Breaking News

Ramprahar Team

पक्षाचा विश्वास सार्थ ठरविणार -पंकजा मुंडे

अफवा पसरविणार्‍यांचा घेतला समाचार अंबाजोगाई : प्रतिनिधी मी शिवसेनेत जाणार का? का आणखी कुठे जाणार? अशा अफवा पसरवत माझ्याबद्दलची भविष्यवाणी काहीजण विनाकारण करत आहेत. मात्र, पक्षाने मला भरपूर दिले असून निर्णय घेण्यास मी खंबीर आहे, अशा शब्दात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी अफवा पसरविणार्‍यांचा समाचार घेतला. पक्षाने माझ्यासारख्या सामान्य …

Read More »

नवखार-रेवस रस्त्याची वाताहत

अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील रेवस बंदराकडे जाणार रस्ता बेवारस असल्यासारखा दुर्लक्षित राहिला आहे. नवखार ते रेवस बंदरपर्यंतच्या रस्त्याची प्रचंड वाताहत झाली आहे. अलिबाग तालुक्यातील रेवस हे शंभर वर्षाहून अधिक जुने बंदर आहे. रेवस बंदरावर जाणार्‍या रस्त्याकडे गेली दोन वर्षे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. नवखारपासून रेवस …

Read More »

माणगाव तालुक्यात नुकसानीचे पंचनामे

माणगाव : प्रतिनिधी परतीच्या पावसाने माणगाव तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून पीकविमा व नुकसानभरपाईची रक्कम शेतकर्‍याच्या थेट खात्यात जमा करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. माणगाव तालुक्यात यंदा 12295 हेक्टरवर भातपीक लागवड करण्यात आली होती. पीकही …

Read More »

मोठे वढाव येथील बांध बंदिस्तीला खांडी

कामाची चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी पेण : प्रतिनिधी तालुक्यातील वढाव बोर्झे स्कीममधील खारबंदिस्तीच्या कामाला वारंवार खांडी जाण्याचे प्रकार होत असून, त्यामुळे परिसरातील शेकडो एकर शेतजमीन नापीक होऊन पीक वाया गेले आहे. या खारबंदिस्तीच्या कामाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मोठे वढाव भागातील शेतकर्‍यांनी खारलँड विभागाचे कार्यकारी अभियंता विकास पाटील यांच्याकडे …

Read More »

दसर्याचे खरे सोने

अत्यंत अभूतपूर्व परिस्थितीमध्ये यंदाचा दसरा उंबरठ्यावर आला आहे. एरव्ही दसरा-दिवाळीचे दिवस आले की बाजारपेठा फुलून गेलेल्या असतात. विविध प्रकारच्या चीजवस्तू, कपडे, दागदागिने, मिठाया यांच्या खरेदीसाठी गर्दी करणार्‍या सर्वसामान्यांनी दुकाने गजबजून गेलेली असतात. शेतकरी असो वा चाकरमानी खिशात थोडाफार पैसा खुळखुळू लागलेला असतो. दसर्‍याच्या शिलंगणासाठी संपूर्ण देशच आतुर झालेला असतो. यंदा …

Read More »

वीज पडून दोघांचा मृत्यू

कर्जत, पनवेल ः प्रतिनिधी, वार्ताहर रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि पनवेल तालुक्यात वीज अंगावर पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 23) घडली. नागोठणे येथेही एकाचा मृत्यू झालेला आहे. कर्जत तालुक्यात गुरुवारी (दि. 22) सायंकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या वेळी पाटगाव तागवाडी येथे घरात बसलेल्या कीर्ती मेंगाळ (वय …

Read More »

आग्राव येथे जुगार अड्डा उद्ध्वस्त

सात जणांवर गुन्हा दाखल रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील आग्राव येथे भरदिवसा मंदिराच्या सार्वजनिक जागेत सुरू असलेला जुगाराचा अड्डा रेवदंडा पोलिसांनी छापा टाकून उद्ध्वस्त केला. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन नवरात्रोत्सवात आग्रावमधील बापदेव मंदिराच्या सार्वजनिक जागेत तीन पत्ती जुगार खेळला जात असल्याची खबर रेवदंडा पोलिसांना …

Read More »

शाळेच्या कामात राजकीय रंग नको -आमदार महेश बालदी

उरण : वार्ताहर शाळा हा विषय राजकीय असूच शकत नाही. शाळा हे विद्येचे मंदिर असून त्यासाठी नवघर ग्रामस्थ मंडळ पुढाकार घेऊन शाळा नवीन बांधण्यास तयार असताना फक्त राजकीय आकसापोटी व स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्याकरिताच ते परवानगी नाकारत आहेत हि बाब दुर्देवी आहे. शाळेच्या कामात राजकीय रंग नको, असे मत आमदार महेश …

Read More »

एस. पी. विरोधात हक्कभंग ठराव मांडणार -आमदार रविशेठ पाटील

पेण : वार्ताहर पेण न. प. प्रकरणात पोलिसांनी रात्री 2.30 वाजता आमदार रविशेठ पाटील यांच्या घराची झाडाझडती केल्याने आमदार रविशेठ पाटील यांनी रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग ठराव मांडणार असल्याची प्रतिक्रिया पत्रकारांना दिली. याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले कि, अनिरुध्द पाटील यांच्यावर चोरीचा, खुनाचा, दरोड्याचा गुन्हा असल्यासारखे …

Read More »

शेतकर्यांचे अश्रू पुसण्यासाठी पालकमंत्र्यांचा पत्ताच नाही..!

नुकसानभरपाई द्या, अन्यथा उग्र आंदोलन -शेतकरी संघटना सुधागड : रामप्रहर वृत्त परतीच्या पावसाने रायगडातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे हाताशी आलेले चांगले पिक आडवे झाल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यात अश्रु तरळले आहेत. हे अश्रू पुसण्याचे काम सरकारचे आहे. मात्र पालकमंत्र्यांचा येथे पत्ताच नाही, असा गंभीर आरोप रायगड जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हा …

Read More »