नवी मुंबई ः बातमीदार लडाखमधील गलवान क्षेत्रात चीनने युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली. त्यानंतर चीनला भारताने जशाच तसे उत्तर दिल्यानंतर चीनने नमते घेतले. चीनला संपूर्ण देशानेही जशाच तसे उत्तर देण्याची हीच वेळ आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने याकरिता आपले योगदान देणे गरजेचे आहे. याकरिता नवी मुंबई भाजपतर्फे व्यापारी बांधवांना चिनी बनावटीच्या वस्तूंची …
Read More »पनवेल तालुक्यात 154 नवे कोरोनाग्रस्त
पाच जणांचा मृत्यू; 250 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 31) कोरोनाचे 154 नवीन रुग्ण आढळले असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 250 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 121 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. 210 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी …
Read More »महिलांसाठी विशेष बस-रेल्वेची सुविधा द्यावी
आमदार मंदा म्हात्रे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी नवी मुंबई ः बातमीदार कोरोना महामारीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असताना याचा सर्वाधिक फटका नोकरदार महिलावर्गाला बसला आहे. यातच लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर गेली चार महिने कार्यालये बंद असल्याने सक्तीच्या रजेवर असलेल्या नोकरदार महिलांना नवी मुंबई ते मुंबई अशा प्रवासाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. …
Read More »कोविड रुग्णांच्या सेवेसाठी सरसावले आयुर्वेद तज्ज्ञ
पनवेल ः प्रतिनिधी कोरोना पॉझिटिव्ह अल्प व मध्यम स्वरूपाच्या लक्षणांचा प्रादुर्भाव असणार्या रुग्णांना उपचार देण्यासाठी पनवेलमधील नामवंत आयुर्वेद तज्ज्ञ पुढे सरसावले असून, आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे औषध, आहार-विहार या त्रिसूत्रीचा वापर करून आयुर्वेदिक उपचाराने अनेक कोविड रुग्णांना फायदा होईल, असा विश्वास आयुर्वेद तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. शासनाने कोविडचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आयुष …
Read More »चांभार्लीतील शिवस्मारकाचे सुशोभीकरण
मोहोपाडा ः प्रतिनिधी चक्रीवादळामुळे रसायनीतील चांभार्ली बसथांब्याजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरील निवारा शेड उडून गेले होेते. मुसळधार पावसात चांभार्ली शिवस्मारकाला निवारा शेड नसल्याने या स्मारकाची बिकट अवस्था झाली होती, मात्र दोन महिने होऊनही शिवस्मारकाकडे कोणीही लक्ष न दिल्याने एक सामाजिक संदेश म्हणून एक हात समाजसेवेसाठी या सामाजिक उपक्रमासाठी रसायनीतील युवकांनी …
Read More »‘बकरी ईदला वैयक्तिक कुर्बानीची परवानगी द्यावी’
कळंबोली ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहविभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शनिवारी (दि. 1 ऑगस्ट) बकरी ईद साजरी करावी. नमाज घरीच अदा करावी आणि प्रतीकात्मक कुर्बानी करावी, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे, तर शासन ऑनलाइन व दूरध्वनीवरून जनावरे खरेदी करण्याचे आदेश देत आहे. त्यामुळे मुस्लिम बांधव संभ्रमात पडले …
Read More »मुख्याधिकारी संतोष माळी यांनी स्वीकारला पदभार
उरण ः वार्ताहर उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची 10 जुलै रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे प्रशासन अधिकारी पदावर बदली झाली. उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी ही जागा रिक्त असल्याने त्या जागेवर मुख्याधिकारी संतोष माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष माळी यांनी गुरुवारी (दि. 30) पदभार स्वीकारला. त्या अनुषंगाने उरणचे …
Read More »कोविड केअर सेंटर्समध्ये कर्मचार्यांची कमतरता
रुग्णांच्या उपचारावर मर्यादा उरण : प्रतिनिधी जेएनपीटी आरोग्य विभाग आणि उरण तहसीलदारांनी वारंवार आवाहन करूनही कोविड सेंटरमध्ये रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी एकाही एमबीबीएस डॉक्टराने येण्याची तयारी दाखवली नाही. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार नर्स, वार्डबॉय, अन्य कर्मचारीही येण्यास राजी नाहीत. त्यामुळे उरण, जेएनपीटीमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेली तिन्ही कोविड सेंटर्स उपचारासाठी कुचकामी ठरू …
Read More »विद्यालयांचे दहावीच्या परीक्षेतील निकाल
एमएनएम विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालय, गव्हाण – 100 टक्के पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या गव्हाण विभागातील एमएनएम. विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे सगळीकडे कौतुक करण्यात येत आहे. सन 2019 -2020 इयत्ता दहावीच्या …
Read More »एक धागा कोविड रक्षणाचा
पनवेल : प्रतिनिधी कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यावर सामान्य माणसाला त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून पोलीस अहोरात्र पहारा देऊ लागले. दवाखान्यातील डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉयपासून महापालिकेच्या सफाई कामगारांपर्यंत अनेकजण कोरोना विरुद्धच्या लढ्यात सैनिक बनून आपले रक्षण करीत आहेत. त्यात काही धारातीर्थी ही पडले तर काहींच्या कुटुंबातील सदस्यांची ही आहुती गेली. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper