Breaking News

Ramprahar Reporters

डीव्हिलियर्सच्या खेळीने बंगळुरूचा ‘रॉयल’ विजय

दुबई : तडाखेबाज फलंदाज एबी डीव्हिलियर्सच्या फटकेबाजीच्या जोरावर शनिवारी (दि. 17) राजस्थानविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात बंगळुरूने सात गडी आणि दोन चेंडू राखून धमाकेदार विजय मिळविला. राजस्थानच्या संघाने 20 षटकांत 177 धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना 18व्या षटकापर्यंत बंगळुरूचा संघ मागे राहिला होता, पण डीव्हिलियर्सच्या जबरदस्त फटकेबाजीच्या बळावर शेवटच्या …

Read More »

पद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री काँग्रेसपुढे हतबल

यशोमती ठाकूर प्रकरणावरून चंद्रकांत पाटील यांची टीका पुणे : प्रतिनिधीकर्तव्यावरील पोलीस कर्मचार्‍याला मारहाण केल्याबद्दल न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेल्या राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही मागणी केली आहे. आपले …

Read More »

कुंडेवहाळ येथील कुलुमाता मंदिर सभामंडप आणि सुशोभीकरणाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ येथील कुलुमाता मंदिराच्या सभामंडप आणि सुशोभीकरण लोकार्पण शनिवारी (दि. 17) पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला क्वारी संघटनेचे अध्यक्ष सुनील भोईर, कुंडेवहाळचे सरपंच सदाशिव वास्कर, उपसरपंच करिष्मा वास्कर, माजी उपसरपंच आर. आर. वास्कर, दत्तात्रय वास्कर, ग्रामपंचायत सदस्य जागृती …

Read More »

पीओपीवरील बंदी उठविण्यासाठी मूर्तिकार पेणमध्ये एकवटले

आमदार रविशेठ पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पेण : प्रतिनिधीप्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या मूर्तींवर प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून घालण्यात आलेली बंदी उठविण्यात यावी अशी मागणी पेण येथील मूर्तिकारांच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे. या संदर्भात माजी मंत्री व आमदार रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानी मूर्तिकार संघटनेचे पदाधिकारी व कामगार यांची शनिवारी (दि. 17) …

Read More »

शेकापचे अनेक कार्यकर्ते करणार भाजपात प्रवेश

पनवेल : उरण विधानसभा मतदार संघातील शेतकरी कामगार पक्षाचे अनेक कार्यकर्ते रविवार दिनांक 18 ऑक्टोबरला भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. दुपारी 12 वाजता पनवेल शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार …

Read More »

देवेंद्र फडणवीस उद्यापासून अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौर्‍यावर

शेतकर्‍यांच्या नुकसानीची करणार पाहणी मुंबई : प्रतिनिधीराज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तीन दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. सोमवार (दि. 19)पासून त्यांच्या दौर्‍याला प्रारंभ होईल.देवेंद्र फडणवीस …

Read More »

घराबाहेर पडल्याने एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना होतो का? : रावसाहेब दानवे

पैठण : प्रतिनिधीघराबाहेर पडल्यावर एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना होतो का, असा सवाल भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विचारला आहे. राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, प्रजेत सामील झाला पाहिजे, असेही त्यांनी पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे. केंद्रीय मंत्री दानवे म्हणाले की, अशी अनेक संकट येत राहतात. आम्ही …

Read More »

प्रजा संकटात, राजा मात्र घरात!

वाढत्या टीकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार दौरा मुंबई : प्रतिनिधीगेल्या चार-पाच दिवसांत परतीच्या पावसाने राज्याला तडाखा दिला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि कोकणातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली नाही. दुसरीकडे काही नेते विविध भागांचे दौरे करून परिस्थितीचा …

Read More »

रायगड जिल्ह्यात 230 नवे पॉझिटिव्ह; सात रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट कायम असून, शुक्रवारी (दि. 16) नव्या 230 रुग्णांची आणि सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 310 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 131 व ग्रामीण 21) तालुक्यातील 152, उरण 19, अलिबाग 15, पेण 11, खालापूर 10, रोहा …

Read More »

आजपासून देवीचा जागर

कोरोनामुळे नवरात्रोत्सवही होणार साधेपणाने पनवेल : रामप्रहर वृत्तआदिशक्ती, आदिमाया यांसारख्या विविध रूपांनी व नावांनी ओळखल्या जाणार्‍या देवीच्या नवरात्रोत्सवाला शनिवार (दि. 17)पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने सार्वजनिक स्वरूपात देवीची प्रतिष्ठापना होणार असून, घरगुती घटही बसतील. त्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत.गणेशोत्सवानंतर भाविकांना आता नवरात्रोत्सवाची उत्सुकता आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत देवीची …

Read More »