Breaking News

Ramprahar Reporters

नुकसानग्रस्त शेतकर्यांसाठी 5,380 कोटी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिलासा मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन निधीतून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी पाच हजार 380 कोटी रुपये मंजूर केले आहेत. सीएमओच्या ट्विटर अकाऊंटवररून मुख्यमंत्र्यांनीच ही माहिती दिली आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे सरकार राज्यात येणार …

Read More »

मुंबईचा आणखी एक विजय

मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेत सूर्यकुमार पुन्हा तळपला मुंबई : प्रतिनिधी कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या मुंबई संघाने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत आपली धडाकेबाज कामगिरी सुरूच ठेवली आहे. सुपर लीग ब गटात मुंबईने कर्नाटकवर सात गडी राखून मात केली. कर्नाटकने विजयासाठी दिलेले 174 धावांचे लक्ष्य मुंबईने सूर्यकुमारच्या नाबाद 94 धावांच्या …

Read More »

कोहलीकडून गांगुलीचे कौतुक; गावसकर मात्र भडकले!

कोलकाता : वृत्तसंस्था ऐतिहासिक डे-नाइट कसोटी सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा एक डाव आणि 46 धावांनी दारुण पराभव केला. या विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरभ गांगुलीचे भरभरून कौतुक केले, पण विराटच्या या कृतीवर लिटल मास्टर म्हणून ओळख असणार्‍या सुनील गावसकरांनी मात्र सणसणीत प्रत्युत्तर दिले. …

Read More »

‘पीबीएल’मधून सायनाची माघार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीसाठी आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) पाचव्या हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाने गेल्या पीबीएलमध्ये नॉर्थ ईस्टर्न वॉरियर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते, मात्र 20 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2020 या कालावधीत होणार्‍या आगामी हंगामात ती खेळणार …

Read More »

किपचोगे, मुहम्मद सर्वोत्तम अॅीथलेटिक्सपटू

मोनॅको : वृत्तसंस्था दोन तासांहून कमी वेळेत मॅरेथॉन शर्यत पूर्ण करणारा पहिला धावपटू ईलूड किपचोगे आणि 400 मीटर अडथळा शर्यतीमधील विश्वविजेती डॅलिया मुहम्मद यांना जगातील सर्वोत्तम अ‍ॅथलेटिक्सपटूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेतर्फे मोनॅको येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात 35 वर्षीय किपचोगेला सन्मानित करण्यात आले. त्याने गेल्या महिन्यात 42.195 किलोमीटरचे …

Read More »

महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्रच!

फडणवीस सलग दुसर्‍यांदा बनले मुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ मुंबई ः प्रतिनिधी राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांचे सरकार स्थापन होणार असताना शनिवारी (दि. 23) भल्या पहाटे राज्यात राजकीय भूकंप झाला. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची दुसर्‍यांदा शपथ घेतली. फडणवीस यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात राज्यपालांनी फडणवीस …

Read More »

किंग कोहली! ऐतिहासिक कसोटीत विक्रमी शतक

कोलकाता : वृत्तसंस्था भारताचा कर्णधार विराट कोहलीने बांगलादेशविरुद्ध दुसर्‍या कसोटी सामन्यात शतक झळकाविले. दिवस-रात्र कसोटी सामन्यात शतक झळकावणारा विराट कोहली भारताचा पहिला कर्णधार आणि खेळाडू ठरला आहे. विराटने 194 चेंडूंत 18 चौकारांसह 136 धावा केल्या. या खेळीदरम्यान विराटने अनेक विक्रम केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने विराट कोहलीचे हे …

Read More »

पनवेलमध्ये भाजपचा जल्लोष

पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने पनवेल भाजपतर्फे मध्यवर्ती कार्यालयासमोर शनिवारी (दि. 23) आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सलग दुसर्‍यांदा शपथ घेतली, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ …

Read More »

खांदा कॉलनीत कोकण महोत्सवाची धूम

पनवेल : रामप्रहर वृत्त ओमसाई खांदेश्वर महिला व बाल मंडळाच्या वतीने खांदा खांदेश्वर कोकण महोत्सवाचे आयोजन कॉलनीत करण्यात आले असून, यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळत आहे. त्यामुळे या महोत्सवात लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहे. नगरसेविका सीता सदानंद पाटील यांनी आठ वर्षांपूर्वी या महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीला कोकणापुरता मर्यादित असलेल्या …

Read More »

कळंबोली-कामोठे जोडरस्त्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

कळंबोली : प्रतिनिधी कामोठे-कळंबोली जोडरस्त्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 22) भूमिपूजन करण्यात आले. कामोठे, तसेच सायन-पनवेल महामार्गावरून कळंबोलीत जाण्याकरिता दोन किलोमीटर वळसा घालावा लागतो. त्यात वेळ व पैसा वाया जातोे. कळंबोली व कामोठ्यामधील सर्वसामान्य जनतेला होणार्‍या या त्रासाचा गांभीर्याने विचार करून आमदार ठाकूर यांनी या जोड रस्त्याच्या …

Read More »