Breaking News

Ramprahar Team

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी अन्नधान्याचे वाटप

पनवेल ः वार्ताहर कोरोना महामारीमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या दानतीचे व माणुसकीचे दर्शन देताना मागील वर्षात लाखो जणांना मदतीचा हात दिला. या वर्षीदेखील लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजपच्या वतीने पनवेल तालुका व महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी जीवनावश्यक …

Read More »

म्युकरमायकोसिसच्या तपासणीकरिता मनपा हद्दीत ओपीडी सुरू करा

पनवेल ः प्रतिनिधी सध्या कोरोनातून बरे झाल्यानंतर विशेषतः डायबिटीस असलेल्या रुग्णांत  म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसून येत आहेत. या आजाराच्या रुग्णांवर वेळीच उपचार करण्यासाठी पनवेल महानगरपालिका हद्दीत म्युकरमायकोसिस आजाराच्या तपासणीकरिता ओपीडी सुरू करून रुग्णांवर उपचार करण्यात यावेत, अशी मागणी नगरसेवक अरुणकुमार भगत यांनी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या …

Read More »

संभ्रमाची नवी लागण

कोविड-19, म्युकरमायकोसिस या आजारांबाबत उलटसुलट वैद्यकीय सल्ले, चर्चा आणि समाजात संभ्रम पसरवणार्‍या अफवा यांचा सध्या प्रचंड सुळसुळाट झालेला दिसून येतो. दोन लसींच्या मात्रांमधले अंतर किती असावे, रेमडेसिवीर कधी द्यावे की न द्यावे, स्टेरॉइडचा वापर कधी करावा की न करावा या मूलभूत प्रश्नांबद्दल वैद्यक तज्ज्ञांमध्येच इतके मतभेद आहेत की त्याचे दुष्परिणाम …

Read More »

सहा. पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी सर केला माऊंट एव्हरेस्ट

पनवेल ः वार्ताहर नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करून महाराष्ट्र पोलीस दलाचा झेंडा फडकवला आहे. एव्हरेस्ट सर करणारे संभाजी गुरव हे महाराष्ट्र पोलीस दलातील तिसरे अधिकारी आहेत. गुरव यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांच्यावर नवी मुंबई पोलीस दलातून अभिनंदनाचा वर्षाव …

Read More »

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल ः वार्ताहर लायन्स क्लब पनवेल व पूज्य सिंधी पंचायत ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सिंधी पंचायत हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी 45 रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिराला उत्स्फू र्त प्रतिसाद दिला. सध्या सर्वत्र रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे पनवेल लायन्स …

Read More »

पनवेलमध्ये रिक्षाचालकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

नगरसेवक विक्रांत पाटील आणि कोठारी फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम पनवेल ः वार्ताहर कोरोना काळात जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे सामान्य लोकांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे. रोज कमाई करून खाणार्‍या लोकांची आणि रिक्षाचालकांची तर बिकट परिस्थिती आहे. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करीत नगरसेवक विक्रांत पाटील आणि कोठारी फाऊंडेशन यांच्या वतीने प्रभाग क्र. 18मधील …

Read More »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्या

खैरवाडी ग्रामपंचायतीचा ठराव पनवेल ः वार्ताहर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव सिडको महामंडळाने केल्यावर स्थानिक प्रकल्पग्रस्तांत असंतोष निर्माण झाला आहे. विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याबाबत प्रकल्पग्रस्त संघटना तसेच अनेक राजकीय पक्षांचे नेते आग्रही आहेत. अशा वेळी पनवेल तालुक्यातील खैरवाडी …

Read More »

जेएनपीटी उभारणार ऑक्सिजन जनरेशन प्लांट

प्रतिमिनिट 350 लिटर्स निर्मितीची क्षमता; उरण परिसरातील रुग्णांना दिलासा उरण ः वार्ताहर संपूर्ण राज्यभरात दिवसेंदिवस कोरोना बळींची संख्या वाढत आहे. त्या अनुषंगाने जेएनपीटीने स्वतःचा प्रतिमिनिट 350 लिटर्स निर्मिती क्षमतेचा ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्याची तयारी सुरू केली आहे. एक कोटी खर्चाच्या जेएनपीटीच्या मालकीच्या 100 स्क्वेअर मीटर क्षेत्रात उभारण्यात येणार्‍या ऑक्सिजन जनरेशन …

Read More »

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाकडी गावात रस्त्याचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील वाकडी गाव येथे प्राथमिक शाळा ते शशिकांत खुटले यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि नवीन गटारांचे बांधकाम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक आमदार निधीमधुन करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 24) करण्यात आले. हा रस्ता काँक्रिटीकरण …

Read More »

दिबां’च्या नावासाठी 5000 वकिलांची फौज घेऊन आंदोलनात उतरणार -अॅड. मनोज भुजबळ

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा वाद विकोपाला जात असताना सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून जोरदार आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. येत्या 10 जूनला मानवी साखळी उभारून भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त बांधव राज्य सरकारला इशारा देणार असून जर सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर 24 जूनला प्रकल्पग्रस्त बांधव सिडकोच्या मुख्यालयाला घेराव टाकणार आहेत. …

Read More »