Breaking News

Ramprahar Team

खोपोलीत खोकला व तापाने नागरिक हैराण

खोपोली : प्रतिनिधी अवकाळी पाऊस, त्यानंतर अचानक वाढलेला उष्मा व वेगात वाहणार्‍या वार्‍यामुळे हवामानात दरदिवशी बदल होत आहे. खोपोली परिसरातील रस्त्यांवरील डांबर उडाल्याने सर्वच ठिकाणी धुळीचा लोट निर्माण होत आहे. त्यात दिवाळीतील फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे वायू प्रदूषण वाढून खोपोली परिसरातील हवा काही प्रमाणात प्रदूषित झाली आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर होत असून, …

Read More »

ताडवाडी-मोरेवाडी नळपाणी योजना अद्याप कागदावरच

कर्जत : बातमीदार  तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील ताडवाडी आणि मोरेवाडीमध्ये पावसाळ्यापूर्वी नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित करावी, असे आदेश रायगड जिल्हाधिकारी यांनी ऑक्टोबर 2017 मध्ये दिले होते. डिसेंबर 2017  मध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने या योजनेची घोषणा केली होती. गतवर्षी जिल्हा परिषदेने या योजनेला मंजुरी दिली आहे. मात्र आजमितीला …

Read More »

स्थानिकांची घरे पाडू नका

अलिबाग तालुका भाजपची मागणी अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनार्‍यावर सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून बांधण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामे पाडण्यासंदर्भात  रायगड जिल्हा प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. संबंधितांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. या कारवाईतून स्थानिकांची जुनी घरे, कॉटेजेस् वगळण्यात यावीत, अशी मागणी अलिबाग तालुका भाजप कमिटीतर्फे करण्यात आली आहे. भाजपच्या  शिष्टमंडळाने …

Read More »

खंडाळा घाटातील अपघातप्रवण क्षेत्रात वाहतुकीस मनाई

महामार्ग पोलिसांनी केला दस्तुरी-गारमाळ वळण रस्ता बंद खोपोली : प्रतिनिधी खंडाळा घाटात सोमवारी प्रवाशी बसला झालेल्या अपघाताला शॉर्टकटसाठी प्रतिबंध असलेला दस्तुरी वळण रस्ता कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महामार्ग पोलिसांनी हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या आहेत. या दस्तुरी वळण रस्त्याच्या दोन्ही बाजूला मातीचा भराव टाकून व बॅरिगेट …

Read More »

खोपोलीत शांतता कमिटीची बैठक

खालापूर : प्रतिनिधी  ईद-ए-मिलाद या सणाच्या पार्श्वभूमिवर खोपोली पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील वाहतूक कोंडीसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत उपस्थितांनी प्रामुख्याने वाहतुकोंडीची समस्या मांडली. शहरात रस्त्यावर नो पार्किगची व्यवस्था करण्यासाठी  नगरपालिका प्रशासनाशी चर्चा करू असे पोलीस निरीक्षक धनाजी क्षिरसागर यांनी सांगितले. बोघाटातून …

Read More »

आमदार महेंद्र दळवी यांचा चौलमध्ये सत्कार

रेवदंडा : प्रतिनिधी चौल ज्येष्ठ नागरिक संघाचा चतुर्थ वर्धापनदिन चौलनाका येथील सभागृहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महायुतीचे नवनिर्वाचीत आमदार महेंद्र दळवी यांच्या सत्कार करण्यात आला. हा सत्कार म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी दिलेला आशीवार्द असल्याचे सांगून आमदार दळवी यांनी ज्येष्ठ नागरिकासाठी चांगले काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. कार्यक्रमाचे उद्घाटन विद्वांससर यांच्या …

Read More »

घोड्यांच्या लीदपासून गॅसनिर्मिती

कर्जत : बातमीदार  माथेरानमध्ये पर्यटकांना पॉईंट व इतरत्र फिरविण्यासाठी घोडा हे प्रमुख वाहन आहे. या घोड्यांची लिद सर्वत्र पडते, तिची बाधा पर्यावरणाला पोहोचते. मात्र या लिदीपासून गॅस निर्मिती करण्यात नगरपालिकेला यश आले आहे. या लिदीवर प्रक्रिया करून त्यापासून गॅस निर्मिती करण्यास सुरुवात झाली आहे. माथेरानमध्ये एकूण 462 प्रवासी वाहन घोडे …

Read More »

खालापुरातील बोंबल्या विठोबाच्या यात्रेची लगबग

खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील खोपोली-पेण रस्त्याला लागूनच ताकई येथे धाकटी पंढरी अशी ओळख असलेल्या विठ्ठल मंदिरातील यात्रेस येत्या कार्तिकी एकादशी म्हणजेच 8 नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. त्यामुळे परिसर स्वच्छ करुन यात्रेसाठीचे नियोजन जोरदार सुरू आहे. सलग 15 दिवस चालणार्‍या या यात्रेत संपूर्ण रायगड, ठाणेसह मुंबई, पुणे व महाराष्ट्रातील लाखो …

Read More »

पेणमध्ये पिसाळलेल्या गाईचा धुमाकूळ

पेण : प्रतिनिधी शहरातील म्हाडा कॉलनीत बुधवारी (दि. 6) पिसाळलेल्या गाईने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या गाईने दिवसभरात एका महिलेसह अनेक जणांना जखमी केले. या घटनेमुळे शहरातील भुंडा पूल ते म्हाडा कॉलनी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास या गाईला पकडण्यात लोणावळा येथील शिवदुर्ग …

Read More »

अशोक मित्तल यांच्या हॉलिडे रिसॉर्टवर आज पडणार हातोडा

अलिबाग : प्रतिनिधी प्रसिद्ध उद्योगपती अशोक मित्तल यांनी अलिबाग तालुक्यात कोळगाव येथे सीआरझेडचे उल्लंघन करून अनधिकृतपणे बांधलेल्या हॉलिडे रिसॉर्टचे वाढीव बांधकाम शुक्रवार (दि 8)पासून पाडण्यात येणार आहे. अलिबाग प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ यांनी गुरुवारी तेथे जाऊन पाहणी केली. बॉम्बे इन्व्हरमेन्ट अ‍ॅक्शन ग्रुप व इतर यांनी अशोक मित्तल यांच्या …

Read More »