Breaking News

Ramprahar Team

‘स्वच्छ भारत’मध्ये कामगारांचा मोठा वाटा -पाटील

पेण : प्रतिनिधी भारत स्वच्छता अभियाना अंतर्गत पेण नगर परिषदेने शहर स्वच्छतेबाबत चांगली कामगिरी बजावली असून, राज्याच्या मानांकनामध्ये स्वच्छतेबाबत पेण नगर परिषदेला 49वा मानांकन मिळाले आहे. या कामगिरीत सफाई कामगारांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी केले.  स्वच्छ भारत अभियानात सातत्य रहावे, या हेतुने राज्य शासनाने सफाई कर्मचार्‍यांचे …

Read More »

जलयुक्त शिवारचा मुख्य हेतू असफल

कर्जत तालुक्यात यावर्षी जलयुक्त शिवार अभियानाचा हेतू असफल झालेला दिसून येत आहे. तालुक्यातील आठ गावात जलयुक्त शिवार अभियानचे माध्यमातून जलसंधारणाच्या नावाखाली कामे झाली आहेत. मात्र जलसंधारण म्हणजे शेत तयार करणे नाही त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश बाजूला पडला असून गतवर्षी खुद्द या तालुक्याचे आमदार सुरेश लाड यांनी जलयुक्त शिवारवर …

Read More »

ममता-डॉक्टर संघर्ष सुरूच

डॉक्टरांवर हल्ला करणार्‍या व्यक्तींवर ठोस कारवाई झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी घेतली आहे. नेमक्या याच बाबतीत ममता बॅनर्जी कमी पडल्या. हल्ल्याने संतप्त झालेल्या डॉक्टरांना चुचकारण्याऐवजी त्यांनी संपाबद्दल डॉक्टरांनाच फैलावर घेतले. वरचेवर संपाचे हत्यार उगारणार्‍या डॉक्टरांमुळे सर्वसामान्य जनता भरडली जाते हे वास्तव कुणीही नाकारणार नाही. परंतु या समस्येकडे …

Read More »

सायकलवर प्रवास करून दिला पाणी बचत, स्वच्छतेचा संदेश

पनवेल : बातमीदार बारामतीहून 10 दिवस सायकलवर प्रवास करून स्वच्छता, पाणी बचत व किल्ले संवर्धनचा संदेश एक 48 वर्षाचा अवलिया देत आहे. 14 जून रोजी हा 48 वर्षीय अवलिया पनवेल येथे आला होता. यावेळी 1220 किलोमीटरचा प्रवास झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. सुभाष चौक, बारामतीहून निघालेले एकनाथ जनार्दन देशमाने (वय …

Read More »

रस्त्यावरील मुलांना मोफत शिकवणी

पनवेल : प्रतिनिधी रस्त्यावरील गरीब वंचित घटक नेहमीच शिक्षणापासून वंचित राहिला आहे. अशा या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मंजिरी ट्रस्ट खारघर शहरासह नवी मुंबईत कार्यरत आहे. मुलांना शाळेत प्रवेश देऊन त्यांना फावल्या वेळेत शिकवणी देण्याचे काम या ट्रस्टच्या मार्फत केले जाते. सुमुखी उमेश यांचे याकरिता मोलाचे योगदान आहे. या वर्षी …

Read More »

जेएनपीटी बायपासवरील काँक्रीट रस्त्यावर बेकायदा पार्किंग

पनवेल : बातमीदार महामार्गाच्या बाजूला शेवटच्या मार्गिकांवर अनेक ठिकाणी बेकायदा पार्किंग केल्याचे पाहायला मिळते, मात्र नव्याने रूंदीकरण करून काँक्रिटीकरण केलेल्या जेएनपीटी आम्रमार्गावरही महामार्गाच्या मधोमध पहिल्या मार्गिकेवर बेकायदा पार्किंग केली जात आहे. हाकेच्या अंतरावर असलेल्या कळंबोली वाहतूक शाखेकडून या वाहनांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. सायन-पनवेल महामार्ग, मुंब्रा-पनवेल, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग …

Read More »

स्पर्धा परीक्षा सेमिनार रविवारी

पनवेल : खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात रविवारी (दि. 16) सायंकाळी 5.30 वाजता यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, रेल्वे आदी स्पर्धा परीक्षांचे मोफत सेमिनार आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी प्रा. संजय हिरेमठ व इतर तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. या सेमिनारचा लाभ बारावी ते पदवीधर विद्यार्थी घेऊ शकणार असून जास्तीत जास्त …

Read More »

श्री समर्थ सद्गुरू दादामहाराज पुण्यतिथी सप्ताह

पनवेल : रामप्रहर वृत्त देवसागर साधक समाज (इंचगिरी संप्रदाय)तर्फे श्री समर्थ सद्गुरू दादामहाराज पुण्यतिथी सप्ताह सोहळा जय हनुमान मंदिर, न्हावा खाडी, उत्तरपाडा, ता. पनवेल येथे श्री. स.स. बाळासाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या उपस्थितीत होणार आहे. गुरुवारी (दि. 20) सकाळी 10 वाजता सोहळ्याला सुरुवात होऊन शनिवारी (दि. 22) दुपारी 12 वाजता माऊलींवर …

Read More »

कराडे खुर्द ग्रा.पं. निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचे पारडे जड

रसायनी : प्रतिनिधी कराडे खुर्द ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदाच्या उमेदवारीत तिरंगी लढत असून सरपंचपद हे अनुसूचित जाती महिला आरक्षित आहे. या निवडणुकीत भाजपच्या सरपंचपदाच्या उमेदवार भारती हेमंत चितळे व इतर प्रभागाचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील, असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटत आहे. आमदार प्रशांत  ठाकूर, महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली, विभागीय अध्यक्ष …

Read More »

आगीशी सामना

जीवन हे एका काचेच्या भांड्यासारखे आहे. कधी, कुठे अपघात वा घातपात होईल आणि क्षणात या जगाचा निरोप घ्यावा लागेल याची शाश्वती नाही. मग ते स्वतःच्या चुकीने असो वा कोणतीही चुकी नसताना केवळ दुसर्‍याच्या निष्काळजीपणामुळे नाहक निष्पापांचे बळी जात आहेत. मागील वर्षी पुण्यातील चौकात होर्डिंग सिग्नलवर उभ्या असणार्‍या वाहनांवर कोसळून चार …

Read More »