नागोठणे : प्रतिनिधी अंबा नदीवरील नागोठणे पुलाची पुरांमध्ये पडझड होऊन दुरवस्था झाली असून, त्याकडे संबधित खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. वरवठणेतील तरुणांनी या पुलाच्या दोन्ही बाजूकडील गवत, तसेच पुराच्या पाण्यात अडकलेला सर्व कचरा साफ केला. नागोठणे शहराचे वैभव असलेले, तसेच साडेचारशे वर्षापूर्वी नागोठणे-वरवठणे आणि रोहा या गावांना जोडणार्या येथील अंबा नदीवरील …
Read More »केंद्र सरकारी कर्मचार्यांना खूशखबर
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था केंद्र सरकारने आपल्या कर्मचार्यांच्या पेन्शन नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले असून याचा लाभ केंद्रीय कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना होणार आहे. सरकारने केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम, 1972 मधील 54 व्या नियमांत बदल केला आहे. त्यामुळे सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना मिळणार्या फॅमिली पेन्शनमध्ये वाढ होणार आहे. 1 …
Read More »माणगावात भाजपची बैठक
नऊ संकल्प घरोघरी पोहचविण्यासाठीचे होणार नियोजन माणगाव : प्रतिनिधी भाजपचे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष कृष्णा कोबनाक व विधानसभा प्रभारी राजेश मपारा यांच्या नेतृत्वाखाली श्रीवर्धन विधानसभा क्षेत्रातील श्रीवर्धन, म्हसळा, तळा, रोहा व माणगाव या ठिकाणी महासंकल्प अभियान राबविण्यात येत आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी शुक्रवारी (दि. 27) सकाळी 11 वाजता माणगाव येथील …
Read More »‘कर्जतचा पुढचा आमदार हा भाजपचाच असेल’
बूथ अध्यक्ष आणि शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक उत्साहात कर्जत : बातमीदार कार्यकर्ते ही भाजपची ताकद असून, कर्जत विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद मोठी आहे. या मतदारसंघात परिवर्तन अटळ असून, येथील पुढील आमदार भारतीय जनता पक्षाचाच असेल, असा विश्वास माजी आमदार देवेंद्र साटम यांनी बुधवारी (दि. 25) कर्जतमध्ये व्यक्त केला. कर्जत विधानसभा …
Read More »इनोव्हा जाळल्याने नेरळमध्ये खळबळ; गुन्हा दाखल
कर्जत : बातमीदार नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील गंगानगर भागात राहणारे चंद्रकांत बोंबे यांची इनोव्हा (एमएच-03, एडब्लू-1315) गाडी मंगळवारी (दि. 24) रात्री अज्ञात लोकांनी जाळून टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. चंद्रकांत बोंबे यांनी त्यांची इनोव्हा गाडी नेहमीप्रमाणे इमारतीच्या खाली उभी केली होती. या गाडीला आग लागल्याचे आजूबाजूच्या रहिवाशांना दिसल्याने त्यांनी आरडाओरड …
Read More »नेरळमध्ये घरफोडी
कर्जत : बातमीदार नेरळ गावातील गंगानगर भागात घरफोडी झाली असून, त्यात अज्ञात चोरट्यांनी 53 हजारांची रोख रक्कम आणि तब्बल आठ लाख 56 हजारांचे दागिने लंपास केले आहेत. गंगानगर भागात स्वप्नील मधुकर लिंडाइत (31) यांचे घर आहे. मंगळवारी (दि. 24) रात्री त्यांच्या घराचा दरवाजा फोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी …
Read More »माथेरानमध्ये घरातील सिलिंडरला आग
कर्जत : बातमीदार थेरानमधील नागेश कदम यांच्या घरात स्वयंपाक सुरू असताना बुधवारी सकाळी गॅस सिलिंडरने पेट घेतला. स्वयंपाकघरात काम करीत असलेल्या महिलांना काहीही समजले नाही. सर्वत्र पळापळ सुरू झाली. शेजारी व मित्रमंडळींच्या प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणण्यात आली. नागेश कदम यांच्या घरात बुधवारी श्राद्धानिमित्त स्वयंपाक सुरू होता. पाच-सहा महिला काम …
Read More »निवडणुकीसाठी कर्मचार्यांना प्रशिक्षण
अलिबाग : जिमाका रायगड जिल्ह्यातील सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचार्यांनी निवडणुकीचे काम पारदर्शक, नियोजनबध्द व निःपक्षपातीपणे करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी (दि. 25) येथे दिले. अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहात बुधवारी सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचार्यांसाठी विधानसभा निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. …
Read More »नवरात्रोत्सवावर आचारसंहितेचे सावट
राजकीय जाहिरातदार घटले; मंडळांना आर्थिक चणचण खोपोली : प्रतिनिधी नवरात्रोत्सव मंडळांना राजकीय नेते व कार्यकर्ते दरवर्षी जाहिरातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी देतात, मात्र यावर्षी आचारसंहितेमुळे जाहिरातींवर बंधने आल्याने राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी मंडळांना निधी देण्यास हात अखडता घेतला आहे. त्यामुळे यंदा नवरात्रोत्सव मंडळांसमोर आर्थिक चणचण निर्माण होत आहे. आगामी …
Read More »खोपोलीत पीएमसी बँकेबाहेर ग्राहकांची दुसर्या दिवशीही गर्दी
खोपोली : प्रतिनिधी रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध लादल्यावर पीएमसी बँकेत खळबळ उडाली आहे. खातेदारांनाही धक्का बसला आहे. पीएमसी बँकेचे खोपोलीत हजारो खातेदार आहेत. आपल्या खात्यातील रक्कम व ठेवींचे काय, याबाबत ठेवीदार चिंतेत सापडले आहेत. याचा जाब विचारण्यासाठी दुसर्या दिवशी बुधवारीही सकाळपासून पीएमसी बँकेच्या खोपोली शाखेत व शाखेबाहेर खातेदारांनी गर्दी केली होती. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper