Breaking News

Ramprahar Team

आम्ही प्लास्टिक वापरणार नाही, गावातही वापरू देणार नाही

मेंदडी गावात प्लास्टिकबंदी जनजागृती फेरी म्हसळा : प्रतिनिधी आम्ही प्लॉस्टिक वापरणार नाही आणि गावातही वापरू देणार नाही, अशा घोषणांनी मेंदडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावात फेरी काढून  प्लास्टिकबंदीविषयी जनजागृती केली. या वेळी मुलांनी चौक सभा घेऊन प्लास्टिक आपल्या गावाकडील वातावरणाला कसे घातक आहे, ते सांगितले. या वेळी स्वच्छतेची व …

Read More »

चांदोरे बौद्धवाडीत एकास मारहाण

आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल माणगाव : प्रतिनिधी किरकोळ कारणावरून चांदोरे बौध्दवाडी (ता. माणगाव)मधील एका इसमाला तिघा जणांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि. 2) संध्याकाळी घडली. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांदोरे बौद्धवाडी येथील फिर्यादी अनंत तुळशीराम तांबे (40) यांनी मंगळवारी (दि. …

Read More »

धुळीत हरवला नागोठणे-वाकण मार्ग

Exif_JPEG_420 नागोठणे : प्रतिनिधी  मुंबई-गोवा महामार्गाच्या नागोठणे ते वाकण या तीन किलोमीटर अंतरात पावसाळ्यात चिखलातून वाट काढत जाणार्‍या वाहनांना आता रस्त्यावर होणार्‍या धुळीला सामोरे जाऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. याबाबत संबंधित कामाच्या ठेकेदार कंपनीचे एक अधिकारी एस. एम. स्वामी यांना विचारले असता, या रस्त्यावर दररोज पाणी मारून रस्ता ओला ठेवण्याचा …

Read More »

लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी

मुरूड : प्रतिनिधी नांदगाव परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुरूड पोलिसांनी योगेश यशवंत तळेकर याला अटक करून मुरूड न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. अंगणामध्ये काही लहान मुली खेळत असताना योगेश  तळेकर याने एका मुलीस जबरदस्तीने एकांतात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, …

Read More »

जिल्ह्यातील कुपोषण कमी करायचे आहे -जिल्हाधिकारी

कर्जत : बातमीदार रायगड जिल्ह्यातील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात कुपोषण आहे. ते कमी करण्यासाठी नियोजनबद्ध काम सुरू आहे. कर्जतप्रमाणेच इतरत्रही कुपोषित बालकांसाठी उपचार केंद्रे सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी येथे केले. जिल्हा नियोजन मंडळाने दिलेल्या निधीमधून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात बाल उपचार केंद्र सुरू …

Read More »

अलिबागमध्ये काँग्रेसकडून दोन उमेदवार

राजेंद्र ठाकूरांपाठोपाठ अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर यांचा अर्ज अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाकडून उमेवारी मिळवण्यावरून ठाकूर कुटुंबात सुरू असलेले वाद चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेसने अधिकृत उमेदवार म्हणून रायगड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा अ‍ॅड. श्रध्दा ठाकूर यांना उमेदवारी दिली.  शुक्रवारी (दि. 4) त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी …

Read More »

सीकेटी महाविद्यालयाच्या एनएसएसचा प्लास्टिकमुक्त अभियान रॅलीत सहभाग

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पनवेल महानगरपालिका आयोजित स्वच्छता व प्लास्टिकमुक्ती अभियान रॅलीमध्ये सहभाग घेतला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीचे औचित्य साधून पनवेल महानगरपालिकेने आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत …

Read More »

सीकेटी विद्यालयात सौरऊर्जा कार्यशाळा यशस्वी

पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल, खांदा कॉलनी येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात नुकतीच गांधी जयंतीनिमित्त सौरऊर्जा या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबईचे उपप्राचार्य डॉ. नंदकिशोर चंदन यांच्या हस्ते झाले. त्यांनीही कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पाडण्यास …

Read More »

फुंडे हायस्कूलमध्ये तंबाखू मुक्तीची शपथ

पनवेल ः प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे येथे  बुधवारी (दि. 2) गांधी जयंतीनिमित्त तंबाखू मुक्तीची शपथ घेऊन महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीला विद्यालयाचे प्राचार्य मोहन पाटील, पर्यवेक्षक जी. सी. गोडगे, आशा मांडवकर, ज्युनिअर कॉलेज प्रमुख व्ही. के. कुटे इत्यादी …

Read More »

भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रभारी पटेल यांचा दौरा

उरण ः वार्ताहर भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चाचे रायगड जिल्हा प्रभारी तथा नवी मुंबई महानगरपालिका नगरसेवक मुनव्वर पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा दौरा नुकताच करण्यात आला. या दौर्‍यात रायगड जिल्ह्यातील अल्पसंख्याकांनी भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चात महाड येथे प्रवेश केला. या वेळी रायगड जिल्हा अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष शहनवाज मुकादम, रायगड …

Read More »