Breaking News

Ramprahar Reporters

प्रेमात अडसर ठरत असल्याने काटा काढण्याचा प्रयत्न; चौघांना अटक

अलिबाग : प्रतिनिधी माणगाव येथील मेडिकल दुकानदारावरील गोळीबार हा प्रेमप्रकरणातून झाल्याचे पोलीस तपासातून समोर आले. प्रेयसीचा भाऊ प्रेमात अडसर ठरतो म्हणून त्याचा काटा काढण्यासाठी सुपारी देऊन त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीसह चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांचा अन्य एक साथीदार फरार आहे. त्याचा …

Read More »

देशद्रोही मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून महाराष्ट्र वाचवा – आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल :  प्रतिनिधी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारमध्ये नवाबाचा मुखवटा घेऊन वावरणारा मलिक नावाचा मंत्री प्रत्यक्षात मात्र कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि देशद्रोही दाऊद इब्राहिमचा गुलाम असल्याचे ईडीच्या आरोपपत्रातून स्पष्ट झाले आहे. असे असतानाही संपूर्ण ठाकरे सरकार या मंत्र्याच्या सरबराईसाठी जीव तोडून सज्ज झाले आहे. कुख्यात डॉन दाऊदच्या हस्तकाची पाठराखण करणारे ठाकरे सरकार …

Read More »

विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर आता 11 मार्चला सुनावणी

पनवेल ः प्रतिनिधी बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेले कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 11 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे यांचा तळोजा तुरुंगातील मुक्काम आता 11 दिवसांनी वाढला आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयात सोमवारी (दि. 28) झालेल्या सुनावणीच्या वेळी सक्तवसुली संचालनालयातर्फे …

Read More »

भाजप नेते वैकुंठ पाटील यांना जामीन मंजूर

अलिबाग ः प्रतिनिधी भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्यासह अन्य दोन जणांना अलिबाग सत्र न्यायालयाने पोक्सो प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांचे पुत्र तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्यासह तिघांना पोक्सो गुन्ह्यातील प्रत सोशल मीडियावर व्हायरल केल्याबाबत अलिबाग सत्र न्यायालयाने तंत्रज्ञान …

Read More »

शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यप्रणालीवर आकर्षित  होऊन शिवसेना उत्तर भारतीय सेल खारघर अध्यक्ष शैलेंद्र त्रिपाठी यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह रविवारी (दि. 27) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. खारघर येथील रामशेठ ठाकूर …

Read More »

पंतप्रधान मोदींनी विकासकामांच्या माध्यमातून जनतेची मने जिंकली

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कौतुक पुणे : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासकामांच्या माध्यमातून जनतेची मने जिंकली आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे कौतुक केले आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान मोदींच्या विकासवादी धोरणाचे पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी जाहीर कौतुक केले. पंतप्रधान मोदी …

Read More »

अखेर मिवआ सरकार झुकले

खासदार संभाजीराजे यांचे उपोषण मागे मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाच्या दबावापुढे अखेर महाविकास आघाडी सरकार झुकले आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी (दि. 28) तीन दिवसांनंतर आपले उपोषण मागे घेतले. राज्य सरकार आणि मराठा समाजाचे शिष्टमंडळ यांच्यात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागण्या …

Read More »

खारघरमध्ये नगरसेविका चषक क्रिकेट स्पर्धा रंगली; मुरबी स्पोर्ट्स संघाला विजेतेपद

खारघर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या खारघरमधील नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने सेंट्रल पार्क मेट्रो स्टेशनजवळच्या मैदानावर टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुरबी स्पोर्ट्स संघाने विजेतेपद पटकाविले. गोल्डन ईगल अ संघ उपविजेता ठरला. स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग नोंदवला …

Read More »

महाडमध्ये अपघातात तिघे ठार, दोन जण जखमी

महाड : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव येथे शनिवारी (दि. 26) मध्यरात्री बलेनो कारची बसला धडक बसून तिघांचा मृत्यू आणि दोन जण जखमी झाले आहेत. मुंबईच्या दिशेने जाणार्‍या बलेनो कारने (एमएच 05-डीएस 6861) समोरून येणार्‍या बसला (एमएच 48-बीएम 6299) धडक दिली. या अपघातात कारमधील संदीप सीताराम पाटील (40, ठाणे) …

Read More »

देवद, वांगणी तर्फे वाजेत विकासकामांचे भूमिपूजन

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात विकासाची विविध कामे सुरू आहेत. त्यालाच अनुसरून देवद आणि वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायत हद्दीतही विकासकामे करण्यात येत असून त्याचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते …

Read More »