Breaking News

Ramprahar Reporters

कर्नाळा बँक बुडाल्याचे आता शेकापलाही अधिकृतरीत्या मान्य!

आयजीच्या जीवावर बायजी उदार आणि सरकारच्या जीवावर आमदार सुभेदार पनवेल ः रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्षाचे विद्यमान विधान परिषद आमदार आणि पनवेलचे माजी नगराध्यक्ष या दोघांनीही कर्नाळा बँकेबाबत नुकत्याच काढलेल्या निवेदनावरून कर्नाळा नागरी सहकारी बँक बुडाल्याचे आता शेकापनेच अधिकृतरीत्या जाहीरपणे मान्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.‘बँक व्यवस्थित आहे’ असा यापूर्वी आव आणणारे आणि …

Read More »

कळंबोलीतील कोविड सेंटरकरिता पनवेल मनपा घेणार सुरक्षा रक्षक

पनवेल ः प्रतिनिधीकळंबोली येथील कोविड सेंटरकरिता पनवेल महापालिका रायगड सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक घेणार आहे. त्याचप्रमाणे पनेवल शहरातील चार धोकादायक शौचालये निष्कासित करण्याचाही निर्णय शुक्रवारी (दि. 20) झालेल्या महासभेत घेण्यात आला.  पनवेल महापालिकेची महासभा शुक्रवारी महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ऑनलाइन पद्धतीने …

Read More »

अंगणवाडी सेविकांनी मोबाइल केले राज्य शासनाला परत

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्यातील अंगणवाडी सेविकांनी शुक्रवारी (दि. 20) राज्य शासनाने दिलेले निकृष्ट दर्जाचे मोबाइल परत केले.अलिबाग तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी पंचायत समिती कार्यालयात असलेल्या महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकार्‍यांना आपले मोबाइल परत केले. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे याबाबत अंगणवाडी सेविका शिष्टमंडळाने निवेदनही दिले आहे. …

Read More »

ना. नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा

आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतला नियोजनाचा आढावा महाड ः प्रतिनिधीकेंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला मुंबईतून सुरुवात झाली असून, ही यात्रा 23 आगॅस्टला रायगड जिल्ह्यातून पुढे तळकोकणात जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व अन्य पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी (दि. 20) …

Read More »

संभाजीराजेंनी नाकारले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पत्र

मराठा आरक्षण आंदोलनात राज्य सरकारवर टीका नांदेड ः प्रतिनिधीमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोल्हापूर आणि नाशिकनंतर आता खासदार संभाजीराजे भोसले यांनी नांदेडमधून पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. नांदेडमध्ये जमलेल्या मराठा आंदोलकांसमोर बोलताना संभाजीराजे यांनी शुक्रवारी (दि. 20) राज्य सरकारवर आणि विशेषत: मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडले. या …

Read More »

दिबा समर्थक राघूबाईंचे निधन

पनवेल : रामप्रहर वृत्तदि. बा. पाटील यांच्या आंदोलनात हिरिरीने भाग घेणार्‍या, त्यांच्या कट्टर समर्थक असलेल्या राघुबाई म्हात्रे यांचे बुधवारी (दि. 18) वयाच्या 103व्या वर्षी निधन झाले. वयाची शंभरी उलटली असली, तरी विमानतळाला दिबांचे नाव देण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असता 10 जून रोजी झालेल्या साखळी आंदोलनात, 24 जुलैच्या सिडको घेराव आंदोलनात …

Read More »

लक्ष्मणशेठ यांचे जाणे म्हणजे कुटुंबातील व्यक्तीचे जाणे

सर्वपक्षीय शोकसभेत व्यक्त झाल्या भावना पनवेल : रामप्रहर वृत्तसामाजिक, राजकीय, उद्योग आदी क्षेत्रात सातत्याने आपल्या कार्याचा आदरयुक्त दबदबा राखलेले स्व. लक्ष्मणशेठ पाटील यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर झालेल्या आघाताने संपूर्ण पनवेलला दुःख झाले. त्यांच्या निधनाने आपल्याच कुटुंबातील व्यक्ती हरपल्याची भावना गुरुवारी (दि. 19) पनवेल येथे झालेल्या शोकसभेत व्यक्त झाली.नावडे गावातील लक्ष्मणशेठ …

Read More »

आम्हाला कोणाच्या उपदेशाची गरज नाही

जनआशीर्वाद यात्रेत नारायण राणेंचा शिवसेनेवर घणाघात मुंबई : प्रतिनिधीआम्ही राजकीय काही करत नाही. आम्ही फक्त लोकांना भेटतोय. तेसुद्धा जनतेच्या आशीर्वादानंच बसलेत. ते तर आडमार्गानं बसलेत. निवडून आलेले नाहीत. त्यामुळं आम्हाला कोणी उपदेश देण्याची गरज नाही. सगळे नियम, कायदे पाळूनच आम्ही सर्व करतोय, असा घणाघात केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग …

Read More »

घोट गाव येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू करा – सभागृह नेते परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीतील घोट गाव येथे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नव्याने कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे.सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल महापालिका हद्दीतील घोट गाव, …

Read More »

कोशिश फाउंडेशनकडून ‘सीकेटी’चा गौरव

ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेलचे कार्यतत्पर व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोशिश फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण फाउंडेशनचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात …

Read More »