सेलिब्रेशनसाठी आलेल्या महिलेवरील बलात्कार प्रकरण पनवेल ः वार्ताहर – ख्रिसमस व न्यू इयरनिमित्त मुंबईभ्रमण करण्यास आलेल्या मुलीवर बलात्कार करणार्या नराधमास पनवेल शहर पोलिसांनी 12 तासांत जेरबंद केले आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील कोळीवाडा स्मशानभूमीच्या बाजूच्या सार्वजनिक शौचालयाच्या पाठीमागे पनवेल येथील रिक्षाचालक सचिन नावाच्या अनोळखी इसमाने फिर्यादी महिलेस दगडाने …
Read More »स्वच्छता अभियानासाठी पालिकेची आगेकूच
लोकसहभाग वाढविण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रयत्नशील नवी मुंबई ः प्रतिनिधी – स्वच्छता अभियानात देशात पहिला क्रमांक मिळविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने कंबर कसली आहे. त्या अनुषंगाने भिंतींवर चित्रे काढण्यापासून कचरा संकलनापर्यंत सर्व पातळ्यांवर परिश्रम घेतले जात आहेत. अर्थातच अभियानाचे यश लोकसहभागावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे स्वच्छतेचे महत्त्व पाच लाख 38 हजार …
Read More »मुरूड शहरातील एसटी बस फेर्या बंद
मुरूड : प्रतिनिधीरस्ता दुरुस्तीची कामे सुरु करण्याआधीच नगर परिषदेने पत्र दिल्याने मुरूड एसटी आगाराने शहरातील बससेवा बंद केली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल व गैरसोय होत असून, त्यांना आर्थिक भूर्दंडही पडत आहे.एसटीचे मुरूड आगार शहरापासून सुमारे दीड किलोमिटर अंतरावर आहे. मात्र स्थानिक प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटीच्या सर्व गाड्या शहरात …
Read More »मंदिर निर्माणाबाबत जनजागृती करणार
मुरूडमधील रामभक्तांच्या बैठकीत निर्णय मुरुड : प्रतिनिधीअयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण अभियान संदर्भात येथील हिंदू बोर्डींगमध्ये नुकताच मुरुड तालुक्याची व्यापक बैठक झाली. तालुक्यांतील 50हून अधीक गावांमधील श्री रामभक्तांनी सामाजिक अंतर राखत या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रायगड जिल्हा सहव्यवसाय प्रमुख संजय ठाकूर यांनी या बैठकीत श्री रामजन्मभूमीच्या संघर्ष …
Read More »विद्यार्थी बसचालकांवर उपासमारीची वेळ
शासन उदासीन, संघटनेचा आंदोलनाचा इशारा पेण : प्रतिनिधी कोरोनामुळे बंद झालेल्या शाळा अद्याप पुर्ववत सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या बसचे मालक व चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या स्कूल बस रस्त्यावर धुळ खात उभ्या आहेत. त्याचा मोठा आर्थिक भुर्दंड बस मालकांना सहन करावा लागत आहे.स्कूल …
Read More »कळंबोली भाजी मार्केटमधील बेकायदा बांधकामाबाबत सभागृह नेते परेश ठाकूर आक्रमक
पनवेल ः रामप्रहर वृत्तकळंबोली सेक्टर 5 येथील भाजी मार्केटमध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. येथील गोरगरीब भाजीवाल्यांची पिळवणूक करून त्यांच्याकडून हजार रुपये वसूल करून बेकायदा बांधकाम करण्याचा घाट सभागृह नेते परेश ठाकूर यांनी हाणून पाडला आहे. सोमवारी (दि. 28) कळंबोली भारतीय जनता पक्षाच्या …
Read More »पनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी
तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल पनवेल ः प्रतिनिधीपनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींचा समावेश असून, 15 जानेवारीला या ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. त्यानुसार सोमवारी (दि. 28) पनवेल पंचायत समितीमध्ये आकुर्ली, मोर्बे आणि खैरवाडी ग्रामपंचायतींमधील भाजपच्या उमेदवारांनी पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत …
Read More »जंजिरा किल्ला प्रवेशबंदीमुळे व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान
पर्यटकांची संख्या रोडावली मुरूड ः प्रतिनिधीकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्हाधिकार्यांनी एका आदेशान्वये ऐतिहासिक जंजिरा किल्ला 2 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचा पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. विविध ठिकाणांहून अनेक पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येतात. यामध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश असतो, परंतु अचानक किल्ला पर्यटकांसाठी बंद झाल्याने येथील …
Read More »केगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश
उरण ः वार्ताहरउरण तालुक्यातील महत्त्वाच्या अशा केगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील काँग्रेस, शेकाप आणि शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोमवारी (दि. 28) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या केगाव …
Read More »शिळफाटा टोलमधून स्थानिकांना सूट
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दणक्याने प्रशासन वठणीवर पनवेल ः प्रतिनिधीपनवेल तालुक्यातील किरवली येथे असलेल्या शिळफाटा टोल नाक्यातून स्थानिकांनी मागणी करूनसुद्धा टोलमध्ये सूट न दिल्याने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 28) धडक मोर्चाचा दणका देत आयआरबी टोल नाका प्रशासनाला वठणीवर आणले. या दणक्यामुळे टोल नाका प्रशासनाने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper