Breaking News

Ramprahar Reporters

चिंचवलीत भाजप चषक क्रिकेट स्पर्धा

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील चिंचवली येथे श्री राम क्रिकेट क्लब ब-च्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष चषक 2023 नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 31) झाले. …

Read More »

कोकणासह पश्चिम महाराष्ट्र तापणार!

मुंबई : प्रतिनिधी एप्रिल ते जूनदरम्यान महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे, तर एप्रिल महिन्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सामान्यपेक्षा अधिक दिवस उष्णता राहणार असल्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिना अधिक उष्ण असेल. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान, मागील दोन दिवस …

Read More »

विकासकामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही -आमदार महेश बालदी

रानसईत सामाजिक सभागृह उभारणीचा शुभारंभ, आदिवासींना नौका व मच्छीमार जाळ्याचे वाटप उरण : रामप्रहर वृत्त केंद्रात व राज्यात सर्वसामान्यांचे, आपले सरकार आहे. त्यामुळे विकासकामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही, असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी शनिवारी (दि. 1) उरण तालुक्यातील रानसई येथे केले. उरण विधानसभा मतदारसंघात आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून …

Read More »

चौक परिसरात रविवारी विकासकामांचा शुभारंभ

आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांच्या हस्ते होणार भूमिपूजन चौक : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील चौक परिसरात विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 2) होत आहे. सकाळी 10 वाजता लोधिवली येथून या कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या …

Read More »

पनवेलमध्ये आता 9 एप्रिलला स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्त शिवसेना-भाजप युतीतर्फे पनवेल विभागात काढण्यात येणारी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा 2 एप्रिलऐवजी आता 9 एप्रिल रोजी आयोजित करण्याचे ठरले आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी भाजप आणि शिवसेनेतर्फे राज्यभरात 30 मार्चपासून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. त्यानुसार पनवेल परिसरात ही …

Read More »

पनवेल महापालिकेचा करवसुलीचा विक्रम; 164 कोटींचा महसूल जमा

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने 164 कोटींची करवसुली केली असून हा आजवरील सर्वांधिक वसुलीचा विक्रम आहे. आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त गणेश शेटे यांच्या नियंत्रणाखाली अधिकारी व कर्मचार्‍यांनी दमदार कामगिरी करून मोठा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. गेल्या वर्षभरापासून …

Read More »

कोशिश फाउंडेशनतर्फे ‘सूर पनवेलचा’ रंगतोय!

प्रातःकालीन मैफिलीस वाढता प्रतिसाद; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त कोशिश फाउंडेशनतर्फे वडाळे तलाव येथे शनिवारी (दि. 1) झालेल्या सूर पनवेलचा या कार्यक्रमाच्या 25व्या भागास संगीतप्रेमींचा प्रतिसाद लाभला. या वेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आवर्जून उपस्थित होते. पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या …

Read More »

एमपीएससीच्या नवी मुंबईतील सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन

नवी मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)च्या 87व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोगाच्या बेलापूर सीबीडी येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी (दि. 1) अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या हस्ते झाले. उद्घाटन समारंभास आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, सदस्य डॉ. प्रताप दिघावकर, डॉ. दिलीप पांढरपट्टे, सचिव डॉ. सुवर्णा खरात, सहसचिव सुनील …

Read More »

पनवेल मनपाच्या अत्याधुनिक स्वच्छता वाहनांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको प्रशासनाकडून मलनिस्सारण वाहिन्यांचे हस्तांतरण झाल्यानंतर पनवेल महापालिकेने स्वच्छतेसह नागरिकांचे आरोग्य निकोप राहण्याकरिता महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. महापालिकेच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक रिसायकलर सिवर संक्शन कम जेटींग मशिन दाखल झाल्या आहेत. या वाहनांचे लोकार्पण भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 31) करण्यात आले. …

Read More »

रसायनीच्या मनीषा पवारची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

सूर्यनमस्कारात नवा विक्रम मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी विभागातील कन्या व सध्या पुण्यात वास्तव्यास असलेल्या मनीषा गजानन पवार यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यांनी 1 मिनिट 24 सेकंदांत 18 सूर्यनमस्कार करून नवा विक्रम रचला आहे. याआधीचा विक्रम एवढ्याच वेळेत 16 सूर्यनमस्कारांचा होता. मनीषा पवार या योग प्रशिक्षक असून …

Read More »