना सुंठवडा, खिचडी व केळीचा …

Read More »

आता पावसाळ्यातही रो-रोची सफर

मांडवा-भाऊचा धक्का फेरीबोट सेवेस बंदर विभागाची परवानगी अलिबाग ः प्रतिनिधी सर्व हंगामामध्ये सक्षमपणे प्रवास करण्याची क्षमता असलेल्या एम 2 एम फेरी सर्व्हिसेसची  रो-रोसेवा पावसाळ्यातदेखील सुरू ठेवण्यास बंदर विभागाने परवानगी दिली आहे. त्यामुळे मांडवा-भाऊचा धक्का रो-रो फेरीबोटसेवा पावसाळ्यातही सुरू राहणार आहे. यातून भर पावसाळ्यात अलिबागमध्ये येणार्‍या पर्यटकांना सागरी प्रवासाचा आनंद लुटता …

Read More »

निरंजन डावखरे यांच्या आमदार फंडातून रायगडसाठी 20 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

अलिबाग ः प्रतिनिधी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार फंडातून रायगड जिल्ह्यासाठी 20 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी दिली. कोरोनाचा दुसर्‍या लाटेतील कहर थांबता थांबत नाही. अशा परिस्थितीत ऑक्सिजनचा भासणारा तुटवडा यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण सर्वाधिक …

Read More »

कुंभे जलविद्युत प्रकल्प रखडला

राज्य शासन, स्थानिक नेत्यांची उदासीनता कारणीभूत माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कुंभे गावालगत असणार्‍या डोंगरात शासनाने कुंभे जलविद्युत प्रकल्प उभारणीचे काम हाती घेतले होते. वीजनिर्मिती तसेच शेती व पिण्यासाठी पाणी पुरविण्याच्या हेतूने प्रकल्पाच्या कामाला प्राधान्य व गती देण्यात आली होती, मा़त्र शासन व स्थानिक नेत्यांची उदासीनता आणि कोकणच्या विकासाविषयीच्या आकसामुळे 15 …

Read More »