Breaking News

Ramprahar Reporters

अ‍ॅड. भगीरथ शिंदे आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील महाविद्यालयात विविध कामांचे भूमिपूजन

मोखाडा : प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्रशासकीय इमारत, बोअरवेल जलपूजन आणि बायोफ्लॉक प्लांट शेड उभारण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन ‘रयत’चे व्हाईस चेअरमन अ‍ॅड. भगीरथ शिंदे आणि मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 2) झाले. …

Read More »

रायगडात अक्षय्य तृतीया, रमझान ईद उत्साहात

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात अक्षय्य तृतीया आणि रमझान ईदचा सण मंगळवारी (दि. 3) मोठ्या उत्साही वातावरणात साजरा झाला. दोन धर्मियांचे सण एकत्र आल्याने धार्मिक सलोखा कायम रहावा यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीयेचा सण मंगळवारी होता. हा मुहूर्त साधून …

Read More »

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांची 7 मे रोजी पुण्यतिथी

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने कष्टकर्‍यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांचा 34वा पुण्यतिथी कार्यक्रम येत्या शनिवारी (दि. 7) सकाळी 11.30 वाजता खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) येथे आयोजित करण्यात आला आहे. जनार्दन भगतसाहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य …

Read More »

पनवेल महापालिका मुख्यालयाचे भूमिपूजन; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका मुख्यालयाचे मंगळवारी (दि. 3) अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर भूमिपूजन करण्यात आले. पनवेल महापालिका हद्दीतील नवीन पनवेल सेक्टर 16, भूखंड क्रमांक 4 येथे पालिका मुख्यालयाची भव्य इमारत उभारली जाणार आहे. भूमिपूजन समारंभास महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण …

Read More »

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त नावड्यात कार्यक्रम; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा नावडे शहर व मैत्री प्रतिष्ठान यांच्या वतीने उत्सव महाराष्ट्राचा-संस्कृती महाराष्ट्राची हा बहरदार संगीतमय कार्यक्रम तसेच विशेष सन्मान पुरस्कार सोहळा रविवारी (दि. 1) रंगला. या सोहळ्याचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले, …

Read More »

पेण अर्बन बँक ठेवीदारांना न्याय द्या; सर्वपक्षीय धरणे आंदोलन

भाजप आमदारांनी उपस्थित राहून दिला पाठिंबा पेण : प्रतिनिधी पेण अर्बन बँक घोटाळ्यात भरडल्या गेलेल्या ठेवीदारांच्या न्याय हक्कांसाठी राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता संघर्ष समितीच्या माध्यमातून मंगळवारी (दि. 2) पेण नगर परिषदेसमोरील हुतात्मा कोतवाल चौकात सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास भाजपच्या चार आमदारांनी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला. …

Read More »

झिराड येथील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत दिवलांग, पनवेल, नांदईचा पाडा संघ विजेते

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील झिराड येथील साई क्रीडा मंडळ, महिला मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय  कबड्डी स्पर्धेत पुरुष खुल्या गटात श्री गणेश दिवलांग, तर महिलांमध्ये पनवेल संघाने विजेतेपद मिळवले. पंचक्रोशी गटात नांदई देवी नांदईचा पाडा हा संघ विजेता ठरला. खुल्या गटात अमिर धुमाळ, महिलांमध्ये रचना म्हात्रे, पंचक्रोशी गटात तुषार पाटील …

Read More »

आगरदांडा संघाने भंडारी चषक जिंकला

मुरूड : प्रतिनिधी 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुरूड तालुक्यातील ग्रामस्थ डोंगरी सुभा संस्था आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेत अटीतटीच्या अंतिम सामन्यात आगरदांड्याच्या जय बापदेव संघाने खारीकवाड्याच्या वादळ संघाचा पराभव करीत मानाचा भंडारी चषक जिंकला. जय हनुमान खार आंबोली संघाने तृतीय, तर जय हनुमान डोंगरी संघाने चतुर्थ क्रमांक पटकाविला. विजेत्या …

Read More »

पनवेलचा ओम वर्मा ठरला टेनिस चॅम्पियन

रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा खेळाडू पनवेल : रामप्रहर वृत्त श्रीलंकेत झालेल्या एशियन टेनिस फेडरेशनच्या 14 वर्षांखालील आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघ तसेच रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या ओम वर्मा या खेळाडूने जर्मनीच्या लुईस एलिह नीसे याला पराजित करून विजेतेपद पटकाविले. श्रीलंकेतील कोलंबो झालेल्या एटीएफ 14 अंडर सिरीज या …

Read More »

वर्षानुवर्षे येणार्‍या महापुरामुळे महाडकरांचा शासनाविरोधात आक्रोश

महाड : प्रतिनिधी महाडमध्ये 22 जुलै 2021 रोजी झालेल्या महापुरानंतर उपाययोजना करण्यात दिरंगाई होत असल्याने महाड पूरनियंत्रण समितीने शनिवारी (दि. 30) सरकारविरोधात आपला आक्रोश व्यक्त करीत मुंबई -गोवा महामार्ग रोखला. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. 22 जुलै 2021 मध्ये आलेल्या महापुराने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यातून सावरताना आठ …

Read More »