Breaking News

Ramprahar Team

शेअर बाजारामध्ये जोखीम वाढली, आता काय करायचे?

भारतीय शेअर बाजार एका विशिष्ट रेंजमध्ये फिरत असून त्यातील चढउतार वाढत चालले आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्य गुंतवणूकदारांना सावध होऊन आपल्यापुरते काही विशिष्ट धोरण आखून बाजारात ठामपणे उभे राहता येईल का? मागील एक-दोन आठवड्यात आपण पाहतोय की भारतीय शेअर बाजार हा एका ठरावीक रेंजमध्ये घुटमळताना आढळत आहे. सेन्सेक्स साधारपणे 48000 ते …

Read More »

बीटकॉईन’मध्ये गुंतवणुकीचा मोह का टाळला पाहिजे?

गेल्या आठवड्यात बीटकॉईनच्या किमतीने किमान 30 ते 40 टक्के बुडी मारल्याने त्याच्या उच्चांकाला ज्यांनी खरेदी केली होती त्यांचे हात पोळले आहेत. त्यामुळे या चलनाचे नियंत्रण जोपर्यंत सरकारांतर्फे होत नाही, तोपर्यंत त्यातून मिळणार्‍या परताव्याचा मोह टाळला पाहिजे. सर्व जगाचे व्यवहार ज्यावर अवलंबून आहेत, ती चलने कशी भरकटत चालली आहेत हे बीटकॉईन्सच्या …

Read More »

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच नाव दिले पाहिजे -नगरसेवक विकास घरत

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याचा चंग बांधलेल्या स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्त बांधवांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सर्वपक्षीय बैठकांच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचा रोष जागोजागी उमटत आहे. नामांतर वादाच्या याच पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विकास घरत यांच्यासोबत चर्चा केली असता, नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच …

Read More »

‘कोवॅक्सिन‘ला डब्ल्युएचओची मान्यता नाही

मंजुरी मिळेपर्यंत लसधारकांना विदेश प्रवासात अडचण नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगात अनेक देशांमध्ये आता लॉकडाऊन हळूहळू उठवला जातोय, पण आंतरराष्ट्रीय प्रवाशांना परवानगी देताना डब्ल्युएचओ मान्यताप्राप्त लस हा महत्त्वाचा घटक बनलाय. त्याचमुळे भारतात कोवॅक्सिन ही भारत बायोटेकची लस घेतलेल्यांना मात्र पुढच्या काही दिवसांसाठी तरी अडचण जाणवणार आहे. देशाबाहेर प्रवास करू इच्छिणारे …

Read More »

पाताळगंगेच्या पाण्यावर जलपर्णीचे जाळे

मोहोपाडा : प्रतिनिधी पाताळगंगा नदी किनार्‍यावरील श्री गजानन महाराज मंदिराजवळील नदिपात्रात दोन एकरपेक्षा जास्त जलपर्णीचे जाळे पसरले आहे. यामुळे पाताळगंगा नदीवर मासेमारी करून जीवन जगणार्‍या आदिवासी व भोई बांधवात नाराजी दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नदीतील पाण्यावर जलपर्णीचे रान माजल्याने जणूकाही खेळाचे मैदान असल्याचे वाटू लागले आहे.पाण्यावर असलेली ही …

Read More »

इंटरनेटच्या युगात हरवले मामाचे गाव

नवी मुंबई : प्रतिनिधी झुक झुक आगीन गाडी, पळती गाडी पाहू या, मामाच्या गावाला जाऊ या! या बालगीताचा विसर आता पडला आहे. काळाच्या ओघात आणि इंटरनेटच्या जमान्यात मामाचे गाव हरवले आहे.  शाळेला उन्हाळ्याची सुटी लागताच बच्चे कंपनी मनात बेत रचायची, ते मामाच्या गावाला जाऊन धम्माल करण्याची, मौज, मजा, मस्ती, खेळ …

Read More »

दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त कोकण भवनात शपथ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्ताने उप आयुक्त(सामान्य प्रशासन) मनोज रानडे यांनी शुक्रवारी (दि. 21) कोकण भवनातील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचार्‍यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ दिली. कोकण भवनातील  पहिल्या मजल्यावरील समिती सभागृहामध्ये कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम झाला. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी …

Read More »

‘म्युकरमायकोसिस’साठी तुटपूंजी मदत

राज्य शासनाकडून केवळ दीड लाखांची योजना खारघर : प्रतिनिधी म्युकरमायकोसिस या कोरोनानंतर उद्भवणार्‍या बुरशीजन्य आजाराच्या उपचाराचा सर्व खर्च महात्मा फुले जन आरोग्य योजनेतुन केला जाईल, असे राज्य शासनाने जाहीर केले आहे. मात्र या योजनेची मर्यादा दीड लाख असुन या आजारावरील खर्च किमान आठ लाखांपर्यंत असल्याने त्यामुळे या आजाराने बाधीत झालेल्या …

Read More »

सलून सुरू करण्यास परवानगी द्यावी

नाभिक समाजाचे देवेंद्र फडणवीस यांना निवेदन खोपोली : प्रतिनिधी करोनाची दुसरी लाट सुरू आहे. सर्व व्यापार ठप्प आहेत. त्यात सलून व ब्युटीपार्लर व्यवसाय बंद असल्याने नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने सलून उघडण्याचे आदेश द्यावेत, या मागणीचे निवेदन रायगड जिल्हा नाभिक तरुण संघाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले. …

Read More »

खोपोली भाजी मंडई रात्री आठपर्यंत राहणार खुली

खोपोली : प्रतिनिधी खोपोलीतील महात्मा फुले मंडई रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने नागरिक व व्यापार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाचे स्वागत केले. लॉकडाऊनमध्ये फळे, भाजीपाला दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेत उघडी ठेवण्याचे निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे या वेळेत मंडई परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे व त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव …

Read More »