मोहोपाडा : प्रतिनिधी रसायानीतील श्री समर्थ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण-अरविंद पाटील गेली सात वर्ष भावाच्या प्रेमापासून वंचित असणार्या 24 बहिणींना भाऊबीज करत आहेत. यंदाही त्यांनी हा उपक्रम राबविला. एड्स आजाराची जनजागृती करून आजाराने निराश झालेल्या बाधित रुग्णांमध्ये समुपदेशनद्वारे आनंदी जीवन जगण्याची उमेद निर्माण करून त्यांचे आयुष्य सुखकर करण्याचे कार्य …
Read More »आमदार मंदाताई म्हात्रे यांची मिनी सी-शोरला भेट
पुन्हा निवडून दिल्याबद्दल नागरिकांचे मानले आभार नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर मतदारसंघामध्ये वाशी, सानपाडा, नेरूळ, सीबीडी येथे मॉर्निंग वॉककरिता येणार्या ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग यांची बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई म्हात्रे सातत्याने भेट घेऊन त्यांच्या समस्या व मागण्या ऐकत असत. आता पुन्हा आमदारपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी आज सकाळी वाशी येथील मिनी …
Read More »एसीबीच्या कारवाईत घट
10 महिन्यांत केवळ आठ लाचखोर पकडले पनवेल : बातमीदार नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 10 महिन्यांत आठ लाचखोरांना पकडले असले, तरी मागील वर्षाच्या तुलनेत नवी मुंबई युनिटच्या कारवाया तीनने कमी झाल्या आहेत. त्या शिवाय या विभागाकडून केल्या जाणार्या कारवायांमध्ये लाचखोरांना शिक्षा होण्याचे प्रमाणदेखील फारच कमी आहे. मोठ्या अधिकार्यांना शिक्षा होण्याचे …
Read More »निकालापूर्वी अन् निकालानंतर…
महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले यांचा वारसा जोपासणारे राज्य म्हणून देशात ओळख आहे. राज्यात राजकीय वैमनस्य, जातीयता, सामाजिक विषमता तसेच जातीभेदाला थारा नाही. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांचे निकाल स्पष्ट झाले असून लोकसभेच्या सातारा मतदारसंघात अवघ्या पाच महिन्यांत झालेल्या या पोटनिवडणुकीत विद्यमान …
Read More »विधानसभा : लोकशाहीचे महामंदिर
विधानसभा हे लोकशाहीचे महामंदिर आहे. जनता जनार्दन हीच त्याची स्वयंभू सार्वभौम देवता. प्रतिनिधी हे त्या देवतेचे उपासक. त्या उपासकांचे सेवासाधनेचे संवाद म्हणजेच विधिमंडळातील चर्चा. सत्ता आणि सेवा, विरोध आणि विनोद, शक्ती आणि युक्ती, वाद आणि संवाद, कर्तृत्व आणि वक्तृत्व, मान आणि इमान, नय आणि विनय, निष्ठा आणि प्रतिष्ठा, सवाल आणि …
Read More »दिवाळीत 112.3 डेसिबल ध्वनी प्रदूषणाची नोंद
हरित फटाके संकल्पनेला नागरिकांचा प्रतिसाद; 15 वर्षांतील सर्वात कमी प्रदूषण अलिबाग : प्रतिनिधी राज्यात दिवाळी उत्साहात साजरी झाली असली तरी यावर्षी कानठळ्या बनवणार्या फटाक्यांचा आवाज अत्यंत कमी प्रमाणात ऐकायला मिळाला. गेल्या 15 वर्षांतील सर्वात शांत दिवाळी यंदा सर्वत्र साजरी झाल्याचे निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून दिवाळीतील ध्वनी प्रदूषण …
Read More »खालापूर तहसीलदारांचे शासकीय वाहन भंगार अवस्थेत; नवीन वाहनाची प्रतिक्षा
खोपोली : प्रतिनिधी तालुक्याचा कारभाराची जबाबदारी असलेल्या खालापूर तहसीलदारांचे शासकीय वाहन दोन वर्षापासून बंद असून, वर्षभरापूर्वी मागणी करूनही त्यांना अद्याप नवीन वाहन मिळालेले नाही. खालापूर तालुका वेगाने विकसित होत आहे. मोठे गृहप्रकल्प, कारखानदारीचा पसारा वाढत आहे. 2011च्या जणगणनेनुसार खालापूरची लोकसंख्या 2,07464 होती. त्यात आता प्रचंङ वाढ झाली असून तालुका विस्तारत …
Read More »कर्जत रेल्वेस्थानकातील पंखे गायब
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या कर्जत या महत्वाच्या स्थानकात लावण्यात आलेले पंखे रेल्वे प्रशासनाने काढून टाकले आहेत. त्यामुळे ऑक्टोबर हीटमध्ये या स्थानकात प्रवाशांवर घामाघुम होण्याची वेळ आली आहे. दरम्यान, त्याबाबत कर्जत पॅसेंजर असोसिएशनने रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून जाब विचारण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जत रेल्वे स्थानकात दक्षिणेकडे जाणार्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस …
Read More »राष्ट्रीय एकता दौडला अलिबागकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अलिबाग : प्रतिनिधी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा पोलीस दलातर्फे गुरुवारी (दि. 31) अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय एकता दौडला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती 31 ऑक्टोबर रोजी देशभरात साजरी होते. यानिमित्ताने जिल्हा पोलीस दलामार्फत अलिबाग शहरात एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग …
Read More »रायगडाला पावसाने झोडपले
अलिबाग : प्रतिनिधी दिवाळीत चार दिवस सुट्टीवर गेलेल्या पावसाने नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी रायगडकरांना भिजविले. शुक्रवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह अचानक आलेल्या या पावसाने रायगडकरांची तारांबळ उडविली. काही काळ तो चांगलाच रमला. येत्या 24 तासात रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यंदाचा मोसमी पाऊस उशिराने सुरू झाला आणि ऑक्टोबरनंतरही त्याचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper