माद्रिद ः वृत्तसंस्थालिओनेल मेस्सीच्या शानदार दोन गोलमुळे बार्सिलोनाने अॅथलेटिक बिलबाओचा 4-0 असा धुव्वा उडवत कोपा डेल रे चषकावर नाव कोरले.दुसर्या सत्रात अवघ्या 12 मिनिटांच्या अंतराने चार गोल लगावत बार्सिलोनाने या सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले. अँटोनी ग्रिझमन याने 60व्या मिनिटाला बार्सिलोनाचे खाते खोलल्यानंतर तिसर्याच मिनिटाला फ्रँकी डे जाँग याने बार्सिलोनाची आघाडी …
Read More »दिल्लीकडून विजयाचे ‘शिखर’ सर
मुंबई ः प्रतिनिधीमुंबईच्या वानखेडेवर रंगलेल्या आयपीएलच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जच्या 196 धावसंख्येच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. सलामीवीर फलंदाज शिखर धवनच्या 92 धावांच्या शानदार खेळीमुळे दिल्लीने पंजाबवर सहा गडी राखून हा विजय मिळवला.नाणेफेक गमावलेल्या पंजाबने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीसमोर 20 षटकांत 4 बाद 195 धावा केल्या होत्या. पंजाबचा कर्णधार के. …
Read More »कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशात कोरोनाचे संकट गंभीर झालेले असताना उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये कुंभमेळा सुरू असून, लाखो भाविक हरिद्वारमध्ये जमले आहेत. कुंभमेळ्यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवरून संवाद साधून कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने करण्याची विनंती केली.हरिद्वारमधील कुंभमेळ्यात …
Read More »नवाब मलिकांच्या आरोपानंतर भाजपचा हल्लाबोल
मुंबई, नवी दिल्ली ः प्रतिनिधी, वृत्तसंस्थामहाराष्ट्र सरकारने औषध कंपन्यांशी संपर्क साधून मागणी केल्यानंतर, केंद्र सरकारने त्यांना तुम्ही महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन द्यायचे नाही. दिल्यास तुमच्यावर कारवाई करू, अशी धमकी दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते तथा राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला, तसेच या संदर्भात ट्विटही केले. त्याला …
Read More »रायगडात कडकडीत बंद
अलिबाग ः प्रतिनिधीकोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रायगड जिल्ह्यात जवळपास सर्व तालुक्यांमध्ये दुकानांचे शटर डाऊन झाल्याचे चित्र शनिवारी (दि. 17) पहावयास मिळाले. काही ठिकाणी जनतेने उत्स्फूर्तपणे बंद पाळणार असल्याचे आधीच जाहीर केले होते, तर अन्य ठिकाणीही स्थानिक पातळीवरील प्रशासकीय, पोलीस यंत्रणेच्या आदेशाने कडकडीत बंद पाळला गेला. राज्य शासनाने ब्रेक द …
Read More »समाजमंदिर कामाची पाहणी
पनवेल ः शहरातील रोहिदास वाड्यामध्ये समाजमंदिराचे काम सुरू आहे. महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार्या या कामाची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी अधिकार्यांसह पाहणी करून त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या वेळी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, शहर अभियंता संजय कटेकर, साळुंखे, बूथ अध्यक्ष प्रवीण मोहोकर, सुशांत मोहिते, बाब्या जाधव आदी …
Read More »गुड न्यूज! यंदा देशात समाधानकारक पाऊस
हवामान विभागाचा अंदाज नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशात कोरोनाचे संकट अधिकाधिक गडद होत असताना देशातील शेतकरी मात्र आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे शेतीपिकांची वाहतूक, वितरण आणि विक्री करण्यात शेतकर्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय हवामान विभागाकडून दिलासादायक माहिती देण्यात आली आहे. यंदा सरासरीच्या 98 टक्के …
Read More »कोव्हॅक्सिन निर्मितीस ‘हाफकिन’ला परवानगी
राज ठाकरेंनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार मुंबई ः प्रतिनिधीमुंबई येथील हाफकिन इन्स्टिट्यूटला भारत बायोटेक कंपनीकडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लस बनविण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या व लसीचा तुटवडा …
Read More »बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची मशाल विझली
प्रवीण दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा मुंबई ः प्रतिनिधीविधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पालघर साधू हत्याकांड प्रकरणावरून थेट शिवसेनेवर निशाणा साधला आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व झळाळते ठेवले होते. त्यांनी हिंदुत्वासाठी ‘मशाल’ पेटवली होती. आज सत्तेवर त्यांचेच सुपुत्र उद्धव ठाकरे असताना ही मशाल विझली असून त्याचा धूर होताना दिसतो …
Read More »अलिबागेत वीकेण्ड लॉकडाऊन इतर दिवशी अत्यावश्यक दुकाने
दुपारी 1 वाजेपर्यंतच खुली राहणार अलिबाग ः प्रतिनिधीकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अलिबाग नगर परिषद प्रशासनाने शनिवार, रविवारी कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. अन्य दिवशीदेखील दुपारी 1 वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवता राहणार आहेत. या सदंर्भात पोलीस अधिकारी, तहसीलदार आणि पालिका यांची संयुक्त बैठक झाली.अलिबाग शहर व परिसरासह तालुक्यात कोरोनाचा फैलाव …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper