पनवेलमधील धरणा कॅम्प येथे घुमणार दम प्रो कबड्डीतील नामवंत खेळाडूंचा समावेश मान्यवरांची लाभणार उपस्थिती; दर्शकांना पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने जय भवानी नवतरुण मंडळाच्या वतीने 22 ते 24 एप्रिलपर्यंत आमदार प्रशांत ठाकूर चषक भव्य दिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा धरणा …
Read More »कोरोना काळात मविआ सरकारचा मंत्र्यांच्या उपचारावर लाखोंचा खर्च
चक्क सरकारी तिजोरीतून भरली बिले;आरोग्यमंत्री राजेश टोपेंचाही समावेश मुंबई : प्रतिनिधी कोरोना काळात एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागलेली असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारमधील 18 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेत लाखोंचा खर्च केल्याचे वृत्त झी 24 तास वाहिनीने …
Read More »महिला मोर्चातर्फे नवीन पनवेलमध्ये अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊवाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाल कल्याण विभागामार्फत देशभरात कुपोषित बालकांची संख्या कमी होण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. त्यातील एक भाग म्हणून मंगळवारी (दि. 19) भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा पनवेलच्या वतीने नवीन पनवेल येथील आंगणवाडी क्रमांक 10मधील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. पं. …
Read More »रायगडातील गणेश मंदिरे भाविकांनी फुलली!
‘अंगारक’निमित्त महड, पालीमध्ये दर्शनासाठी रांगा खोपोली, पाली : प्रतिनिधी अंगारक संकष्ट चतुर्थीचा योग साधून भाविकांनी मंगळवारी (दि. 19) अष्टविनायकांपैकी तीर्थक्षेत्र असलेल्या रायगडातील महाड आणि पाली येथे गणरायाचे दर्शन घेतले. जिल्ह्यातील इतर गणेश मंदिरेही भाविकांनी फुलून गेल्याचे पहावयास मिळाले. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आले असून शासनाने निर्बंध शिथिल केल्यामुळे धार्मिक …
Read More »पोलादपूरमध्ये आईच्या कुशीतून बाळ पळविले
पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर एसटी बसस्थानकात झोपलेल्या महिलेच्या कुशीतून तिच्या बाळाची चोरी अज्ञात व्यक्तीने केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पोलादपूर एसटी बसस्थानकात सडवली आदिवासीवाडीतील सुमन वसंत कोळी (वय 30) ही भंगारगोळा करून उदरनिर्वाह करणारी महिला …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व कामांना सुरुवात
सभागृह नेते परेश ठाकूर यांनी घेतला आढावा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व कामांना सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महापालिका हद्दीतील तळोजा मजकुर येथे भेट देऊन नाले आणि रस्त्यांच्या कामांची पाहणी केली तसेच अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. पावसाळ्याच्या अगोदर ही सर्व कामे …
Read More »पनवेल मनपा अग्निशमन दल होणार अत्याधुनिक
महासभेत निर्णय; तळोजा दफनभूमीही होणार विकसित पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या अग्निशमन विभागासाठी अत्याधुनिक वाहने खरेदी करण्यास मंगळवारी (दि. 19) झालेल्या महासभेत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे अग्निशमन दल आता अत्याधुनिक होणार आहे. त्याचप्रमाणे तळोजा सेक्टर 15मधील मुस्लिम दफनभूमी विकसित करण्यास मान्यता मिळाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महापालिकेच्या तीन कर्मचार्यांच्या वारसांना …
Read More »पनवेलमध्ये रॅम्पवर अवतरली छोट्यांची किलबिल
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विजेत्यांना क्राऊन बहाल पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल स्मार्ट मम्मिज या सेवाभावी संस्थेच्या वतीने लहान मुलांसाठी रॅम्प वॉक अर्थात फॅशन शोचे आयोजन शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रविवारी (दि. 17)सायंकाळी करण्यात आले होते. विशेष म्हणजे कर्णबधीर मुलांनीदेखील या शानदार फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक …
Read More »पंतप्रधान जन आरोग्य योजनांचे लाभार्थ्यांना कार्ड वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आणि स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पनवेल शहरातील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी (दि. 18) आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास प्रतिसाद लाभला. या वेळी पंतप्रधान जन आरोग्य योजनांचे कार्ड वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले. शासनाचा आरोग्य विभाग, महाराष्ट्रभूषण डॉ. नानसाहेब …
Read More »विवेक पाटलांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला
पनवेल : रामप्रहर वृत्त कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले बँकचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे घोटाळेबाज विवेक पाटलांचा मुक्काम आणखी काही काळ तुरूंगातच असणार हे स्पष्ट झाले आहे. कोर्टाच्या या निर्णयाचे कर्नाळा बँक घोटाळ्यात भरडले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper