उरण : शहरातील कामठा येथील श्री राधाकृष्ण मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवास जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्यासह नगरसेवक कौशिक शहा, राजेश ठाकूर, धनंजय कडवे, संतोष ओटावकर यांनी भेट देत देवीचे दर्शन घेतले. मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष कैलास माळी, उपाध्यक्ष बाबुराव हंडोरे, कार्याध्यक्ष दिनेश पाटील, सचिव विजय …
Read More »चिर्ले येथे वन्यजीव सप्ताह साजरा
उरण ः वार्ताहर जागतिक वन्यजीव सप्ताहाच्या अनुषंगाने उरण तालुक्यातील चिर्ले येथे वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था आणि वनखाते यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. निसर्ग संतुलन राखण्यासाठी वन्यजीवांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वन्यजीव वाचवा निसर्ग वाचवा हा मंत्र घेऊन वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था कार्यरत आहे. वन्यजीवांच्या होणार्या बेसुमार हत्या …
Read More »पेंटाग्राफला आग, हार्बर रेल्वे विस्कळीत
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त हार्बर मार्गावरील वाशी रेल्वेस्थानकात लोकलच्या पेंटाग्राफला आग लागल्यामुळे पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक बुधवारी (दि. 9) विस्कळीत झाली. ट्रेनच्या पेंटाग्राफवर अज्ञाताने बॅग फेकल्याने ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेत कोणालाही इजा झाली नसली तरी ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने चाकरमान्यांना नाहक …
Read More »पिरकोनमधील युवक भाजपत
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील पिरकोन येथील असंख्य कार्यकर्त्यांनी दसर्याच्या मुहूर्तावर मंगळवारी (दि. 8) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमास भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, उरणच्या नगराध्यक्ष सायली सविन म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, शहर अध्यक्ष …
Read More »आंबेनळी घाटातील दरडींची टांगती तलवार
तालुक्यातील पोलादपूर ते महाबळेश्वर रस्त्यावरील खड्ड्यांनी आता भयंकर रूप धारण केले असून दुचाकी आणि चारचाकी वाहनांना आदळत आपटत प्रवास करावा लागत असल्याचे दृश्य येथे रोजच दिसून येत आहे. अशातच यंदा झालेल्या विक्रमी मुसळधार पावसामुळे आंबेनळी घाटामध्ये ठिकठिकाणी दरडी कोसळल्याने पार आणि प्रतापगडावर रविवारी नवरात्रोत्सवानिमित्त आश्विन शुध्द अष्टमीला देवीच्या दर्शनाला जाणार्या …
Read More »माथेरानमध्ये दसर्याच्या सणाला घोड्यांची पारंपरिक मिरवणूक
कर्जत : बातमीदार वाहनांना बंदी असल्याने माथेरानमधील प्रमुख वाहन घोडा असून, येथील लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून घोड्याला विशेष महत्त्व दिले जाते. दसर्याच्या मुहूर्तावर मंगळवारी (दि. 8) अश्वचालकांनी सजवलेल्या घोड्यांची विधिवत पूजा करून माथेरानमध्ये मिरवणूक काढली होती. दसर्याच्या दिवशी मंगळवारी दुपारी दोन वाजता घोडेमालकांनी आपल्या घोड्यांच्या खुरांची पूजा केली व फुलांचे …
Read More »आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सकस विचारांची पेरणी आवश्यक -वेच्या गावित
कर्जत : बातमीदार आदिवासी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी सकस विचारांची पेरणी करण्याची गरज असल्याचे मत राज्य शिक्षण विभागाचे मार्गदर्शक शिक्षक वेच्या गावित यांनी कर्जत तालुक्यातील पिंगळस येथील आश्रमशाळेत व्यक्त केले. आदिवासी विद्यार्थ्यांनी भविष्यात चांगले ध्येय गाठावे यासाठी राज्य प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि रायगड जिल्ह्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळा यांच्या माध्यमातून अकरावीच्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद …
Read More »खालापूर तालुक्याला वादळी वार्याचा तडाखा
आदिवासी पाड्यावर घरांचे नुकसान खालापूर : प्रतिनिधी परतीच्या पावसाने सोमवारी (दि. 7) संध्याकाळी खालापूर तालुक्यात धुमाकूळ घातला. या वेळी वादळी वार्याने अनेक घरांचे नुकसान केले, तर काही ठिकाणी उभी पिके जमीनदोस्त केली. सोमवारी संध्याकाळी झालेल्या वादळी पावसाने खालापूर तालुक्यामधील भिलवले आदिवासी वाडीतील अनेक झोपड्या जमीनदोस्त केल्या, तर काही झोपड्यांचे छप्परही …
Read More »‘ईडी’च्या कारवाईबाबत स्थानिक प्रशासन अनभिज्ञ
वाधवान बंधूंच्या अलिबाग येथील फार्म हाऊसवर कारवाई अलिबाग : प्रतिनिधी पंजाब आणि महाराष्ट्र बँक (पीएमसी) प्रकणात अडकलेल्या राकेश आणि सारंग वाधवान यांच्या अलिबागमधील आवास येथील फार्म हाऊसवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी (दि. 7) छापा टाकला. वाधवानच्या जवळचे सहकारी कोण होते याचा शोध ईडी घेत आहे, मात्र या कारवाईबाबत जिल्हा प्रशासन …
Read More »विकास फक्त महायुतीच करू शकते -विनोद घोसाळकर
श्रीवर्धन : प्रतिनिधी दसर्याच्या शुभमुहूर्तावर श्रीवर्धनची ग्रामदेवता श्री सोमजाई देवीचा आशीर्वाद घेऊन शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांनी मंगळवारी (दि. 8) सकाळी प्रचाराला सुरुवात केली. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 14 उमेदवार नशीब आजमावत असून, त्यापैकी शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांनी सपत्नीक दसर्याच्या मुहूर्तावर सोमजाई मातेच्या चरणी श्रीफळ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper