उपमुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंना टोला मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून आमच्या पाठीत खंजीर खुपसला होता, पण आता परिस्थिती बदलल्याने खरी शिवसेना आमच्यासोबत असल्याचे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला तसेच भारतीय जनता पक्ष हा कधीही मित्रपक्षांना धोका देत नसल्याचे …
Read More »मुरूडजवळच्या समुद्रात अडकून पडलेल्या मच्छीमारांची सुटका
मुरूड : प्रतिनिधी मुरूड येथील पद्मदुर्ग किल्ल्याजवळ बोटीवर अडकून पडलेल्या गुजरातमधील मच्छीमारांची तटरक्षक दलाने सुखरूप सुटका केली आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने सर्वांना बोटीतून बाहेर काढण्यात आले. गुजरातच्या वेरावळ बंदरातील बोट मंगळवारी सायंकाळी मासळी पकडत पंखा तुटल्याने पद्मदुर्ग परिसरात अडकून पडली होती. बोटीच्या तांडेलने नांगर टाकून ती एका जागी थांबवून ठेवली होती, …
Read More »रायगडात आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन साजरा
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 9) आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त अलिबागमध्ये आदिवासी बंधू-भगिनींनी मिरवणूक काढली होती. 9 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन साजरा केला जातो. जगभरातील आदिवासींच्या जागृतीसाठी हा दिवस साजरा केला जातो. रायगड जिल्ह्यातदेखील मंगळवारी हा दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध …
Read More »पनवेलमधील काळुंद्रे येथे नागरिकांना हायमास्टची सुविधा
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल महापालिका क्षेत्रात विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. त्या अंतर्गत काळुंद्रे येथे माजी उपमहापौर चारुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीतून हायमास्ट उभारण्यात आले आहे. या हायमास्टचे लोकार्पण माजी सभागृह …
Read More »गरीबाच्या कल्याणात आडवा येणारा कायदा तोडण्याचा आम्हाला अधिकार -ना. गडकरी
नागपूर : प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गरीबाच्या कल्याणात आडवा येणारा कायदा तोडण्याचा अधिकार आम्हा मंत्र्यांना असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सच्या नागपूर शाखेने आदिवासींच्या आरोग्यासाठी ब्लॉसम नावाचा प्रकल्प सुरू केला आहे. त्याचे उद्घाटन करताना ना. गडकरी बोलत होते. केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, मी महाराष्ट्रात 1995मध्ये मंत्री …
Read More »ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन
मुंबई : प्रतिनधी मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे मंगळवारी (दि. 9) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेे. ते 64 वर्षांचे होते. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. प्रदीप पटर्वधन यांनी अनेक मराठी नाटके, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. गिरगावात राहणार्या पटवर्धन …
Read More »शिंदे फडणवीस सरकारच्या 18 जणांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
मुंबई : प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाचा मंगळवारी (दि. 9) विस्तार करण्यात आला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 18 नवनियुक्त कॅबिनेट मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी आठ जणांचा समावेश आहे. यापुढे होणार्या विस्तारात राज्यमंत्र्यांची घोषणा होणार आहे. शपथविधी समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री …
Read More »राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत पनवेलच्या मनस्वी भगतने जिंकले सुवर्ण व रौप्यपदक
पनवेल : वार्ताहर नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत पनवेल येथील मनस्वी जयेश भगत हिने एक सुवर्ण व एक रौप्यपदक पटकाविले. मनस्वीने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना संघास इपी वैयक्तिक या प्रकारात रौप्यपदक व सांघिक या प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले. या स्पर्धेत भारतातील 25 राज्यांतून जवळपास 500हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. …
Read More »एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त रंगमंचावर एकटा असूनही प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा कलाकार हा ताकदीचा मानला जातो. एकपात्री किंवा द्विपात्री नाट्य सादर करताना कलाकाराचा अभिनय लक्षवेधी असावा लागतो. अशाच कलाकारांच्या अभिनयाची कसोटी पाहण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा …
Read More »कामोठ्यात मोफत आधार कार्ड शिबिर
आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट पनवेल : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कामोठे येथील रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित या शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 8) झाले, तर या शिबिराला भाजपचे उत्तर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper