Breaking News

Ramprahar Reporters

नगरसेवक प्रकाश बिनेदार यांना मातृशोक

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकचे नगरसेवक आणि भाजपचे रायगड जिल्हा प्रवक्ते प्रकाश बिनेदार यांच्या मातोश्री हिराबाई चंदर बिनेदार यांचे शनिवारी (दि. 30) पहाटे 5 वाजता नवीन पनवेल येथे वृद्धत्वाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 80 वर्षांच्या होत्या. आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनाला जाण्यापूर्वी हिराबाई बिनेदार यांचे अंत्यदर्शन घेतले आणि बिनेदार कुटुंबीयांचे …

Read More »

एमआयडीसीच्या भूसंपादन प्रक्रियेला शेतकर्यांचा विरोध

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील शहापूर धेरंड परिसरात प्रस्तावित औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेला स्थानिक शेतकर्‍यांनी हरकत घेतली आहे. शेकडो शेतकर्‍यांनी शनिवारी (दि. 30) अलिबागच्या प्रांताधिकारी शारदा पोवार यांची भेट घेऊन आपले आक्षेप नोंदवले. आमचा भूसंपादनाला विरोध नाही, मात्र जमिनींना योग्य भाव मिळावा, स्थावर मालमत्तांचे बाजारमूल्य योग्य पद्धतीने करावे, स्थानिक प्रकल्पग्रस्त …

Read More »

विधानसभेत घमासान; भाजपचा सभात्याग

सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर संपूर्ण कामकाज घटनाबाह्य : देवेंद्र फडणवीस मुंबई ः प्रतिनिधी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शनिवारी (दि. 30) विश्वासदर्शक ठरावाची चाचणी पार पडली. या वेळी सरकारला 169 आमदारांनी समर्थन दिले. चार आमदार तटस्थ राहिले. भाजपच्या सर्व 105 आमदारांनी या वेळी सभात्याग केला. अधिवेशनाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते …

Read More »

धोनीच्या भवितव्याबद्दल सौरव गांगुली म्हणतो…

कोलकाता : वृत्तसंस्था टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भविष्य आणि त्याची निवृत्ती हे विषय सध्या क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चेचा मुद्दा बनले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीनेही याबद्दल विधान केले आहे. धोनीबद्दल निर्णय घेण्यासाठी अजून बराच वेळ असून, याबद्दल धोनी आणि निवड समिती सदस्यांना सर्व गोष्टी …

Read More »

स्टीव्ह स्मिथचा विक्रम; सर्वांत जलद सात हजार धावा

अ‍ॅडलेड : वृत्तसंस्था पाकिस्तानविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला. 30 वर्षीय स्मिथ हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत कमी डावांत सात हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज बनला आहे. स्मिथने त्याच्या 70व्या कसोटी सामन्यातील 126व्या डावात वेगवान गोलंदाज मोहम्मद मूसाच्या चेंडूवर धाव …

Read More »

एका षटकात हॅट्ट्रिकसह पाच बळी

कर्नाटकच्या गोलंदाजाचा अनोखा विक्रम सुरत : वृत्तसंस्था कर्नाटकचा वेगवान गोलंदाज अभिमन्यू मिथुन याने हॅट्ट्रिक घेत एका षटकात तब्बल पाच विकेट्स घेण्याचा अनोखा विक्रम केला आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत हरियाणाविरुद्ध खेळताना मिथुनने 39 धावा देऊन पाच गडी बाद केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने सामन्याच्या शेवटच्या षटकात पाच विकेट्स मिळवले. …

Read More »

ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरचे त्रिशतक

ब्रॅडमन, विराट यांनाही टाकले मागे अ‍ॅडलेड : वृत्तसंस्था पाकिस्तानविरुद्ध अ‍ॅडलेड येथे सुरू असलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने खणखणीत त्रिशतक ठोकले आहे. गुलाबी चेंडूवर त्याने हे त्रिशतक झळकाविले. पाकविरुद्ध त्रिशतक ठोकणारा ऑस्ट्रेलियाचा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. पाकविरुद्ध सुरू असलेल्या या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात …

Read More »

पाली येथे सायरनमुळे दरोड्याचा प्रयत्न फसला

पाली : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात चोर्‍या व घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत असताना पाली येथे एका ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसल्याची घटना घडली आहे. दरोडा टाकताना कुलपाला लावलेला सायरन वाजल्याने दरोडेखोरांचीच भंबेरी उडून त्यांनी तेथून पळ काढला. हा फसलेला दरोडा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात टिपला गेला आहे.  पाली बाजारपेठेत मुख्य रहदारीच्या …

Read More »

पोलादपूरमध्ये बैलदिवाळीनिमित्त मर्दानी खेळाचा थरार

पोलादपूर : प्रतिनिधी दक्षिण भारतात जलिकट्टू आणि युरोपियन देशांमध्ये बुलफाईट सर्वांना ज्ञात असताना पोलादपूरच्या ग्रामीण भागात बैलदिवाळीच्या पारंपरिक मर्दानी खेळाचे आकर्षण चाकरमानी आणि स्थानिकांमध्ये आजही कायम आहे. दिवाळीनंतर मंगळवारी देवदिवाळी झाली आणि ग्रामदैवतांचा कौल घेऊन देणे देऊन बुधवारी मार्गशीर्ष प्रतिपदेला बैलदिवाळीची प्रथा सुरू झाली. पोलादपूर तालुक्याच्या ग्रामीण भागाने जपलेली ही …

Read More »

आदर्श घोटाळ्याची पुन्हा चौकशी

मुंबई : प्रतिनिधी कुलाबा येथील आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेतील घोटाळ्याची सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता काँग्रेसचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे, मात्र त्यापूर्वीच पुन्हा एकदा ‘आदर्श’ची चौकशी सुरू झाल्याने …

Read More »