गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण महाशिबिरास उत्तम प्रतिसाद पनवेल ः हरेश साठेकोरोना महामारीने संपूर्ण जगासमोर मोठे संकट आले. अशा परिस्थितीत लोकसंख्येचा विचार करता आपल्या भारत देशावर त्याचा मोठा दुष्परिणाम झाला असता, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योग्य निर्णय आणि उपाययोजनांनी कोरोनाच्या संकटकाळातही देशाला सावरले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या आरोग्याची …
Read More »आजिवली येथे शासकीय दाखले वाटप शिबिराला उदंड प्रतिसाद
पनवेल ः रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या मागणीनुसार आजिवली येथे जनता विद्यालयात शुक्रवारी (दि. 1) शासकीय दाखले वाटप शिबिर उत्साहात झाले. या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेत उपक्रमास उदंड प्रतिसाद दिला.या शिबिराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर शिबिराचे उद्घाटन भाजपचे तालुका …
Read More »राज्य सरकारच्या घोषणा हवेत विरल्या
शेतकर्यांना मदत न मिळाल्याने फडणवीसांचा हल्लाबोल नागपूर ः प्रतिनिधीमराठवाड्यात अतिवृष्टीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेवर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना ताशेरे ओढले आहेत. सरकारच्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कोणत्याही घोषणेची पूर्तता झालेली नाही. इतक्या नैसर्गिक आपत्तींमध्ये केलेल्या घोषणा कागदावर राहिल्या …
Read More »पनवेलमध्ये शनिवारी गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण महाशिबिर
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची लाभणार उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तसेवा व समर्पण अभियान अंतर्गत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 2) पनवेलमध्ये गर्भाशय मुखाच्या …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लाईव्ह महाराष्ट्र 9 न्युज पोर्टलचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्तकाळाचे बदलते पावले ओळखून युवा पत्रकार रवींद्र गायकवाड यांनी लाईव्ह महाराष्ट्र 9 या न्यूज पोर्टलची नव्याने सुरुवात केली आहे. या पोर्टलचा शुभारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 30) करण्यात आला. या पोर्टलच्या माध्यमातून पनवेल, रायगड, नवी मुंबईसह राज्यातील विविध घडामोडी वृत्तांकनाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत …
Read More »‘राजिप’चे आर्थिक गणित कोलमडले
राज्य सरकारकडून पावणे तीनशे कोटी येणे बाकी अलिबाग : प्रतिनिधीराज्य सरकारकडून रायगड जिल्हा परिषदेला येणारे (राजिप) पावणे तीनशे कोटी अडकून पडल्याने राजिपचे आर्थिक गणितच कोलमडले आहे. त्याचा परिणाम ग्रामीण भागाच्या विकासावर होत आहे.राज्य सरकारकडून जिल्हा परिषदेला मिळणारा मुद्रांक शुल्क, जमीन महसूल, वाढीव उपकर, सापेक्ष अनुदान, प्रोत्साहनपर अनुदान मिळालेले नाही. राजिपला …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांचे पत्रकारांनी मानले आभार
पनवेल मनपा मुख्यालयात होणार पत्रकार कक्ष पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणार्या महानगरपालिका मुख्यालयात अद्ययावत पत्रकार कक्ष उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरिता प्रयत्न करणारे महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांचे गुरुवारी(दि. 30) पत्रकारांनी सदिच्छा भेट घेत आभार व्यक्त केले.पनवेल महापालिकेच्या सुलभ कामकाजाच्या दृष्टीने व नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी अद्ययावत …
Read More »गाढी नदीवर पुलाचे काम लवकरच सुरू होणार!
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : देवद-सुकापूर येथील गाढी नदीवरील पुलाचे काम सुरू करण्यासाठी आता मंजुरी मिळाली आहे. तशा आशयाची वर्क ऑर्डर सिडको प्रशासनाने काढली आहे. या कामासाठी लागणारा निधी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे अध्यक्ष असताना मंजूर केला होता. सिडकोचे अध्यक्ष असताना आमदार …
Read More »बळीराजावर अस्मानी संकट
जोरदार पावसामुळे मराठवाड्यासह राज्यात पिकांचे मोठे नुकसान औरंगाबाद ः प्रतिनिधीगुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. या भागांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे जीवित व वित्तहानी झाली आहे, तर शेतकर्यांची हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त झाल्याने आता पुढे करायचे काय, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.गुलाब वादळामुळे …
Read More »तिबोटी खंड्या रायगड जिल्हा पक्षी म्हणून घोषित
अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये अधिवास असलेला मनमोहक व सुंदर तिबोटी खंड्या या पक्षाला रायगड जिल्हा पक्षी म्हणून घोषित करण्यात आले आहे. पर्यटन दिनाचे औचित्य साधून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. जिल्ह्यात मे ते ऑक्टोबरपर्यंत तिबोटी खंड्या या पक्षाचा रहिवास आढळून येतो. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper