Breaking News

Ramprahar Team

पहिला पाऊस

ऊन जरा जास्त आहे अस दरवर्षी वाटते. यावर्षी पाऊस चांगलाच लांबला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या प्रत्येकाच्या मनात पाऊस कधी एकदा पडतोय असे झाले होते. पाऊस येतो आपल्या मर्जीने, पाऊस जातो आपल्या मर्जीने, हवामान खात्याच्या नाही हेच खरे असल्याचे सांगत तो आला एकदाचा. पाऊस पडला आणि सगळ्यांनी निश्वास सोडला. पहिल्या पावसात …

Read More »

नागोठण्यात मटण मार्केटची भिंत कोसळली

व्यावसायिकांना जागा खाली करण्याचा आदेश Exif_JPEG_420 नागोठणे ः प्रतिनिधी  सलग दोन-तीन दिवस पडणार्‍या पावसाने शनिवारी सायंकाळी येथील चिकन-मटण बाजाराच्या मुख्य इमारतीची पश्चिम बाजूकडील भिंत कोसळण्याची दुर्घटना घडली असून यात कोणीही जखमी झाले नाही. इमारत जुनी झाली असली तरी ग्रामपंचायत त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे काही जणांकडून सांगण्यात आले. ही दुर्घटना घडल्यानंतर …

Read More »

युवा मोर्चा अध्यक्षपदी शिवाजी पाटील

पेण ः पेण तालुक्यात भाजपची ध्येयधोरणे व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदी गागोदे येथील शिवाजी पाटील यांची निवड करण्यात आली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, म्हाडा अध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद विरोधी …

Read More »

पाली-खोपोली रस्त्याची दुरवस्था

वाहनचालकांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास सुधागड ः प्रतिनिधी अत्यंत महत्त्वाचा असलेला रस्ता म्हणजे खोपोली-पाली -वाकण रस्ता मुंबई-पुणे द्रुतगती मार्गजवळ असून या मार्गावरून येणार्‍या वाहनांना मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय म्हणूनही हा रस्ता सोयीचा व जवळचा आहे. त्यामुळे या रस्त्यावरून रहदारी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यातच पाली हे अष्टविनायकापैकी महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. साहजिकच …

Read More »

नाणार प्रकल्पातून जिल्ह्याचा कायापालट होईल

भाजप रोहे तालुका उपाध्यक्ष प्रकाश मोरे यांचा विश्वास नागोठणे : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यात होणारा नाणारचा तेल शुद्धिकरण प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे रद्द करून तो रोहे तालुक्यासह इतर तीन तालुक्यांतील 40 गावांमध्ये येत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच घोषणा केली आहे. या प्रकल्पामुळे या चार तालुक्यांसह संपूर्ण रायगडचा निश्चितच कायापालट होणार …

Read More »

तलाठी भरती परीक्षा उद्यापासून

अलिबाग : महसूल विभागाच्या अखत्यारितील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी मंगळवारी (दि. 2) परीक्षांना सुरुवात होत आहे. 2 ते 26 जुलै या कालावधीत या परीक्षा होणार आहेत. या परीक्षा घेण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. या परीक्षेसंदर्भात उमेदवारांना काही माहिती हवी असल्यास अथवा तक्रार असल्यास त्यासाठी टोल फ्री क्रमांक व ई-मेल सुविधाही …

Read More »

वळवण आणि शिरोंडा धरणाचे पाणी कर्जतच्या मदतीला

कर्जत : बातमीदार पावसाळा वगळता कोरडी असलेली उल्हास नदी काही दिवसांपासून खंडाळा घाटातून अचानक आलेल्या पाण्यामुळे वाहू लागली होती. त्या बातमीचा माग घेतला असता उल्हास नदीचा उगम ज्या लोणावळ्याच्या पायथ्याशी होतो, त्या ठिकाणी टाटाच्या दोन धरणांचा आऊटलेट असून त्यातून ते पाणी सोडले असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, पाटबंधारे खात्यानेदेखील त्याची …

Read More »

म्हसळा समन्वय समितीच्या बैठकीत अधिकार्यांची झाडाझडती

गैरहजर अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा तालुका समन्वय समितीची सभा नुकताच समितीचे अध्यक्ष शैलश पटेल यांच्या अध्यक्षतेखाली येथील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात झाली. या बैठकीमध्ये तालुक्यातील कामचुकार अधिकार्‍यांची झाडाझडती घेण्यात आली, तर गैरहजर अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यास एकमताने मंजुरी देण्यात आली. समितीचे अध्यक्ष शैलश पटेल यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

अलिबागमध्ये भाजप पदाधिकार्यांच्या नियुक्त्या

अ‍ॅड. परेश देशमुख सरचिटणीस, अ‍ॅड. पल्लवी तुळपुळे महिला मोर्चा अध्यक्षा अलिबाग : प्रतिनिधी भाजप अलिबाग तालुक्याची बैठक शुक्रवारी (दि. 28) पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रमुख पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. अलिबाग विधानसभा मतदारसंघ सरचिटणीसपदी अ‍ॅड. परेश देशमुख, अलिबाग विधानसभा मतदारसंघ महिला …

Read More »

‘ते’ बांधकाम तोडावे, अन्यथा जनआंदोलन

भाजप नेते अण्णा कंधारे यांचा इशारा; शेगवाडा परिसरातील लोकांना वेठीस धरण्याचे काम मुरूड : प्रतिनिधी शहरातील शेगवाडा परिसरातील नाल्यावर मुरूड नगर परिषदेने केलेल्या बांधकामामुळे पावसाळ्यात तेथील घरांत व बागायत जमिनीत पाणी घुसून नागरिकांच्या मालमतेचे नुकसान होणार आहे. हे बांधकाम त्वरित तोडावे, अन्यथा जनआंदोलन उभे करून नगर परिषदेला जेरीस आणल्याशिवाय स्वस्थ …

Read More »