Breaking News

Ramprahar Reporters

मिनीट्रेनचे रडगाणे सुरूच

पर्यटकांची पायपीट, एक प्रवासी फेरी रद्द कर्जत ः बातमीदार  नेरळ-माथेरान-नेरळचा सध्या पर्यटन हंगाम सुरू असून, मिनीट्रेनचे इंजीन रुळावरून खाली घसरण्याचे प्रकार काही थांबत नाहीत. काल सकाळी माथेरान येथून पर्यटकांना घेऊन निघालेली मिनीट्रेन नेरळकडे येत असताना इंजीन रुळावरून खाली घसरले आणि त्यानंतर पुन्हा सहा तासांनी रुळावर ठेवण्यात आले. दरम्यान, मिनीट्रेनची दुपारची …

Read More »

मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतातील अनेक हल्ल्यांचा मास्टरमाइंड आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यात भारताच्या कूटनीतिला यश आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (यूएनएससी) बुधवारी (दि. 1) मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले. भारताचा हा मोठा विजय मानला जात आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत …

Read More »

हा नवीन भारत, घरात घुसून मारतो

मोदींचा दहशतवादावर घणाघात अयोध्या ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या येथे घेतलेल्या जाहीर सभेत आपण केलेल्या विकासकामांची माहिती दिली. या वेळी त्यांनी विरोधकांचाही खरपूस समाचार घेतला. दहशतवादाच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा नवीन भारत असून नवीन भारत कोणाला त्रास देत नाही, पण जर कोणी …

Read More »

‘त्या’ साडेआठ कोटीच्या गोलंदाजाची आयपीएलमधून माघार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था किंग्ज इलेव्हन पंजाबने लिलावात 8.40 कोटी रुपये मोजून चमूत दाखल करून घेतलेल्या वरुण चक्रवर्तीने इंडियन प्रीमिअर लीगमधून माघार घेतली आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी चक्रवर्तीला दुखापत झाली होती आणि त्यातून तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे त्याला संपूर्ण आयपीएल स्पर्धेला मुकावे लागणार आहे. पंजाबने या …

Read More »

आफ्रिदीच्या वर्ल्ड कप संघात तेंडुलकर, धोनीला स्थान नाही

लाहोर : वृत्तसंस्था पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याचा 11 जणांचा संघ जाहीर केला. विशेष म्हणजे त्याने जाहीर केलेल्या संघात महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि भारताचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना स्थान देण्यात आलेले नाही. त्याच्या या संघात पाकिस्तानचेच पाच खेळाडू आहेत, ऑस्ट्रेलियाचे चार आणि …

Read More »

आयपीएलच्या कामगिरीवरून कोहलीवर प्रश्नचिन्ह नको

नवी दिल्ली : वृत्तसंस्था रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमातून प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा पहिला संघ ठरला आहे. मंगळवारी पावसामुळे बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना रद्द झाला आणि त्याचबरोबर विराट कोहलीच्या प्ले ऑफमध्ये खेळण्याच्या अखेरच्या आशाही विरून गेल्या. आयपीएलमधील या अपयशामुळे कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित …

Read More »

बीसीसीआयच्या अधिकार्याची पंजाबवर कारवाईची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांवर स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. ड्रग्स बाळगणे हा त्यापेक्षा गंभीर गुन्हा आहे, त्यामुळे किंग्स इलेव्हन पंजाबवरही बंदीची कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी बीसीसीआयच्या एका अधिकार्‍याने केली आहे. पंजाबचे सहमालक नेस वाडिया याला …

Read More »

आरसीएफच्या आदिवासी कबड्डी स्पर्धेला प्रारंभ

अलिबाग : प्रतिनिधी राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायझर्स  (आरसीएफ), थळ युनिट यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कामगार स्मृतिचषक जिल्हास्तरीय आदिवासी कबड्डी स्पर्धेला बुधवारी (दि. 1) प्रारंभ झाला. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून दरवर्षी 1 मे रोजी ‘कामगार स्मृती चषक’ जिल्हास्तरीय आदिवासी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या वर्षी देखील 1 …

Read More »

मुंबई इंडियन्सचा अनोखा मराठी बाणा

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात आज मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. यातच मुंबईच्या टीमने देखील अनोख्या प्रकारे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईच्या टीममधील जेसन बेहरनडॉर्फला मराठी शिकवून त्याला काही वाक्य बोलायला लावली आहेत. बेहरनडॉर्फला मुंबईकर सूर्यकुमार यादवने मराठीचे धडे दिले आहेत. मराठीचे धडे देतानाचा व्हिडीओ मुंबई टीमच्या …

Read More »

पावसानं केला खेळ

बेंगळुरू स्पर्धेबाहेर; राजस्थान जर-तरच्या फेर्‍यात बेंगळुरू : वृत्तसंस्था रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात पावसानं ‘खेळ’ केला. पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं पाच षटकांचा खेळवण्यात आलेला सामना अखेर अनिर्णित घोषित करण्यात आला. दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला. त्यामुळं बेंगळुरूचं स्पर्धेतील आव्हानच संपुष्टात आलं. तर राजस्थानची प्ले-ऑफ प्रवेशाची शक्यताही …

Read More »