मुंबई-गोवा महामार्गाने कोकणात स्वतःच्या वाहनाने किंवा एसटीने जाताना महाडच्या आधी तीन किमीवर डावीकडे असलेल्या डोंगरात कोरलेली लेणी आपले लक्ष वेधून घेतात. हीच ती गांधारपाले लेणी. संशोधकांसाठी ही पर्वणी आहे. पर्यटनाच्या दृष्टीने या ठिकाणाकडे पाहायला हवे. या लेण्यांचा अजूनही वेगवेगळ्या अंगांनी अभ्यास व्हायला हवा. गांधारपाले गावाला लागून असलेल्या टेकडीवर पूर्वाभिमुखी लेणी …
Read More »फुटणार प्रचाराचे नारळ
याच महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका असल्यामुळे दसरा हा प्रामुख्याने निवडणूक प्रचाराचा नारळ फोडण्याचा दिवस ठरणार आहे. गेल्या आठवडाभरात उमेदवारनिश्चिती झाल्याने दसर्याला बहुतेक मतदारसंघांमध्ये निरनिराळ्या लहानमोठ्या पक्षांचे उमेदवार आपापल्या प्रचाराचा आरंभ करतील हे निश्चित. दसरा अर्थात विजयादशमी हा हिंदुंच्या प्रमुख सणांपैकी एक. वर्षभरातील तीन अत्यंत शुभ तिथींमध्येही दसर्याचा समावेश केला जातो. …
Read More »यात्रेसाठी जाणार्या मित्रांना बसने चिरडले
औरंगाबाद : प्रतिनिधी शहरातील कर्णपुरा देवीच्या यात्रेला पायी जाणार्या सहा मित्रांना भरधाव बसने चिरडले. यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. नवरात्रोत्सवात औरंगाबाद शहरातील लाखो भाविक दररोज पहाटे कर्णपुरा येथे देवीच्या दर्शनाला पायी जातात. औरंगाबाद-जालना मार्गावर सेव्हनहील …
Read More »इमारतीच्या पार्किंगमधील वाहनांना लावली आग
पुणे : प्रतिनिधी पुणे शहरात मागील काही महिन्यापासून चार चाकी आणि दुचाकी वाहनाच्या गाडीच्या काचा फोडणे, वाहने जाळून टाकण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून आज पुन्हा पर्वती पायथा येथील एका इमारतीच्या पार्किंगमधील 11 वाहनांना एकाने आग लावल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती पायथा, सानेगुरुजी …
Read More »पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे सोमवारी पनवेलकरांनी मुग्धाताई लोंढे यांच्या अचानक झालेल्या एक्झिटने पुन्हा एकदा अनुभवले असे म्हणायला हरकत नाही. सोमवारची सकाळ पनवेलकर सगळे आमदार प्रशांत ठाकूर यांचा विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करायचा म्हणून उत्साहात होते. भगवे फेटे बांधून आलेल्या प्रत्येकाच्या चेहर्यावर उत्साह आणि आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. …
Read More »धम्मचक्रप्रवर्तन दिनासाठी आंतरराष्ट्रीय विद्वान
नागपूर : प्रतिनिधी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागवंशीयांच्या भूमीत लाखो वंचितांना तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा धम्म दिला. त्या धम्मक्रांतीचा 63वा वर्धापन दिन सोहळा मंगळवारी (दि. 8) सायंकाळी 6 वाजता दीक्षाभूमीवर साजरा होणार आहे. अध्यक्षस्थानी डॉ. आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई …
Read More »निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धनमध्ये पोलीस संचलन
श्रीवर्धन : प्रतिनिधी विधानसभा निवडणूक नि:पक्षपातीपणे व शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने यंत्रणेला आचारसंहितेचे अतिशय काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने शनिवारी (दि. 5) संध्याकाळी श्रीवर्धन पोलीस ठाण्यातर्फे शहरात संचलन करण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या काळात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी श्रीवर्धन शहरातील एसटी स्टॅण्ड, …
Read More »रविशेठ पाटील यांचा आज नागोठणे विभागात प्रचाराचा शुभारंभ
पेण : प्रतिनिधी नागोठणे येथील जोगेश्वरी मातेचे सोमवारी (दि. 7) सकाळी 10 वाजता दर्शन घेतल्यानंतर शिवसेना-भाजप-आरपीआय-रासप- शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांच्या नागोठणे विभागातील निवडणूक प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. माजी आमदार अनिलभाऊ तटकरे, जिल्हा परिषद सदस्य किशोरशेठ जैन, भाजप जिल्हा उपाध्यक्ष मारुती देवरे, रोहा तालुका अध्यक्ष समीर शेडगे, सोपान जांबेकर, …
Read More »विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी
माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीची स्थापना अलिबाग : जिमाका विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीची (मीडिया सर्टीफिकेशन अॅण्ड मॉनिटरिंग कमिटी चउचउ) स्थापना करण्यात आली आहे, तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणिकरण व …
Read More »खारपाले टाक्याचीवाडी येथील कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश
पेण ़: प्रतिनिधी तालुक्यातील खारपाले ग्रामपंचायत हद्दीमधील टाक्याचीवाडी येथील ग्रामस्थांनी माजी मंत्री रविशेठ पाटील यांचे नेतृत्व स्वीकारत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांचे रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांनी पक्षात स्वागत केले. या वेळी खारपाले ग्रामपंचायत सदस्य राजेश तुकाराम शिवकर, डॉ. रवींद्र केणी, नरेश म्हात्रे, रामदास शिवकर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper