Breaking News

Ramprahar Team

महाराष्ट्रातील 46 पोलिसांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान

मुंबई : प्रतिनिधी स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात येणार्‍या राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील एकूण 46 पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर झाली आहेत. त्यातील पाच जणांना विशेष सेवेसाठी, तर 41 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पाच अधिकार्‍यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील …

Read More »

रायगड जिल्ह्यातील एकही ग्रामपंचायतीला लाल कार्ड नाही

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत अशुद्ध होण्याचे प्रमाण घटले आहे. पिण्याच्या पाण्याचे धोकादायक स्त्रोत मिळाल्यामुळे दिले जाणारे लालकार्ड यंदा एकाही ग्रामपंचायतीला मिळालेले नाही. 62 ग्रामपंचायतीमध्ये मध्यम जोखमीचे स्त्रोत आढळले, त्यांना पिवळे कार्ड देण्यात आले. सुरक्षित स्त्रोत असलेल्या 746 ग्रामपंचायतीना हिरवे कार्ड देण्यात आले आहे. जनतेला शुद्ध व …

Read More »

‘त्या’ निर्णयाचा काश्मिरींनाच फायदा

राष्ट्रपती कोविंद यांचा विश्वास नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटविण्याचा घेण्यात आलेला निर्णय आणि जम्मू-काश्मीर व लडाखबाबत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे काश्मिरी जनतेचा अधिकच फायदा होईल, असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना संबोधित करताना राष्ट्रपती बोलत होते. रामनाथ कोविंद यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच देशवासीयांना …

Read More »

पोलादपुरात सोनसाखळी चोरट्यास अटक

पोलादपूर : प्रतिनिधी  मुंबईला जाण्यासाठी महामार्गावर  उभ्या असलेल्या प्रवाशाची सोन्याची चेन चोरून पसार झालेल्या चोरट्याला पोलादपूर पोलिसांनी केवळ तीन तासात गजाआड केले. पोलादपूर तालुक्यातील तुर्भे खुर्द गोळयांचीवाडी येथील  मनोहर बाबाजी सुर्वे हे शनिवारी सकाळी मुंबई येथे जाण्यासाठी पोलादपूर एसटी स्थानकाबाहेर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उभे होते. त्यावेळी तेथे आलेल्या मोटारसायकलस्वाराने तो …

Read More »

कोलाड ज्वेलर्स असोसिएशनतर्फे पूरग्रस्तांना 400 ब्लँकेट्स

रोहा : कोलाड ज्वेलर्स असोसिएशनतर्फे पूरग्रस्तांना देण्यासाठी 400 ब्लँकेट्स तहसीलदार कविता जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष राकेश जैन, भरत जैन, मनोज जैन, सतीश जैन, विकी जैन, उज्ज्वल कारेकर, किरण लाडगे, नायब तहसीलदार राजेश थोरे या वेळी उपस्थित होते.

Read More »

निवृत्ती माधव महाराज यांना पुरस्कार जाहीर

श्रीवर्धन : प्रतिनिधी नामदेव शिंपी समाज युवक संघातर्फे दिला जाणारा हुतात्मा हिरवे गुरुजी समाज भूषण पुरस्कार शिंपी समाजातील ह.भ.प. निवृत्ती माधव महाराज नामदास यांना जाहीर झाला असून, गुरुवारी (दि. 15) सकाळी पनवेलमध्ये होणार्‍या कार्यक्रमात तो प्रदान करण्यात येणार आहे. गोवा मुक्तिसंग्रामात तुळशीराम बाळकृष्ण उर्फ हिरवे गुरुजी शहीद झाले. हु. हिरवे …

Read More »

कर्जतची सरकारी कार्यालये प्लास्टिकच्या वेष्टनाखाली

कर्जत : बातमीदार तालुक्यातील शासकीय कार्यालयांच्या इमारती जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात या सर्व इमारतींवर प्लास्टिक आच्छादने टाकावी लागतात. त्यासाठी यावर्षी तब्बल 1800 चौरस मीटर प्लास्टिक कापड आणण्यात आले आहे. कर्जत तहसील कार्यालय परिसरातील सर्व इमारती ब्रिटिशकालीन असून, त्यांच्या छपराला छिद्रे पडली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती …

Read More »

खोपोली-पनवेल बसला अपघात

खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावरून चाललेल्या ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणारी एसटी बस ट्रकवर आदळली. विणेगाव (ता. खालापूर) हद्दीत बुधवारी (दि. 14) सकाळी झालेल्या या अपघातात बस चालकासह एकूण 15 लोक जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसटी बस (एमएच-20, बीएल-2232) बुधवारी सकाळी खोपोलीहून पनवेलला जात होती. …

Read More »

पेण पालिकेतर्फे विकासकामांचा धूमधडाका

रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन व लोकार्पण पेण : प्रतिनिधी पेण नगर परिषदेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण बुधवारी (दि. 14) पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते व सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. स्वच्छ भारत अभियान नागरी अंतर्गत उभारण्यात आलेल्या आंबेगाव …

Read More »

अलिबागेत नारळी पौर्णिमा उत्साहात

अलिबाग : प्रतिनिधी सन् आयलाय गो, आयलाय गो… नारली पूनवचा… मनी आनंदू मावना कोल्यांचे दुनियेचा… या गीताची आठवण करून देणारा नारळी पौर्णिमेचा सण बुधवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सणाचे पारंपरिक स्वरूप काही प्रमाणात बदलले असले तरी उत्साह कायम असल्याचे पाहायला मिळाले. श्रावण महिना सुरू झाला की सुरुवात होते …

Read More »