Breaking News

Ramprahar Team

दिवेआगर समुद्रात बंदी असतानाही बोटींग

दिवेआगर ः प्रतिनिधी  दिवेआगर समुद्रात पर्यटकांच्या मौजेसाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या परवानगीने साहसी खेळ प्रकारातील स्पीड बोटींची सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र पावसाळा सुरू होण्याआधी 25 मेपर्यंतच स्पीड बोट सुरू ठेवण्याची परवानगी आहे. मात्र मेरिटाइम बोर्डाचा आदेश धुडकावून दिवेआगर समुद्रात 15 व 16 जून या सुटीच्या दिवशी खवळलेल्या समुद्रात बोटींग …

Read More »

चौक भाजप महिला मोर्चाच्या विविध पदांच्या नियुक्त्या

रसायनी : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत भाजपला सुयश मिळाल्याने स्थानिक पातळीवर पक्षवाढीसाठी महिला संघटना नेमणूक करण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः महिला मोर्चासाठी बांधणी सुरू झाली आहे. ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद विभागप्रमुखपर्यंत या नेमणुका आहेत. रायगड जिल्हा भाजप अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या आदेशानुसार व महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली ग्रुप ग्रामपंचायत चौकच्या महिला …

Read More »

स्वच्छ सर्वेक्षणात सक्रियपणे सहभाग घ्या -नगराध्यक्षा पाटील

पेण : प्रतिनिधी स्वच्छ सर्वेक्षणात सक्रिय सहभाग घेऊन, नागरिकांनी आपला परिसर व आपले शहर स्वच्छ ठेवावे, असे आवाहन नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी गुरूवारी (दि. 20) येथे केले. महाराष्ट्र नागरी विकास अभियान विभागाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण पेणमधील हॉटेल, शाळा, रूग्णालय, निवासी संकुल, शासकीय कार्यालये, बाजारपेठ, रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणच्या स्वच्छतेबाबत नगर …

Read More »

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

आरोपीस 10 वर्षांचा सश्रम कारावास अलिबाग : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीवर  बलात्कार करणार्‍या नराधमाला अलिबाग सत्र न्यायालयाने दहा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. उमेश पांडुरंग कोळी असे आरोपीचे नाव आहे.   आरोपी उमेश यांची त्या अल्पवयीन मुलीशी हातगाडीवर ओळख झाली होती. तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन उमेशने  पेण शहरातील विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर …

Read More »

पेण तालुक्यात तीन दिवसांत 52 जणांना श्वानदंश

पेण : प्रतिनिधी तालुक्यात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून, अवघ्या तीन दिवसांत तब्बल 52 जणांना श्वानदंश झाला आहे. त्यात जखमी झालेल्यांवर विविध रूग्णालयांत उपचार करण्यात आले. भटक्या कुत्र्यांमुळे पेण तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील तीन दिवसांत पेण शहरातील 37 जणांना तर तालुक्यातील अन्य गावातील 15 जणांना कुत्र्यांनी जखमी केले …

Read More »

शाळेस सॅनिटरी पॅड वेंडींग मशीन भेट

कर्जत : येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश सोनी आणि परिवार तसेच माहेश्वरी महिला मंडळ यांच्याकडून कर्जत महिला मंडळाच्या विद्याविकास शाळेस सॅनिटरी पॅड वेंडींग मशीन भेट देण्यात आली. या वेळी मंडळाच्या पद्मा सोनी, जसोदा सोनी, सुमित्रा डागा, विमल डागा, सुरेखा राठी, पुष्पा भुतडा, पूनम डागा, मुख्याध्यापिका मिना प्रभावकळर उपस्थित होत्या. नागोठण्यात आज …

Read More »

चेंढरेत उमेदवारांचे फाडले बॅनर

परिवर्तन आघाडीकडून तीव्र निषेध; ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला अलिबाग : प्रतिनिधी शहराला लागून असलेल्या चेंढरे आणि वरसोली ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच चेंढरे येथे शिवसेना, भाजप प्रणित परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांचे प्रचाराचे बॅनर फाडण्यात आले आहेत. आघाडीकडून त्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. चेंढरे आणि वरसोली ग्रामपंचायतीची निवडणूक …

Read More »

अलिबागची बदनामी करणार्यांवर कारवाईची मागणी

अलिबाग : प्रतिनिधी टिक टॉक या सोशल मीडिया साईडवर अलिबागची बदनामी करणारे व्हिडीओ व्हायरल करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी अलिबागकरांनी रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्याकडे निवेदनाद्वारे  केली आहे. टिक टॉकवर अलिबागची बदनामी करणारे व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे अलिबागकर संतप्त झाले आहेत. बुधवारी (दि. 19) अलिबागमधील तरूण एकत्र आले …

Read More »

बोर्लीत हॉटेल व्यावसायिकावर पर्यटकाचा प्राणघातक हल्ला

रेवदंंडा : प्रतिनिधी बिल अदा न करता पळून जाणार्‍या पर्यटकाने फुटलेच्या  काचेच्या बाटलीने हल्ला करून हॉटेल मालकास गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी (18 जून) बोर्ली येथे घडली. याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोर्ली येथील कमाने हॉटेलमध्ये मंगळवारी सायकाळी पुणे येथील पर्यटक आले होते. खरेदी झाल्यानंतर हॉटेल …

Read More »

खोपोलीत घनकचरा व्यवस्थापनाचे तीन तेरा

खोपोली : प्रतिनिधी शहरातील नाले व गटारे सफाईचा गाळ व कचरा पंधरा दिवस उलटले तरी तसाच पडून आहे. भाजी मंडई, मासळी मार्केट, विविध रहिवासी भाग, रस्ते व मोकळ्या जागेत जमा होत असलेला कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याने, खोपोलीत घनकचरा व्यवस्थापनाचे तीनतेरा वाजले आहेत. ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग निर्माण झाल्याने स्वच्छ खोपोली …

Read More »