Breaking News

Ramprahar Reporters

शिवसेनेचा पर्यायदेखील आमच्याकडे आहे : महेंद्र घरत

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात झालेल्या निवडणुकांंमध्ये काँग्रेसच्या मतांचा फायदा घेऊन काही लोक सत्तेत गेले. नंतर मात्र काँग्रसला विसरले. त्याचे शल्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आहे. आता तसे होऊ देणार नाही. ज्यांनी आम्हाला फसवलं आहे त्यांच्याशी जशास तसे वागणार. आघाडी करण्यासाठी समविचारी पक्षांबरोबरच आता शिवसेनेचा पर्यायदेखील आमच्याकडे आहे, असा इशारा काँग्रेसचे रायगड जिल्हा …

Read More »

अनंत गीतेंच्या वक्तव्याचे पडसाद

मुंबई ः प्रतिनिधीमाजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते यांनी महाविकास आघाडी सरकारवरून केलेल्या वक्तव्याचे राज्याच्या राजकारणात जोरदार पडसाद उमटले आहेत. विविध पक्षांच्या नेत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन गीतेंवर टीका केली आहे. यानिमित्ताने रायगड जिल्ह्यातील शिवसेना विरुद्ध …

Read More »

महाविकास आघाडी ही सरकारसाठीची तडजोड

माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे वक्तव्य श्रीवर्धन : प्रतिनिधीमहाविकास आघाडी ही आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी केलेली तडजोड आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन काँग्रेस एकत्र येऊ शकत नाहीत, तर शिवसेना काँग्रेसी विचाराची कशी होऊ शकते? त्यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य समित्यांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे वक्तव्य माजी केंद्रीय …

Read More »

पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धेचे पारितोषिक वितरण

कोशिश फाउंडेशनच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाउंडेशनच्या वतीने आयोजित बाप्पा मोरया घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आणि नगरसेवक अनिल भगत, तेजस कांडपिळे, नगरसेविका दर्शना …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर पनवेलमध्ये प्रदर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्तसेवा व समर्पण अभियानांतर्गत जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर पनवेलमध्ये प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 18) करण्यात आले.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सूचनेनुसार 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर …

Read More »

‘देशात अडीच कोटी लोकांच्या लसीकरणानंतर एका पक्षाला ताप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशात अडीच कोटी लोकांना लसींचे डोस दिल्यानंतर रात्री 12 वाजल्यानंतर एका राजकीय पक्षाला त्याचा त्रास सुरू झाला. त्यांचा ताप वाढला, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे लगावला आहे.पंतप्रधानांनी शुक्रवारची देशाची लसीकरणाची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गोव्यातील आरोग्यसेवा कर्मचारी आणि कोविड लसीच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. …

Read More »

काशिद समुद्रात बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू

मुरूड : प्रतिनिधीमुरूडजवळील प्रसिद्ध काशिद समुद्रात बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 18) घडली. पोहायला उतरलेल्या या पर्यटकांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. ही बाब किनार्‍यावरील जीवरक्षकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी दोघांना बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले.सुरजित नस्कर (वय 25) व पलट्टूसूत्रधार …

Read More »

पनवेल वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पुढाकार

पनवेल : प्रतिनिधीपनवेल शहर वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेतला असून या संदर्भात शुक्रवारी (दि. 17) पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी, नगरसेवक आणि व्यापारी यांची बैठक घेण्यात आली. या वेळी सूचविण्यात आलेले उपाय प्रायोगिक तत्त्वावर काही दिवस राबविण्याचे ठरले आहे. याशिवाय पोलीस, आरटीओ, महापालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधी संयुक्त …

Read More »

आयपीएलच्या दुसर्‍या सत्राला रविवारीपासून सुरुवात

दुबई : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना रविवारी (दि. 19) रंगणार आहे. या टीम्सचा या आयपीएलमधील हा 30वा सामना असेल. हा सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.या सामन्यासाठी नाणेफेक भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता होता आहे. त्यानंतर सायंकाळी 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्याचे …

Read More »

सुकापूरमध्ये शासकीय दाखले वाटप शिबिर उत्साहात

कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्राचेही उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी व बबन मुकादम यांनी तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार तालुक्यात सहा ठिकाणी शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्या अंतर्गत …

Read More »