Breaking News

Ramprahar Reporters

कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या निधीतून आज साईत विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून साई येथे विविध विकासकामे करण्यात येणार असून या कामांचा भूमिपूजन सोहळा शनिवारी (दि. 22) सकाळी 10.30 वाजता भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते होणार आहे. …

Read More »

खासदार अमोल कोल्हेंचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची आक्रमक भूमिका मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा गांधीची हत्या करणार्‍या नथुराम गोडसेची भूमिका साकारलेला ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत, ते …

Read More »

कर्जतमध्ये हिंदू देवस्थान जमीन घोटाळा

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मंत्री नवाब मलिकांवर गंभीर आरोप कर्जत : बातमीदार हिंदू देवस्थानाची जमीन ही सलीम या मुस्लिम व्यक्तीच्या नावे झाली आणि त्यानंतर ती जमीन लगेचच महाविकास आघाडीतील एका बड्या नेत्याच्या कुटुंबाच्या नावावर झाली असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वांत लोकप्रिय नेते ठरले आहेत. त्यांनी जागतिक महासत्ता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह जगातील 13 राष्ट्रप्रमुखांना मागे टाकले आहे. मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सने जगातील लोकप्रिय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. 13 जागतिक नेत्यांच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 71 टक्के …

Read More »

वांगणी तर्फे वाजे गु्रप ग्रामपंचायत हद्दीतील तलावाचे सुशोभीकरण

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील वांगणी तर्फे वाजे गु्रप ग्रामपंचायत हद्दीतील तलावाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन निधीमधून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 20) भूमिपूजन झाले. पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत …

Read More »

शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंच्या वक्तव्यावर शेकापकडून टीका

खालापूरमध्ये पोलिसांमुळे संघर्ष टळला खोपोली ः प्रतिनिधी नगरपंचायत निवडणूक निकालानंतर शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी घरात घुसण्याची केलेली चिथावणीखोर भाषा खालापूरच्या संस्कृतीत बसत नसल्याचे सांगत शेकापच्या माजी नगराध्यक्ष शिवानी जंगम यांनी आमदारांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. खालापूर नगरपंचायत निवडणुकीचा निकाल बुधवारी लागला. यामध्ये शिवसेनेच्या सर्वाधिक आठ जागा आल्यानंतर खालापूरमध्ये …

Read More »

काळुंद्रे ओएनजीसी येथील घरांवर अन्यायकारी कारवाई केल्यास आंदोलन; भाजपचा इशारा

पनवेल : रामप्रहर वृत्त काळुंद्रे ओएनजीसी येथील रेल्वे हद्दीलगतच्या घरांचे जोपर्यंत सर्वेक्षण व त्यांच्या पुनर्वसनाचा योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत पुढील कुठलीही कार्यवाही करू नये, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर तसेच भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी रेल्वेकडे केली आहे, तसेच अन्यायकारी कारवाई केल्यास आंदोलनाचा …

Read More »

राज्यातील शाळा पुन्हा होणार सुरू

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या 20 दिवसांपासून बंद असलेली शाळा-महाविद्यालये येत्या सोमवार (दि. 24)पासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विद्यार्थी, पालकांसह शिक्षक, शिक्षणतज्ज्ञांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. शालेय …

Read More »

नागरिकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी पनवेल महानगरपालिका प्रयत्नशील : सभागृह नेते परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत सिडकोच्या जाचातून सुटका होऊन पनवेल महानगरपालिकेच्या उत्कृष्ट दर्जाचा सेवांचा लाभ नागरिकांना व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 18) बैठकीत बोलताना दिली. पनवेल महापालिकेकडे सिडकोकडून हस्तांतरित झालेल्या सुविधांसंदर्भात मंगळवारी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत …

Read More »

मोर्बेच्या उपसरपंच प्रभावती नावडेकर स्वगृही भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील मोर्बे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्रभावती परशुराम नावडेकर यांनी बुधवारी (दि. 19) शेतकरी कामगार पक्षातून भारतीय जनता पक्षात स्वगृही प्रवेश केला. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नावडेकर यांचे पक्षात स्वागत केले. मोर्बे येथे झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष …

Read More »