पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील झाप- आपटवणे-भावशेत या रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामाचा शुभारंभ आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. आगामी काळात मतदार संघातील सर्वच गावांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा मनोदय आमदार रविशेठ पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपचे रायगड जिल्हा चिटणीस राजेश मपारा, चंद्रकांत घोसाळकर, आपटवणे …
Read More »सायबर सुरक्षेबाबत जागरूक राहावे -मिलिंद पोंक्षे
अलिबाग : जिमाका महिला व बालकांबाबतचे गुन्हे, लैंगिक अत्याचार आणि फसवणूक करताना अनेक समाजकंटक इंटरनेटचा वापर करत आहेत. जिल्ह्यात अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी शासन प्रयत्नशील असून महिला व बालकांनीही सायबर सुरक्षेबाबत जागरुक रहावे, असे आवाहन विरार येथील जाणीव चॅरिटेबल ट्रस्टचे मिलिंद पोंक्षे यांनी केले आहे. सावित्रीबाई फुले जयंती व महिला …
Read More »म्हसळ्यात बेटी बचाओ बेटी पढाओ! रॅली
मुलींचे शिक्षण ते आरोग्य जपण्यासाठी ‘आयसीडीएस’ सज्ज म्हसळा : प्रतिनिधी एकात्मिक बाल विकास केंद्र (आयसीडीएस) च्या प्रकल्प अधिकार्यांसह अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश देण्यासाठी म्हसळा शहरात जनजागृती रॅली काढली होती. रॅलीदरम्यान ठिकठिकाणी पथनाट्येही सादर करण्यात आली. म्हसळ्याचे गट विकास अधिकारी वाय. एम. प्रभे आणि एकात्मिक …
Read More »पेठच्या कोथळीगडाला सागाचा दरवाजा
किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देणारे खरे आधुनिक मावळे : वाडकर कर्जत : बातमीदार तालुक्यातील पेठ गावाच्या पाठिमागे उभा असलेल्या कोथळीगडाचा मुख्य दरवाजा आता बंदिस्त झाला आहे. त्यासाठी 700 किलो वजनाचा सागवान दरवाजा तेथपर्यंत नेऊन या किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देणारे आताच्या युगातील तरुण खरे मावळे आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते …
Read More »जंजिरा किल्ल्यास साडेचार लाख पर्यटकांची भेट
ऐतिहासिक वास्तू अथवा एखादे प्रसिद्ध धार्मिक स्थळ ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी पर्यटक अथवा धार्मिक लोकांचा वावर वाढल्याने तेथील स्थानिक लोकांना मोठा रोजगार प्राप्त होऊन तेथील आर्थिक सुबत्ता सुधारण्यास मदत झाली आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यात असणार्या मुरूड तालुक्यात ऐतिहासिक सुप्रसिद्ध असा 350 वर्षांपूर्वी बांधलेल्या किल्ल्यामुळे स्थानिकांना चांगलाच फायदा मिळाला आहे. …
Read More »श्री मयुरेश टेलिकॉम दुकान सुरु
पनवेल : शहरात नव्याने श्री मयुरेश टेलिकॉम हे दुकान सुरु झाले आहे. या दुकानाचे भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि अभिनेते कमलेश सावंत यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रभाग समिती ड चे अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक राजू सोनी, मालक शंकर हजारे आदी उपस्थित होते.
Read More »आपली बँक आपल्या दारी; नवी मुंबई डाक विभागाचा अनोखा उपक्रम
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त ’बँक आपल्या दारी’ हे ब्रिदवाक्य समोर ठेऊन भारतीय डाक विभागाने 1 सप्टेंबर 2018 रोजी ’इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके’ची स्थापना केली होती. या बँकेअंतर्गत भारतातील सर्व टपाल कार्यालये टपाल सेवे बरोबरच बँकेचीसुद्धा सुविधा पुरविणार आहेत. जगातील सर्वात मोठे टपाल जाळे भारतात असल्याने देशातील प्रत्येक गावापर्यंत, घरापर्यंत …
Read More »महाविकास आघाडीत महानाराजी
आमदार अनिल बाबर सरकारच्या कामावर नाराज सांगली : प्रतिनिधी ठाकरे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाल्यापासून महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये नाराजी पाहायला मिळू लागली आहे. त्यात शिवसेनेचे सांगलीमधील खानापूर मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांची भर पडली आहे. बाबर पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. या नाराजीबाबत बाबर यांना विचारले असता, त्यांनी सांगितले …
Read More »भारतीय संविधानामुळे प्रत्येकाला अधिकार -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय लोकशाहीत भारतीय संविधानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक देशांतील संविधानाचा अभ्यास करून एक परिपूर्ण असे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला दिले. भारतीय संविधानाने भारताच्या प्रत्येक नागरिकाला अधिकार प्राप्त करून दिले आहेत, तसेच या संविधानामुळेच आपली लोकशाही बळकट झालेली आहे, असे प्रतिपादन माजी खासदार …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते दिनदर्शिका प्रकाशन
पनवेल : रामप्रहर वृत्त अस्मिता क्रिडा, सांस्कृतिक मित्र मंडळ, उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रिडा मित्र मंडळ व रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाऊंडेशन यांच्या वतीने 2020 सालची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. या दिनदर्शिकांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 4) प्रकाशन करण्यात आले. माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper