Breaking News

Ramprahar Reporters

व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यास आलेली टोळी गजाआड

पेण पोलिसांकडून पाच आरोपींना अटक पेण : प्रतिनिधी व्हेल माशाच्या सुमारे दोन कोटी रुपयांच्या उलटीची विक्री करण्यासाठी पेणमध्ये आलेल्या टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. या प्रकरणी पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. व्हेल माशाच्या उलटीची विक्री पेण येथे होणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. …

Read More »

नागोठण्याजवळ महिलेची हत्या करून जाळले; आरोपी गजाआड

नागोठणे, पाली : प्रतिनिधी पेण तालुक्यातील शिहू बेणसे येथील घनदाट जंगलात एका महिलेला अनैतिक संबंधातून ठार मारून पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 3) घडली. या निर्घृण हत्येने एकच खळबळ उडाली. दरम्यान, नागोठणे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत महिला ही आरोपी विजय लक्ष्मण शिद (वय …

Read More »

सरकारमध्ये भ्रष्टाचाराची 20-20 मॅच

देवेंद्र फडणवीसांचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र गडचिरोली : प्रतिनिधी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 4) राज्य सरकारवर हल्लाबोल केला. या सरकारमध्ये सध्या भ्रष्टाचाराची 20-20 मॅच सुरू आहे, असे ते म्हणाले. भाजपच्या वतीने गडचिरोली येथून जनआक्रोश मोर्चाची सुरुवात करण्यात आली. या वेळी बोलताना विरोधी पक्षनेते …

Read More »

पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारत घडवूया : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

कोट्यवधींच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पनवेल : हरेश साठे देशाला सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तीशाली करणे; भय, भूक, आंतक, भ्रष्टाचारापासून मुक्त करणे आणि जगातील नंबर एकची आर्थिक शक्ती बनविणे हे मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे. आपल्याला सगळ्यांना मिळून या देशाला पुढे न्यायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारताची संकल्पना हीच …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वसमावेशक सक्षमीकरण संकल्प यशस्वी होतोय

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व हे जात, समुदायाच्या वर मास लीडर असे आहे. त्यामुळेच त्यांचा सन्मानासह सर्वसमावेशक सक्षमीकरण हा संकल्प यशस्वी होत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री आणि राज्यसभेतील उपनेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी शनिवारी (दि. 2) येथे …

Read More »

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रविवारी पनवेलमध्ये

7700 कोटी रुपयांच्या एक्स्प्रेस वे विकासकामांचे होणार लोकार्पण आणि भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल व उरण तालुक्यातील 7700 कोटी रुपयांच्या एक्स्प्रेस वे विकासकामांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन रविवारी (दि. 3) सायंकाळी 5 वाजता केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. पनवेल व उरण तालुक्यातील जनतेला उत्कृष्ट …

Read More »

हेलिकॉप्टरद्वारे अष्टविनायक दर्शन सेवेचा प्रारंभ

पाली : प्रतिनिधी हेलिकॉप्टरपद्वारे अष्टविनायक दर्शन सेवा या अभिनव संकल्पनेचा शुभारंभ बुधवारी (दि.30) झाला. यामुळे भाविकांना अष्टविनायक दर्शन अवघ्या पाच ते सात तासांत पुर्ण करता येणार आहे. वरद हेलिकॉप्टर सर्विसेसचे हे हेलिकॉप्टर आहे. ओझर येथून सकाळी 8:46 ला या हेलिकॉप्टरने पहिले उड्डाण घेतले. बी. व्ही. मांडे, वसंतराव पोखरकर, मीरा पोखरकर …

Read More »

खैरवाडीच्या सरपंचपदी भाजपच्या मंदा वारगडा

पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील खैरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक बुधवारी (दि. 30) झाली. या निवडणुकीत भाजपच्या मंदा वारगडा यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचित सरपंच मंदा वारगडा यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, भाजप नेते एकनाथ …

Read More »

गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील सिडकोशी संबंधित जमिनीच्या समस्यांसंदर्भात बैठक

लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी केल्या अधिकार्‍यांना सूचना पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील साडेबारा टक्के भूखंडांसंदर्भात तसेच सिडकोमार्फत येत्या काळात विविध प्रकल्पांसाठी जमिनी संपादित करण्यात येणार आहे त्यांची नुकसानभरपाई, पुनर्वसन व पुनर्स्थापना याबाबत मंगळवारी (दि. 29) सिडको अधिकारी आणि ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली …

Read More »

ठाकरे सरकारला मलिदा खाण्यात रस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारला ज्या कामांमध्ये मलिदा खाता येतो त्या कामात रस आहे. आरोग्याच्या बाबतीत त्यांनी लोकांना रस्त्यावर सोडले आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांच्या संकल्पनेतून दक्षिण-मुंबईतील …

Read More »