Breaking News

Ramprahar Team

वीज पडून दोघांचा मृत्यू

कर्जत, पनवेल ः प्रतिनिधी, वार्ताहर रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि पनवेल तालुक्यात वीज अंगावर पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 23) घडली. नागोठणे येथेही एकाचा मृत्यू झालेला आहे. कर्जत तालुक्यात गुरुवारी (दि. 22) सायंकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या वेळी पाटगाव तागवाडी येथे घरात बसलेल्या कीर्ती मेंगाळ (वय …

Read More »

आग्राव येथे जुगार अड्डा उद्ध्वस्त

सात जणांवर गुन्हा दाखल रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील आग्राव येथे भरदिवसा मंदिराच्या सार्वजनिक जागेत सुरू असलेला जुगाराचा अड्डा रेवदंडा पोलिसांनी छापा टाकून उद्ध्वस्त केला. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन नवरात्रोत्सवात आग्रावमधील बापदेव मंदिराच्या सार्वजनिक जागेत तीन पत्ती जुगार खेळला जात असल्याची खबर रेवदंडा पोलिसांना …

Read More »

शाळेच्या कामात राजकीय रंग नको -आमदार महेश बालदी

उरण : वार्ताहर शाळा हा विषय राजकीय असूच शकत नाही. शाळा हे विद्येचे मंदिर असून त्यासाठी नवघर ग्रामस्थ मंडळ पुढाकार घेऊन शाळा नवीन बांधण्यास तयार असताना फक्त राजकीय आकसापोटी व स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्याकरिताच ते परवानगी नाकारत आहेत हि बाब दुर्देवी आहे. शाळेच्या कामात राजकीय रंग नको, असे मत आमदार महेश …

Read More »

एस. पी. विरोधात हक्कभंग ठराव मांडणार -आमदार रविशेठ पाटील

पेण : वार्ताहर पेण न. प. प्रकरणात पोलिसांनी रात्री 2.30 वाजता आमदार रविशेठ पाटील यांच्या घराची झाडाझडती केल्याने आमदार रविशेठ पाटील यांनी रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग ठराव मांडणार असल्याची प्रतिक्रिया पत्रकारांना दिली. याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले कि, अनिरुध्द पाटील यांच्यावर चोरीचा, खुनाचा, दरोड्याचा गुन्हा असल्यासारखे …

Read More »

शेतकर्यांचे अश्रू पुसण्यासाठी पालकमंत्र्यांचा पत्ताच नाही..!

नुकसानभरपाई द्या, अन्यथा उग्र आंदोलन -शेतकरी संघटना सुधागड : रामप्रहर वृत्त परतीच्या पावसाने रायगडातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे हाताशी आलेले चांगले पिक आडवे झाल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यात अश्रु तरळले आहेत. हे अश्रू पुसण्याचे काम सरकारचे आहे. मात्र पालकमंत्र्यांचा येथे पत्ताच नाही, असा गंभीर आरोप रायगड जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हा …

Read More »

मुरूडमध्ये भाज्यांचे दर कडाडले

मुरूड : प्रतिनिधी अवकाळी पावसाने मुरूड तालुक्यातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून, अतिपावसामुळे भाजीचे पीकदेखील नष्ट झाले आहे. दरम्यान, आवक घटल्याने किरकोळ बाजारातील भाज्यांच्या दरात प्रतिकिलो 50 ते 60 रुपयांची वाढ झाली आहे. भाज्यांच्या महागाईमुळे ग्राहकांच्या महिन्याच्या खर्चातही वाढ झाली आहे. मुरूड तालुक्यात अवकाळी पाऊससुद्धा दिवसाला 130 मिलीमीटरपेक्षा जास्त पडला. …

Read More »

द्रुतगती महामार्गावर टँकर पेटला

दुसर्‍या अपघातात दोघे जखमी खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी (दि. 22) पहाटेच्या सुमारास पुण्याच्या दिशेने जाणार्‍या टँकरच्या केबिनमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मुंबईहून पुण्याला जाणारा टँकर (आरजे-18, जीबी-51 49) गुरुवारी बोरघाट चढत असताना टँकरच्या केबिनने अचानक पेट घेतला. त्यात टँकर …

Read More »

काशिद किनार्‍याला पर्यटकांची प्रतीक्षा

मुरूड : प्रतिनिधी पर्यटकांच्या गर्दीने नेहमी गजबजणारा काशिद समुद्रकिनारा लॉकडाऊनमुळे गेल्या सहा-सात महिन्यांपासून सुना सुना झाला आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने या किनार्‍याचे मोठे नुकसान झाले आहे. मोठमोठी सुरूची झाडे स्टॉलवर पडल्याने स्थानिक स्टॉलधारकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या संकटांवर मात करीत येथील काही स्टॉलधारकांनी बुधवार (दि. 21)पासून आपले स्टॉल …

Read More »

नियोजित पोलीस चौकीच्या ठिकाणी थाटले दुकान

कर्जत : बातमीदार जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सुचनेनुसार उमरोली ग्रुप ग्रामपंचायतीने कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील डिकसळ गावाच्या नाक्यावर पोलीस चौकी बांधण्याचे काम सुरू केले होते. मात्र बंद असलेले पोलीस चौकीच्या जागेवर आता वडापावचे दुकान थाटण्यात आले आहे. दरम्यान, डिकसळ नाक्यावर पोलीस चौकीचे काम सुरू असल्याचे पत्र 2018 मध्ये नेरळ पोलीस ठाण्याला देणारी उमरोली …

Read More »

अलिबागेत शहीद पोलिसांना अभिवादन

अलिबाग : प्रतिनिधी देशासाठी धारातीर्थी पडलेल्या पोलिसांना बुधवारी (दि. 21) जिल्हाधिकारी निधी चौधरी व पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड पोलीस कवायत मैदान येथे अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने पोलीस स्मृतिदिन संचलनही झाले. पोलीस स्मृतिदिनानिमित्त अलिबाग येथील पोलीस कवायत मैदानात बुधवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी …

Read More »