Breaking News

Ramprahar Reporters

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी अन्य नेत्याकडे सोपवावी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी मुंबई : प्रतिनिधी राज्याला गेले 70 दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गुरुवारी कोरोनाच्या प्रश्नावर झालेल्या देशव्यापी बैठकीत मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सलाही उपस्थित राहू शकले नाहीत. ते सलग दोन अडीच तास एका जागी बसू शकत नाहीत, अशी माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. …

Read More »

उद्धव ठाकरेसाहेब, स्वेच्छामरण द्या!

बडतर्फ एसटी कर्मचार्‍यांची विनंती विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम रत्नागिरी ः प्रतिनिधी एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असलेल्या एसटी कर्मचार्‍यांनी राज्यभरात एसटी संप (दुखवटा) सुरूच ठेवला आहे. दुसरीकडे संपात सहभागी झालेल्या आणि वारंवार आवाहन करूनही मागे न हटणार्‍या कर्मचार्‍यांवर बडतर्फी अथवा निलंबनाची कारवाई केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली एसटी आगारातील कर्मचार्‍यांवरही …

Read More »

‘दिबां’चे नाव लागल्याशिवाय विमान उडणार नाही – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते दि. बा. पाटील सर्वांचे बाप होते. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रासाठी संघर्ष केला आहे. त्यामुळे ‘दिबां’चे नाव लागल्याशिवाय विमान उडणार नाही, अशा शब्दांत नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची आग्रही मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी (दि. 13) केली. ते …

Read More »

देशात लॉकडाऊन लागणार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता देशात लॉकडाऊन लागणार नाही, पण अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणायची असेल तर स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोन तयार करून या आजाराला आळा घालण्याची आवश्यकता असल्याचे मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. देशभरातील 30 राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान जनतेशी संवाद साधत …

Read More »

शेकापला धक्का! माजी नगरसेवक गुरूनाथ गायकर समर्थकांसह भाजपमध्ये

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेतील शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक आणि तत्कालीन खारघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गुरुनाथ गायकर यांनी गुरुवारी (दि. 13) आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी गायकर व सहकार्‍यांचे पक्षात स्वागत केले. …

Read More »

अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या विजेत्यांचा भरघोस रक्कमेची पारितोषिके देऊन होणार सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आठवी अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील सर्व केंद्रांवर प्राथमिक फेरी पार पडल्या असून अंतिम फेरीसाठी 25 एकांकिकांची …

Read More »

पनवेल भाजप ओबीसी मोर्चातर्फे मानवी साखळी आंदोलन करून पंजाब सरकारच्या या कृतीचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 जानेवारी रोजी पंजाबच्या दौर्‍यावर असताना तेथील काँग्रेस सरकारने सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी ठेवल्या. सुरक्षेत केलेली कुचराई व कट कारस्थान रचुन केलेल्या चुकीमुळे पंजाबमधील काँग्रेस सरकारचा देशभरात निषेध व्यक्त करण्यात येतो. त्या पार्श्वभूमीवर पनवेल येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्च्याच्या …

Read More »

गुरुवारी मर्यादित स्वरुपात भूमिपुत्र निर्धार परिषद

पनवेल : लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जयंतीदिनी गुरुवारी (दि. 13) कोल्ही कोपर येथे भूमिपुत्रांची निर्धार परिषद आयोजित करण्यात आली आहे. लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने जाहीर केल्याप्रमाणे ही परिषद कोविडचा प्रोटोकॉल पाळून मर्यादित स्वरूपात होणार आहे. या परिषदेला पनवेल, उरण विभागातील प्रमुख कार्यकर्ते …

Read More »

अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ; मुंबई केंद्रासाठीच्या प्राथमिक फेरीला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आठव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची मुंबई केंद्रासाठीची प्राथमिक फेरी नुकतीच सीकेटी महाविद्यालयात …

Read More »

पनवेल परिसरात कोल्ह्याचा मुक्तसंचार; आठ ते 10 जण जखमी

पनवेल ः वार्ताहर पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात कोल्ह्याचा मुक्तसंचार होत असून त्याने आठ ते 10 जणांना जखमी केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातारण पसरले आहे. मोसारा, मानघर, कुंडेवहाळ परिसरातील गावांमध्ये कोल्ह्याचा मुक्त वावर आहे. या कोल्ह्याने जखमी केलेल्यांमध्ये लहान मुलीचाही समावेश आहे. जखमींनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली …

Read More »