Breaking News

Ramprahar Team

तळोजा एमआयडीसीतील कंपन्या आजपासून होणार सुरू

खारघर : प्रतिनिधी तळोजा एमआयडीसीमध्ये मागील साडेचार महिन्यापासून बंद असलेल्या 804 उद्योग धंदे सुरु करण्यास शासनाने परवानगी दिल्याने गुरुवारपासून संपूर्ण तळोजा एमआयडीसी लॉकडाऊन नंतर प्रथमच सुरु होणार आहे. लाखो कामगार वर्गाचा रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे. तळोजा एमआयडीसीच्या मध्ये एकूण 973 कारखाने आहेत. यापैकी 169 उद्योग धंदे अत्यावश्यक सेवा पुरवीत असल्याने …

Read More »

नागोठणे टपाल कार्यालयातील तांत्रिक अडचणींमुळे ग्राहक त्रस्त

भाजपकडून निवेदन नागोठणे : प्रतिनिधी येथील टपाल कार्यालयात वारंवार तांत्रिक अडचणींचे कारण देऊन अनेक महत्त्वाच्या सेवा नाकारल्या जात असल्याने शहरासह परिसरातील जनता त्रस्त झाली आहे. याबाबत नागोठणे शहर भाजपने याची दखल घेत शहर अध्यक्ष सचिन मोदी यांचे नेतृत्वाखाली टपाल कार्यालयात बुधवारी (दि. 9) निवेदन देण्यात आले. याबाबत येथील उप डाकपाल …

Read More »

फुकटचा तमाशा

सर्वप्रथम हे आवर्जून नमूद केले पाहिजे की मुंबईला पाकिस्तानव्याप्त काश्मीर संबोधणे आणि मुंबई पोलिसांना माफिया म्हणून दूषणे देणे खचितच समर्थनीय नाही. या दोन्ही गंभीर घोडचुका बॉलिवुडची अभिनेत्री कंगना राणावत हिने केल्या. त्याचा निषेध करावा तितका थोडा आहे. परंतु अशी बेफाम वक्तव्ये केल्याची शिक्षा म्हणून तिच्या मालमत्तेवर बुलडोझर फिरवणे ही एकप्रकारची …

Read More »

पनवेल तालुक्यात आढळले तब्बल 372 नवे रुग्ण

एकाचा मृत्यू; 214 जणांची कोरोनावर मात पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 9) कोरोनाचे 372 नवीन रुग्ण आढळले असून, एकाचा मृत्यू झाला आहे, तर 214 रुग्णांनी कोरोनावर मात केली. महापालिका हद्दीत दिवसभरात 254 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर 175 रुग्ण बरे झाल्याने त्यांना …

Read More »

पोलीस मित्र संघटनेच्या तालुका उपाध्यक्षपदी योगेश पाटील

पनवेल : रामप्रहर वृत्त पोलीस मित्र संघटनेच्या पनवेल तालुका उपाध्यक्षपदी रसायनी येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश बाळाराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. योगेश पाटील रसायनी विभागातील कासप गावचे रहिवासी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक, शैक्षणिक उपक्रमात सातत्याने सहभाग घेत सामाजिक बांधिलकी जपत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पोलीस मित्र …

Read More »

उरणच्या चिमुरडीचा विक्रम

उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील अवघ्या पावणे सहा वर्षांच्या हर्षिती भोईर या चिमुरडीने ट्रेकिंगमध्ये विक्रम केला आहे. या बद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हर्षिती भोईर हीने साडेतीन वर्षांची असल्यापासून ट्रेकची आवड जोपासली आहे. फक्त साडेपाच वर्षात तिने दोन रेकॉर्डची नोंद करून आपले आणि आपल्या गावाचे नाव पूर्ण …

Read More »

जासई हायस्कूलच्या प्रांगणात वृक्षारोपण

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात भारतीय मजदुर संघाचे अध्यक्ष, कामगार नेते व स्कूल कमिटी सदस्य सुरेश पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण केले गेले. या वेळी विद्यालयाचे चेअरमन अरुण जगे व विद्यालयातील शिक्षक वर्ग सोशल डिस्टन्सिंग …

Read More »

झाड कोसळून कारचे नुकसान

नवी मुंबई : बातमीदार नेरूळ राजीव गांधी ब्रिजजवळ शिरवणे गावात जाणार्‍या रस्त्यावर झाड कोसळल्याने कारचा चुराडा झाल्याची घटना बुधवारी सकाळी 9 च्या दरम्यान घडली. राजीव गांधी ब्रिजजवळून शिरवणे गावात शिरताच रस्त्याच्या कडेला वाहने पार्क केलेली असतात. दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईत मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसात काही झाडे पडली होती तर काही …

Read More »

नवी मुंबईतील रस्त्यांवर रेतीच रेती

दुचाकीचे अपघात; प्रशासनाचे दुर्लक्ष नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडलेले असताना सध्या पावसाने वाहून आलेल्या रेतींचे प्रमाण दिसू लागले आहे. नवी मुंबईतील अनेक महत्वाच्या शहरांतर्गत रस्त्यांवर रेती पसरलेली आहे. नियमित या मार्गांवरून प्रवास करणार्‍या नागरिकांना चटकन या रेतीचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार घसरून पडू लागले आहेत. या …

Read More »

भाजपतर्फे जासई विद्यालयात गरजूंना अन्नधान्याचे वाटप

उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये बुधवारी (दि. 9) इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. 500 विद्यार्थ्यांच्या पालकांनी मास्कचा वापर करून व सोशल डिस्टन्सिंग ठेऊन …

Read More »