Breaking News

Ramprahar Reporters

ग्रामपंचायत निवडणुक : पनवेलमध्ये भाजप, मित्रपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पनवेल तालुक्यातील भाजप व मित्रपक्षांच्या थेट सरपंचपद आणि सदस्यपदाच्या उमेदवारांनी शुक्रवारी (दि. 2) पंचायत समिती कार्यालयात अर्ज दाखल केले. या अर्जांची छाननी येत्या सोमवारी (दि. 5) होणार आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. या अंतर्गत पनवेल तालुक्यात 10 …

Read More »

ग्रामपंचायत गुळसुंदे व एमआयडीसी यांच्या कराराप्रमाणे अधिकृत नळ जोडणी

२०१८ पासून सुरु असलेल्या पाठपुराव्याला मोठे यश; आमदार महेश बालदी तसेच गुळसुंदे ग्रामपंचायतीचा पाठपुरावा कामी पनवेल : प्रतिनिधी  ग्रामपंचायत गुळसुंदे व एमआयडीसी यांच्या बरोबर झालेल्या कराराप्रमाणे अधिकृत नळ जोडणी करण्यात आली असून त्याचे उदघाटन तीन गावातील शेकडो ग्रामस्थांच्या साक्षीने झाले. त्यामुळे आता गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील लाडीवली, आकुलवाडी, गुळसुंदे तसेच आदिवासी …

Read More »

ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यास इच्छुक एनेल कंपनीस पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 मुंबई : ऊर्जा क्षेत्रात जागतिक पातळीवर नामांकित कंपन्यांपैकी एक असलेल्या इटली येथील एनेल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर & नेटवर्क कंपनीने ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जासह इतर क्षेत्रात महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखविले आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा राज्य शासन निश्चितपणे उपलब्ध करुन देईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. एनेल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर & नेटवर्क कंपनीचे ग्लोबल …

Read More »

 पनवेलमध्ये नाट्य रसिकांना एकांकिकांची मेजवानी 

मानाच्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला प्रारंभ पनवेल : प्रतिनिधी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ९ व्या मानाच्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला आजपासून (दि. ०२) पनवेलमध्ये प्रारंभ झाला असून …

Read More »

दिग्गज क्रिकेपटू कपिल देव झाले कर्जतकर

कोठिंबे येथे जमिनीची खरेदी कर्जत : प्रतिनिधी भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी कर्जत तालुक्यातील कोठिंबे येथे जमीन खरेदी केली आहे. त्यामुळे ते कर्जतकर झाले आहेत. कर्जत आणि फार्महाऊस हे समीकरण बनले आहे. येथील प्रदूषणमुक्त वातावरणासोबत निसर्ग, बारमाही वाहणार्‍या नद्या यामुळे विविध क्षेत्रांतील लोक कर्जतमध्ये सेकंड होम बांधून विकेण्डला येत …

Read More »

माटवणमधील हत्येप्रकरणी नऊ जणांना जन्मठेप

न्यायालयाचा निकाल पोलादपूर, अलिबाग : प्रतिनिधी राजकीय वैमनस्यातून पोलादपूर तालुक्यातील माटवण येथील गणपत विश्राम मांढरे यांच्या झालेल्या हत्येप्रकरणी माणगाव अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश टी. एन. जहांगीरदार यांनी नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावाली  आहे. विठ्ठल कृष्णा म्हस्के, सखाराम विश्राम मांढरे, विकास विठ्ठल म्हस्के, संकेत नारायण म्हस्के, विलास पांडुरंग गोगावले, नाना नथू …

Read More »

बुद्धिबळ स्पर्धेत उरण तालुका चेस असोसिएशनचे यश

उरण : बातमीदार रायगड जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या वतीने शालेय बुद्धिबळ निवड स्पर्धा अलिबाग क्रीडा संकुल येथे घेण्यात आली. या स्पर्धेत उरण तालुका चेस असोसिएशनच्या खेळाडूंनी यश संपादन केले आहे. उरण तालुका चेस असोसिएशनची खेळाडू बिशानी पाटील (रोटरी स्कूल) 14 वर्षाखालील गटात जिल्ह्यात तिसरी आली. 19 वर्षांखालील मुलींच्या गटात सारा प्रशांत …

Read More »

कुस्ती स्पर्धेत अनुराग ठाकूर व्दितीय

रोहा : प्रतिनिधी रायगड जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा नुकतीच खोपोली येथे झाली. या स्पर्धेत रोहा तालुक्यातील साने गुरुजी विद्यानिकेतन सानेगाव यशवंतखार या माध्यमिक विद्यालयातील अनुराग योगेश ठाकूर याने 14 वर्षांखालील 35 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकाविला. अनुराग ठाकूर हा आठवी इयत्तामध्ये शिकत असून त्याला लहानपणापासूनच कुस्तीची आवड आहे. जिल्ह्यात …

Read More »

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत ‘सीकेटी’ला उपविजेतेपद

पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत व रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयद्वारा झालेल्या पनवेल महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत चांगू काना ठाकूर (सीकेटी) ज्युनिअर कॉलेजच्या मुलींच्या 19 वर्षांखालील कबड्डी संघाने अटीतटीच्या सामन्यात उपविजेतेपद पटकाविले. उपविजेत्या कबड्डी संघास शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सुर्यकांत ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले …

Read More »

गायरान जमिनीसंदर्भात ग्रामस्थांना न्याय मिळवून देणार -आमदार महेश बालदी

पनवेल : रामप्रहर वृत्त गायरान जमिनीसंदर्भात ग्रामस्थांना आलेल्या नोटीस चुकीच्या, बेकायदेशीर व कायद्याच्या तरतुदीविरुद्ध असून कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय मोघमपणे नोटिसीचा नमूना (फॉरमॅट) तयार करून व गाळलेले शब्द भरून त्या पाठविलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरू नये, असे आवाहन आमदार महेश बालदी यांनी केले आहे. त्याचप्रमाणे या संदर्भात मी आपल्या पाठीशी खंबीरपणे …

Read More »