पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार पनवेल महानगरपालिकेतर्फे अनेक प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पनवेल महानगरपालिकेची सर्वसाधारण सभाही आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गुरुवारी (दि. 19) …
Read More »कळंबोली भाजप कार्यालयात मोफत नेत्रचिकित्सा शिबिर उत्साहात
कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये अनिल आय हॉस्पिटल डोंबिवली यांच्या वतीने दोन दिवस मोफत नेत्रचिकित्सा शिबिर व अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले. डॉ. कृष्णा धनवडे व मोहिनी धनवडे यांनी यासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांचा भाजप कार्यालयामध्ये तुळशीचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी भाजप …
Read More »सावळ्यात ‘एचआयएल’च्या केमिकल्समुळे नागरिक हैराण
पनवेल ः रामप्रहर वृत्त सावळे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एचआयएल कंपनीच्या केमिकल्समुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी नागरिकांना आरोग्यविषयक अनेक तक्रारी सातत्याने जाणवत आहेत. यासंदर्भात सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच डॉ. अविनाश गाताडे यांनी या कंपनीची सोमवारी (दि. 16) पाहणी केली. पातळगंगा नदी प्रदूूषणाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात …
Read More »कोरोना व्हायरसमुळे उरण जलवाहतुकीला ब्रेक
उरण : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्यपूर्व काळापासून अविरत सुरू असणार्या मोरा-मुंबई प्रवासी जलवाहतुकीला कोरोना व्हायरसने ब्रेक लावला आहे. या जलमार्गाने नेहमी होत असणारी प्रवासी वाहतूक कोरोनाच्या धास्तीने अर्ध्यापेक्षा कमी झाल्याने लॉन्च मालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक काळजी घेण्याच्या भीतीचा परिणाम मोरा-भाऊचा धक्का या जलवाहतुकीवर होत मोजकेच …
Read More »हवी स्वघोषित टाळेबंदी
कोरोनाविरुद्धची लढाई मानवी समाज आणि विषाणू यांच्यातील आहे. अशा संघर्षाच्या प्रसंगी अडचणींचा पाढा वाचण्यात काही हशील नसते. पुढील दोन आठवडे अतिशय महत्त्वाचे आहेत. या दोन आठवड्यांत हा घातक विषाणू आपण किती प्रमाणात रोखू शकतो त्यावर विषाणूविरुद्धच्या या युद्धात कोणाची जीत होते याचा निकाल लागेल. आपल्या महान लोकशाही देशामध्ये उठसूठ कुठल्याही …
Read More »कर्जत नगर परिषदेतर्फे जनजागृती मोहीम
कर्जत : प्रतिनिधी जीवघेण्या कोरोना विषाणूबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून कर्जत नगर परिषदेच्या वतीने जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कोरोना प्रतिबंधका काय काळजी घ्यायची याबाबत माहिती पत्रके वाटण्यात आली. नगर परिषदचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगरसेवक, कर्मचारी यांनी कर्जत शहराच्या मुख्य बाजार पेठेत फिरून जनजागृती केली. बाजारपेठेत …
Read More »पायरीचीवाडी शाळेत जनजागृती व प्रबोधन
विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना मोफत मास्कवाटप पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पायरीचीवाडी येथील शाळेतील विद्यार्थ्यासोबत ग्रामस्थांमध्येही कोरोनाबाबत जनजागृती व प्रबोधन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांबरोबर ग्रामस्थांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती व प्रबोधन करण्यासाठी पायरीचीवाडी येथील विद्यार्थ्याची प्रभातफेरी काढण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित ग्रामस्थांना वारंवार हात स्वच्छ …
Read More »पेण तालुक्यात मास्क, सॅनिटायझर्सचा तुटवडा
पेण : प्रतिनिधी कोरोना आजाराचा संसर्ग होऊ नये, म्हणून मास्क वापरण्याचा व हात धुण्यासाठी सॅनिटायझर्सचा वापर करायचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. त्यामुळे मास्क व सॅनिटायझर्स विक्रीत अचानक वाढ झाली असून, पेण तालुक्यातील अनेक मेडिकलमध्ये मास्क व सॅनिटायझर्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. पेण येथून अवघ्या काही अंतरावर असलेल्या पनवेल येथे …
Read More »कर्जतमध्ये पाच परदेशी नागरिक निगराणी कक्षात
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार बाहेरच्या देशातून आलेल्या पाच नागरिकांना कर्जत येथील निगराणी कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, रायगड जिल्हा प्रशासनाने गंभीर आणि खबरदारीची पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रांताधिकारी तहसीलदार यांच्यासह अन्य यंत्रणांच्या प्रमुख अधिकार्यांची जिल्ह्याची …
Read More »रायगडात पर्यटक जलवाहतूक बंद
पर्यटनस्थळांवर बंदी; अत्यावश्यक प्रवासी सेवा मात्र सुरूच अलिबाग : प्रतिनिधी कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी शासन खबरदारी घेत आहे. मेरीटाईम बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील समुद्र, खाडी किनारी चालविले जाणारे जलक्रीडा व नौकाविहार प्रकल्प तसेच पर्यटक जलवाहतूक 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मेरीटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिले आहेत. मात्र प्रवासी जलवाहतूक ही अत्यावशक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper