Breaking News

Ramprahar Team

पालीत माघी गणेशोत्सवाला प्रारंभ

यात्रेसह विविध उपक्रम रद्द पाली : प्रतिनिधी अष्टविनायकांपैकी पाली (ता. सुधागड) येथील बल्लाळेश्वर देवस्थानच्या माघी गणेशोत्सवाला शुक्रवार (दि. 12) पासून सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियम व अटी शर्थीचे पालन करून उत्सव साजरा होत आहे. येत्या सोमवारी (दि. 15) माघी गणेशोत्सव असून, पालीतील बल्लाळेश्वर देवस्थानच्या जन्मोत्सवाला शुक्रवारपासून सुरूवात झाली …

Read More »

समुद्रात प्लास्टिक टाकण्याचा डाव फसला

बंदर निरीक्षकांकडून बोटमालकाला तंबी; कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश मुरूड : प्रतिनिधी मच्छिमारी करताना जाळ्यात अडकलेला प्लास्टिक कचरा राजपुरी येथील एका बोटीतून खोल समुद्रात टाकण्याचा प्रयत्न आगरदांडा जेट्टी परिसरात सुरू होता. मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे व मेरी टाइम बोर्डाचे बंदर निरीक्षक यशोधन कुलकर्णी यांनी वेळीच दखल घेतल्याने प्लास्टिक कचरा समुद्रात …

Read More »

पावसाळी पाणी जाण्याचा मार्ग अडवणारी मोरी काढून टाकावी; मुरूड मनसेकडून थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुरुड : प्रतिनिधी स्थानिक नागरिकांना विचारात न घेता मुरूड नगर परिषदेने शहरातील शेगवाडा परिसरात चुकीच्या पद्दतीने मोरी बांधली आहे. त्यामुळे पाणी वाहून जाण्याचा नैसर्गिक मार्ग बंद झाला असून पावसाळ्यात घरात पाणी घुसून येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी लक्ष घालून शहरातील लोकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी …

Read More »

पाणीपुरवठा सुरळीत करावा

रोहा प्रांताधिकार्‍यांची एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सूचना रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील 26गाव पाणी पुरवठा योजनेतून सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, यासाठी संबंधीत गावांतील ग्रामस्थांनी शासनाकडे निवेदन दिले आहे. या अनुषंगाने रोहा प्रांत अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी गुरुवारी (दि. 11) प्रांत कार्यालयात एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पंचायत समिती यांचे अधिकारी व …

Read More »

बीएसएनएलला साडेतीन लाखांचा दंड

नेरळ-कळंब रस्त्याच्या साइडपट्टी खोदकामप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाची कारवाई कर्जत : बातमीदार तालुक्यातील माथेरान-नेरळ-कळंब या रस्त्यालगतची साईडपट्टी खोदून बीएसएनएलची केबल टाकली जात आहे. या रस्त्याची मालकी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने विनापरवाना खोदकाम केल्या प्रकरणी  बीएसएनएलला साडे तीन लाखाचा दंड आकारला आहे. माथेरान-कळंब राज्यमार्गावरील नेरळ-कळंब भागात रस्त्याच्या बाजूने बीएसएनएलची केबल टाकण्यासाठी साइडपट्टी …

Read More »

पाणी साठवण टाकीचे बांधनवाडीत लोकार्पण

पनवेल ः वार्ताहर पनवेलजवळील युसूफ मेहेरअली सेंटरच्या मधू-प्रमिला दंडवते संकुल बांधनवाडी पो. बारापाडा येथे एसबीआय लंच ग्रुप मुंबईमधील सदस्याने आपले दिवंगत बंधू ’प्रेम’ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केलेल्या मदतीतून विटा व आरसीसी बांधकामाच्या तुलनेत अत्यल्प खर्चात होणार्‍या फेरोसिमेंट पद्धतीने बांधण्यात आलेल्या 11 हजार लिटर साठवण क्षमता असलेल्या पावसाळी पाणी साठवण टाकीचे लोकार्पण …

Read More »

शाळकरी मित्र-मैत्रिणींची 51 वर्षांनंतर भेट

मोहोपाडा : प्रतिनिधी सन 1968 साली दहावी (मॅट्रिक) झालेल्या विद्यार्थी मित्रांचा स्नेहमेळावा सिद्ध समाधी योग आश्रम, खोपोली येथे मोठ्या उत्साहात झाला. बडोदा, पुणे, मुंबई, पनवेल, पेण, अलिबाग येथे राहणारे हे वर्गमित्र एकमेकांच्या ओढीने एकत्र आले होते. नुकतेच खोपोली येथे आयोजित या चौथ्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटनअ‍ॅड. श्रीकांत पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले. …

Read More »

करंजाडेतील प्रलंबित कामे मार्गी लावा

भाजपचे मिरेंद्र शहारे यांची सिडकोकडे मागणी करंजाडे ः रामप्रहर वृत्त करंजाडेमधील प्रलंबित कामे जसे रस्ते, गार्डन, गटारे तसेच सेक्टर 1 ते 3मधील गटार प्रश्नाबाबत करंजाडे भाजप शहर अध्यक्ष मिरेंद्र शहारे यांनी नुकतीच सिडको अधिकारी श्री. मुलानी तसेच पटेल यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या वेळी प्रामुख्याने रस्ते, गार्डन व …

Read More »

‘रवी डायवेअर’मध्ये जय भारतीय जनरल कामगार संघटनेचा झेंडा; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते युनिटच्या नामफलकाचे अनावरण

पनवेल ः प्रतिनिधी तळोजा औद्योगिक क्षेत्रातील रवी डायवेअर प्रायव्हेट लिमिटेड(युनिट 2) कंपनीमधील कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 13) भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते येथील युनिटच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. या वेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, नगरसेवक प्रवीण …

Read More »

नियम पाळा, अपघात टाळा!

खारघर येथे रस्ते वाहतूक अभियान उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता युवा मोर्चा खारघर-तळोजा मंडल व खारघर वाहतूक विभाग यांच्या वतीने शनिवारी (दि. 13) रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. त्या अंतर्गत वाहनचालकांसाठी सुरक्षेचे महत्त्व, तसेच मद्यपानामुळे होणारे अपघात या संदर्भात जनजागृती करण्यात आली. या वेळी भाजपचे उत्तर …

Read More »