Breaking News

Ramprahar Reporters

खालापुरात उद्धव ठाकरे गटाला धक्का; चौकचे सुधीर ठोंबरे यांचा भाजपमध्ये प्रवेश

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यात मोठा राजकीय भूकंप घडला असून चौक जिल्हा परिषद गटातील ताकदवान नेते सुधीर ठोंबरे यांनी सोमवारी (दि. 9) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई येथील कार्यक्रमात राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष व …

Read More »

कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजप युतीतर्फे ज्ञानेश्वर म्हात्रे रिंगणात

मुंबई : प्रतिनिधी विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांच्या शिवसेना युतीकडून ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली असून ते या निवडणुकीत विजयी होतील, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी (दि. 9) व्यक्त केला. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार परिषदेस बाळासाहेबांची …

Read More »

दापोली संघ आमदार चषकाचा मानकरी; माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिली सदिच्छा भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त नावडे येथील जय हनुमान क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आमदार चषक 2023 टेनिस क्रिकेट स्पर्धेत दापोलीच्या जय हनुमान क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. किरवलीचा ओम नर्मदेश्वर संघ द्वितीय क्रमांक पटकाविला. नावडे येथील मैदानावर चार दिवस या स्पर्धा पार पडल्या. उत्तम आयोजन आणि क्रिकेटचा थरार या …

Read More »

काशीद समुद्रात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

औरंगाबादची सहल; तिघे बचावले मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील काशीद समुद्रात बुडून औरंगाबादमधून सहलीला आलेल्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. 9) घडली, तर तिघांना वाचविण्यात यश आले. सध्या मुरूड तालुक्यातील पर्यटनस्थळांवर राज्यातून मोठ्या प्रमाणात शालेय सहली येत आहेत. अशाच प्रकारे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील सानेगुरुजी माध्यमिक विद्यालयातील इयत्ता …

Read More »

कबड्डी स्पर्धेत पाले खुर्द संघ विजेता

माणगाव : प्रतिनिधी येथील नगरपंचायत हद्दीतील महाराणा प्रताप नगरच्या वतीने आयोजित माजी आमदार तथा लोकनेते स्व. अशोकदादा साबळे स्मृतीचषक कबड्डी स्पर्धेत पाले खुर्द कबड्डी संघाने पन्हळघर संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत माणगाव तालुक्यातील 32 संघानी सहभाग घेतला होता. तृतीय क्रमांक उंबर्डी संघाने, तर चतुर्थ क्रमांक यजमान महाराणा प्रताप …

Read More »

पनवेलमध्ये काँग्रेसला झटका; माजी नगरसेवक सिद्धार्थ बांठिया भाजपमध्ये

पनवेल : वार्ताहर पनवेल शहरात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. युवक काँग्रेसचे माजी प्रदेश जनरल सेक्रेटरी आणि माजी नगरसेवक सिद्धार्थ बांठिया यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पक्षाची शाल स्वीकारत बांठिया यांनी सोमवारी (दि. 9) पक्षप्रवेश केला. मुंबईतील दादर येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात सार्वजनिक …

Read More »

छत्रपती संभाजी महाराज कुस्ती संकुलातील आठ जणांची ‘महाराष्ट्र केसरी’साठी निवड

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचे क्रीडाप्रेमी आमदार प्रशांत ठाकूर संस्थापक अध्यक्ष असलेल्या नितळस येथील छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय कुस्ती संकुलातील आठ कुस्तीपटूंची पुणे येथे 10 जानेवारीपासून सुरू होणार्‍या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी नयन रवींद्र पाटील (48 किलो वजनी गट), सुशांत नामदेव पाटील (60 किलो), …

Read More »

२२ जानेवारीला खारघर मॅरेथॉन; व्यसनमुक्तीसाठी नागरिक धावणार!

सेलिब्रेटी आणि अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती  पनवेल(प्रतिनिधी) रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी ‘एक धाव व्यसनमुक्तीसाठी’ हे सामाजिक हिताचे घोषवाक्य घेऊन ‘खारघर मॅरेथॉन २०२३’ हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. खारघर मधील सेक्टर १९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून या स्पर्धेला सकाळी ०६ वाजता मान्यवरांच्या हस्ते …

Read More »

पनवेलची आयएनएस विक्रांत युद्धनौका प्रतिकृती आता मंत्रालयात

मान्यवरांच्या हस्ते होणार प्रदर्शनाचे उद्घाटन; आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती पनवेल : रामप्रहर वृत्त नौदल बाहुबली, देशाची सामरिक ताकद वाढविणारी आणि शत्रूच्या ऊरात धडकी भरविणारी युद्धनौका आयएनएस विक्रांतची माहिती सर्वांना व्हावी यासाठी या जहाजाची प्रतिकृती महाराष्ट्राचे केंद्रबिंदू असलेल्या मंत्रालयात प्रदर्शनाच्या रूपाने पहायला मिळणार आहे. 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती …

Read More »

आमदार योगेश कदम यांच्या कारला कशेडी घाटात अपघात; घातपाताचा संशय

पोलादपूर : प्रतिनिधी माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आणि दापोली मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला शुक्रवारी (दि. 6) रात्री मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटात अपघात झाला. सुदैवाने या अपघातात आमदार कदम बचावले आहेत. दरम्यान, हा अपघात घातपाताची शक्यता असू शकते, असा संशय आमदार कदम यांनी व्यक्त …

Read More »