मुरूड : शहराला लागून असलेल्या श्यामराज गडाखाली वसलेले कोळी बांधवांचे एकदरा गाव निसर्गसंपन्नतेने नटलेले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर या गावचे विहंगम दृश्य सर्वांना आकर्षित करीत आहे. (छाया : सुधीर नाझरे)
Read More »मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना
श्रीवर्धन ः प्रतिनिधी नैऋत्य मोसमी पाऊस या वेळेला जूनच्या 5 तारखेपर्यंत केरळच्या किनारपट्टीवर धडकेल, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला होता, परंतु नुकत्याच झालेल्या बंगालच्या उपसागरातील अम्फाम चक्रीवादळामुळे मान्सूनचे आगमन लवकर झाले आहे. यावर्षी 30 मे रोजी मान्सून केरळ किनारपट्टीवर धडकला आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत असून यामुळे …
Read More »माथेरानमध्ये होणार अश्वांची आरोग्य तपासणी
पशुसंवर्धन विभागाची नियोजनास सुरुवात कर्जत ः बातमीदार पर्यटनस्थळ माथेरानमध्ये वाहनांना बंदी असल्यामुळे येथील एकमेव वाहन असलेल्या घोड्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. याबाबत पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने येऊन पाहणी करून नियोजनास सुरुवात केली आहे. लॉकडाऊनमुळे संपूर्ण माथेरान हे 17 मार्चपासून बंद आहे. त्यामुळे घोडेसुद्धा आपल्या तबेल्यात उभे आहेत. माथेरानमध्ये 462 प्रवासी …
Read More »माणगावात दोन नवे कोरोना रुग्ण
माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यात शनिवारी (दि. 30) नवघर येथे दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यांचा स्वॅब रिपोर्ट शनिवारी आल्याची माहिती माणगाव तालुक्याच्या तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांनी दिली. माणगाव तालुक्यात दरदिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाबरोबरच तालुक्यातील जनतेची डोकेदुखी वाढली आहे. तालुक्यात एकूण 41 जण कोरोनाबाधित होऊन …
Read More »पेणमध्ये न. प. प्रशासनाचा डॉक्टरांशी संवाद
आमदार रविशेठ पाटील यांची उपस्थिती पेण ः प्रतिनिधी कोरोना व्हायरसमुळे आज संपूर्ण जगात भयानक परिस्थिती निर्माण झाली असून देशात संचारबंदी लागू असताना पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार आपल्या जीवावर उदार होऊन समाजाची सेवा करीत आहेत. आपल्या देशात बर्याच डॉक्टरांना कोविड-19 युध्दात काम करताना मृत्यूस सामोरे जावे लागले आहे. तरीही डॉक्टरांनी …
Read More »कोरोना नियंत्रणासाठी सतर्क राहावे
भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांचे प्रतिपादन मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील एकदरा, म्हालोर, मिठागर, आंबोली, मिथेखार व मुरूड शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. ही संख्या वाढता कामा नये यासाठी शासकीय यंत्रणेने सतर्क राहून या विषाणूचा प्रसार रोखला पाहिजे. यासाठी …
Read More »माणसांमध्ये अंतर राखा, माणुसकीमध्ये नको!
सुरुवातीच्या काळात शहरी भागापुरते मर्यादित असलेले कोरोनाचे संक्रमण एव्हाना गाव-खेड्यांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. मुंबईपासून जवळ असणार्या रायगड जिल्ह्यामध्ये विशेषकरून पनवेल परिसरात कोविड-19चा सर्वाधिक प्रादुर्भाव होता व आजही आहे, पण आता जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झालेला दिसून येतो. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 15 तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे.कोरोनाने रायगड जिल्ह्याला …
Read More »पनवेलमध्ये 2223 शेतकर्यांना बियाणे, खत वाटप
खारघर : प्रतिनिधी पावसाळा तोंडावर आला आहे. त्यादृष्टीने पावसाळापुर्वी शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. यावर्षी कोविड 19 च्या धोक्यामुळे मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे.कृषी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी यावर्षी कृषी विभागाला शेतकर्यांना बांधावर बियाणे व खते उपलब्ध करून देण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. या अंतर्गत पनवेल तालुक्यात सुमारे 70 …
Read More »नवी मुंबईत 114 जणांना कोरोना; सात मृत्युमुखी
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत शनिवारी (दि. 30) एकाच दिवशी 114 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. शुक्रवारी एकाच दिवसात 277 बरे झालेल्या व्यक्तींमुळे दिलासा मिळाला होता, या दिलासादायक बाबीवर देखील विरजण पडले आहे. दररोजचा आकडा वाढत असताना नवी मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब ठरली होती. त्यात शनिवारी अधिक भर …
Read More »उरणमध्ये होमिओेपॅथिक गोळ्यांचे वाटप
उरण : वार्ताहर उरण मधील डॉ. अरबाज नवाबुल्लाह पठाण यांनी पंचक्रोशीत अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे नुकतेच शासनाच्या नियमांचे पालन करून सोशल डिस्टन्सिंग ठेऊन मोफत गोळ्यांचे वाटप केले. ह्याचा एक हजार पाचशे जास्त व्यक्तींनी याचा लाभ घेतला. आयुष मंत्रालय यांच्या शिफारशीनुसार अर्सेनिक अल्बम 30 या होमिओेपॅथिक गोळ्यांचा डोस रोगप्रतिकारशक्ती …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper