Breaking News

Ramprahar Team

माणगावात गुलाबी थंडी

कडधान्य शेतीला पूरक हवामानामुळे शेतकरी समाधानी माणगाव : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून माणगाव तालुक्यात थंडीचा जोर वाढू लागला आहे. डिसेंबर महिना सुरू झाला तरी थंडीच्या मोसमाची प्रतीक्षा करणार्‍या माणगावकरांना गेल्या काही दिवसांत थंड हवेचा अनुभव येऊ लागला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लांबलेल्या पावसाने ऋतुचक्र पूर्णपणे बदलले होते. ऑक्टोबर महिन्यात पावसाळ्यासारखे …

Read More »

’सुदर्शन’कडून आदिवासींना शेळ्यांचे वाटप

धाटाव : प्रतिनिधी ’उपजीविका विकास’ उपक्रमाअंतर्गत येथील सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीजकडून रोहा तालुक्यातील धाटाव आदिवासीमधील 11 कुटुंबांना 80 शेळ्यांचे वाटप करण्यात आले.  कार्यक्रमाच्या सुरूवातीला लाभार्थ्यांचे प्रशिक्षण शिबिर  घेण्यात आले. या शिबिरात शेळीपालन व्यवस्थापन, शेळ्यांच्या विविध जाती, त्यांचा आहार, आजार आणि उपचारपद्धती याची माहिती देण्यात आली. त्यानंतर प्रत्येकी दोन शेळ्या, चार कोकरू …

Read More »

मुक्या जनावरांसाठी आदिवासी लोकांनी बांधला वनराई बंधारा

कर्जत : बातमीदार मुक्या प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बेकरेवाडीमधील आदिवासी ग्रामस्थांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधला आहे, त्यात साचून राहिलेल्या पाण्यामुळे ग्रामस्थ आनंदले आहेत. कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगर रांगेत बेकरेवाडी ही आदिवासीवाडी असून, वन विभागाच्या दळी भूखंडावर वसलेल्या या आदिवासी वाडीमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते आणि त्याचा फटका माणसापासून …

Read More »

कशेडी घाटात व्हॅन दरीत कोसळली; चौघे प्रवासी सुदैवाने बचावले

पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील धामणदिवी गावाच्या हद्दीतील एका तीव्र वळणावर चालाकाचा ताबा सुटल्याने ओमनी व्हॅन 100 फूट खोल दरीमध्ये कोसळली. सुदैवाने व्हॅनमधील चारही प्रवासी बचावले आहेत. चालक गणेश पर्वती गाडे (वय 35) हा त्याच्या ताब्यातील ओमनी व्हॅन (एमएच-12,क्यूएफ-9338) घेऊन शुक्रवारी (दि. 18) सायंकाळी खेड येथून …

Read More »

खंडाळा घाटात दोन अपघात

चार गंभीर तर आठजण किरकोळ जखमी खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी (दि. 19) झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चारजण गंभीर जखमी तर आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. एक्सप्रेस वेवरून चाललेल्या ट्रकला पाठिमागून आलेल्या कारने शनिवारी सकाळी सात वाजता धडक दिली. या अपघातात कारमधील तिघेजण जखमी झाले असून त्यातील …

Read More »

नुकसानभरपाई न मिळाल्याने रोह्यातील अनेक शाळा अडचणीत

धाटाव : प्रतिनिधी निसर्ग चक्रिवादळाच्या तडाख्याने झालेल्या पडझडीची डागडूजी न झाल्याने रोहा तालुक्यातील अनेक प्राथमिक शाळांना सध्या अडचणीचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत आहे. निसर्ग चक्रिवादळात रोहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 198प्राथमिक शाळांचे मोठ्या प्रमाणात  नुकसान झाले आहे. या वादळात काही शाळांच्या छपरावरील पत्रे उडून गेले, तर काही शाळांचे दारे, खिडक्या …

Read More »

पोरखेळ की सत्तेचा खेळ

कांजूर येथील जमिनीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने झणझणीत चपराक दिल्यानंतर ठाकरे सरकार भानावर येईल असे वाटले होते, परंतु दुर्दैवाने तसे घडले नाही. या सार्‍या प्रकाराला कुरघोडीच्या राजकारणाचे स्वरुप देऊन सत्ताधारी पक्षाला कसला आनंद होतो आहे, कोण जाणे? आता बांद्रा-कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठी प्रस्तावित असलेल्या मोकळ्या भूखंडावर मेट्रो कारशेड उभी करण्याच्या दृष्टीने …

Read More »

शाळांमधील शिपाई पदे रद्द करण्याच्या भूमिकेचा रायगडातील संघटनेकडून निषेध

शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन अलिबाग : प्रतिनिधी राज्याच्या शाळांमधील शिपाई संवर्गातील पदे रद्द करून ती कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेकडून जोरदार विरोध होत आहे. रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघाने शुक्रवारी (दि. 18) शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासाठी निवेदन …

Read More »

फुंडे हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील फुंडे हायस्कूलमधील 1991-92च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी 28 वर्षांनी एकत्र येऊन स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आयोजित स्नेहमेळावा कर्जत येथील नाना-नानी फार्म हाऊस येथे झाला. शालेय जीवन संपले की शाळेतील मित्रवर्ग उच्च शिक्षण, नोकरी-धंदा या कारणामुळे विखुरले जातात. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात शाळेच्या आठवणी असल्या तरी …

Read More »

नेरूळमध्ये आरोग्य शिबिर उत्साहात

नवी मुंबई : प्रतिनिधी प्रभाग क्रं 85 मध्ये नेरूळ सेक्टर 6च्या रहीवाशांकरिता, सारसोळे गाव आणि कुकशेत गावाच्या ग्रामस्थांकरिता आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून दोन दिवसांकरिता मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रहीवाशी व ग्रामस्थांच्या प्रतिसादाने हे शिबिर उत्साहात पार पडले. हे शिबिर आयोजनासाठी स्थानिक प्रभाग 85च्या नगरसेविका सुजाता पाटील …

Read More »