पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथे उलवे नोड प्रीमियर लीग 2022 क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 5) झाले. ही स्पर्धा शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणात पाच दिवस रंगणार असून स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. …
Read More »अनाथांची माय हरपली… सिंधुताई सपकाळ यांचे दुःखद
पुणे : महाराष्ट्राची मदर तेरेसा अशी ओळख असणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांचे निधन झाले असून त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे ह्रदयवि काराच्या झटक्याने निधन झाले. ७३ वर्षांच्या होत्या, …
Read More »पनवेल मनपा हद्दीतील शाळाही बंद
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमांच्या शाळा इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग वगळून 5 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसा आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी मंगळवारी (दि. 4) काढला. विद्यार्थ्यांचे लसीकरण मात्र सुरूच राहणार आहे पनवेल महापालिका हद्दीत कोविड-19चा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन …
Read More »सेतूबाधित प्रकल्पग्रस्त संघटना आणि एमएमआरडीए यांच्यात सकारात्मक बैठक
पनवेल ः रामप्रहर वृत्त न्हावा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पग्रस्त संघटना आणि एमएमआरडीएचे अधिकारी यांच्यात उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मंगळवारी (दि. 4) बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीला न्हावा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र …
Read More »सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे बुधवारी पनवेलमध्ये पारितोषिक वितरण
पनवेल ः रामप्रहर वृत्त सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 18, 19 आणि 20व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय या सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी (दि. …
Read More »अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा; रायगड केंद्राची प्राथमिक फेरी उत्साहात
पुणे : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आठव्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात झालेली आहे. यातील रायगड केंद्रासाठीची प्राथमिक फेरी रविवारी (दि. …
Read More »राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे बुधवारी पारितोषिक वितरण समारंभ
पनवेल ः रामप्रहर वृत्त सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या 18, 19 आणि 20व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय या सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित …
Read More »मुंबईत पहिली ते आठवीचे वर्ग 31 जानेवारीपर्यंत बंद
मुंबई ः प्रतिनिधी कोरोनासोबतच ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी ही माहिती दिली. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. अशातच ओमायक्रॉनचेही रूग्ण वाढू लागले आहेत. वाढत्या फैलावामुळे मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्रातील मुलांच्या लसीकरणास सुरुवात
पनवेल ः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सोमवारी (दि. 2) देशभरात प्रारंभ झाला. पनवेल महापालिका क्षेत्रातील चारही प्रभागांत असेलल्या 10 शाळांमध्येदेखील लसीकरणास सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी सायंकाळपर्यंत 4500 मुलांचे लसीकरण झाले. पनवेल मनपा क्षेत्रातील लसीकरण मोहिमेचे उद्घाटन के. व्ही. …
Read More »रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ
सुदैवाने एकाचाही मृत्यू नाही अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असून उपचाराधीन रुग्णांची संख्या एक हजारावर पोहचली आहे. जिल्ह्यात दोन दिवसांत दुपटीने रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. रुग्ण वाढत असले तरी अद्याप एकाचाही मृत्यू झालेला नाही ही समाधानाची बाब आहे. डिसेंबर महिन्याच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper