Breaking News

Ramprahar Reporters

ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ओबीसींसाठीचे राजकीय आरक्षण अखेर सत्यात उतरताना दिसू लागले आहे. यासंदर्भात राज्य सरकारने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता, मात्र काही सूचनांसह तो अध्यादेश राज्यपालांनी पुन्हा पाठवला होता. यानंतर राज्य सरकारने त्यात आवश्यक ते बदल करून राज्यपालांकडे पाठवल्यानंतर आज राज्यपालांनी …

Read More »

मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर

26 सप्टेंबरला पनवेलमध्ये अंतिम फेरी पनवेल ः रामप्रहर वृत्तअखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धेच्याप्राथमिक फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला असून अंतिम फेरी रविवारी (दि. 26) पनवेलमध्ये होणार आहे.  अखिल …

Read More »

राष्ट्रवादीसोबत आघाडी नकोच!

रायगडातील शिवसेना पदाधिकार्‍यांची उद्योगमंत्री सुभाष देसाईंसमोर स्पष्ट भूमिका माणगाव ः प्रतिनिधीआम्हाला कुठल्याही पक्षासोबत आघाडी करायला सांगा, पण राष्ट्रवादी काँग्रेससोबत यापुढे जमणार नाही, अशी स्पष्ट भूमिका रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार आणि प्रमुख पदाधिकार्‍यांनी आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासमोर बुधवारी (दि. 22) मांडली. जिल्हा परिषदेसह आगामी स्थानिक …

Read More »

ट्रकचालकांच्या डुलकीवर सेन्सर्सचा उपाय

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा अभिनव प्रयोग नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशभरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर होणारे रस्ते अपघात हा चिंतेचा विषय आहे. या अपघातांमध्ये जीवितहानी होत असल्याने त्यावर तोडगा काढणे आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी प्रशासनाला नवे आदेश दिले असून त्यानुसार ट्रकचालकांच्या चुकांमुळे किंवा त्यांना ट्रक …

Read More »

भाजप ओबीसी मोर्चा उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीसपदी दशरथ म्हात्रे

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीसपदी दशरथ म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 22) पनवेल येथे झालेल्या भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी बैठकीत म्हात्रे यांची नियुक्ती जाहीर केली.श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात …

Read More »

आयपीएलमध्ये पुन्हा कोरोनाची एण्ट्री!

हैदराबादच्या नटराजनला लागण; संपर्कातील विलगीकरणात दुबई ः वृत्तसंस्थाआयपीएलमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने शिरकाव केला आहे. सनरायजर्स हैदराबाद संघाचा गोलंदाज टी नटराजनला कोरोनाची लागण झाली असून सध्या नटराजनसह त्याच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना आयसोलेट (विलग) करण्यात आले आहे. दरम्यान, हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील बुधवारी (दि. 22) होणारा सामना खेळविण्यात आला.मिळालेल्या माहितीनुसार, …

Read More »

राज्यसभा पोटनिवडणूक : भाजपच्या संजय उपाध्याय यांचा अर्ज दाखल

मुंबई ः प्रतिनिधीराज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी बुधवारी (दि. 22) मुंबईत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप मुंबई  अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, प्रदेश कोषाध्यक्ष आमदार मिहीर कोटेचा, माजी मंत्री व आमदार गणेश नाईक, …

Read More »

रायगडात पावसाची संततधार

पनवेल, रोहे : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 21) दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.गणपती विसर्जनानंतर तालुक्यात पावसाची उघडझाप सुरू होती, मात्र मंगळवारी सकाळी जोरदार हजेरी लावल्यानंतर सायंकाळपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. त्याचा परिणाम बाजारपेठेत दिसून आला. पावसामुळे बाजारपेठेत ग्राहक दिसत नव्हते.दरम्यान, जिल्ह्यात या वर्षी चांगला …

Read More »

माथेरान भाजपची नूतन कार्यकारिणी जाहीर

प्रवीण सकपाळ अध्यक्षपदी कर्जत ः बातमीदारमाथेरान गिरीस्थान नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी भारतीय जनता पक्षाने नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. माथेरानमधील क्षत्रिय मराठा समाजाचे माजी अध्यक्ष प्रवीण सकपाळ यांची भाजप शहर अध्यक्ष, तर किरण चौधरी, सुभाष भोसले यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.माथेरान शहरातील हॉटेल गार्डन व्ह्यू येथे झालेल्या …

Read More »

राज्यातील महिला सुरक्षेप्रश्नी दोन दिवसांचे अधिवेशन घ्या!

राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना निर्देश मुंबई ः प्रतिनिधीकाही दिवसांपूर्वी मुंबईच्या साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्या पार्श्वभूमीवर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दोन दिवसीय विशेष अधिवेशन घेण्याचे निर्देश दिले आहेत.या अधिवेशनात राज्यातील महिलांची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात यावी, असे राज्यपाल कोश्यारी …

Read More »