Breaking News

Ramprahar Reporters

टीम इंडिया कोलकातामध्ये दाखल

पारंपरिक पद्धतीने दणक्यात स्वागत कोलकाता : वृत्तसंस्था भारत आणि बांगलादेश या दोनही संघांसाठी पहिला दिवस-रात्र कसोटी सामना येत्या शुक्रवारपासून म्हणजेच 22 नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. हे सामने गुलाबी चेंडूने खेळावे लागतात. पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशला एक डाव आणि 130 धावांनी धूळ चारली. त्यानंतर दुसर्‍या कसोटीसाठी भारतीय संघ मंगळवारी (दि. …

Read More »

सावरकरांना ‘भारतरत्न’साठी शिफारशीची गरज नाही

नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यासाठी शिफारस करण्याची गरज नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी (दि. 19) एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृह मंत्रालयाने सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भातील सूचक वक्तव्य केले. भारतरत्नसाठी अनेक शिफारशी येत असतात, मात्र सावरकरांना हा …

Read More »

ओवे कॅम्प गावठाणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांचे आश्वासन पनवेल : रामप्रहर वृत्त ओवे कॅम्प (कोयना प्रकल्पग्रस्त) ग्रामस्थांचा प्रलंबित असलेला गावठाणाचा प्रश्न संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 18) ग्रामस्थांच्या बैठकीत दिले. ओवे कॅम्प ग्रामस्थांचा 15 एकर 20 गुंठे जमीन असलेल्या गावठाणाचा प्रश्न …

Read More »

काँग्रेस-राष्ट्रवादी बैठक लांबणीवर

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांची आघाडी आकाराला येत असतानाच नेत्यांच्या चर्चा, बैठका आणि खलबतांमुळे विलंब होत आहे. अशातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची मंगळवारी (दि. 19) होणारी बैठकही पुढे ढकलण्यात आल्याने ही सत्ताकोंडी नेमकी फुटणार कधी, असा प्रश्न राजकीय नेत्यांसह सर्वसामान्यांना पडला आहे. काँग्रेस …

Read More »

अक्षय कारभारी ‘मावळी मंडळ श्री’

ठाणे : प्रतिनिधी येथील श्री मावळी मंडळातर्फे आयोजित 31व्या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत अक्षय कारभारी मावळी मंडळ श्री किताबाचा मानकरी ठरला. कळव्याच्या अपोलो जिमने 44 गुण मिळवून सांघिक विजेतेपद मिळवले, तर भिवंडीच्या युनिव्हर्सल फिजिक्स सेंटरला 20 गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. शायन कासकरने सर्वोत्कृष्ट प्रदर्शकाचा पुरस्कार मिळवला. वैभव शिंदे आणि विवेक …

Read More »

नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धा रंगली

पनवेल : रामप्रहर वृत्त तरुणांना क्रीडा क्षेत्रामध्ये प्रोत्साहन मिळावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते रमेश तुपे व अजंठा ग्रुप यांच्या वतीने नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. युवा नेते मयुरेश नेतकर सोबत होते. या क्रीडा उपक्रमास नगरसेवक डॉ. …

Read More »

विजयासह महाराष्ट्र बाद फेरीत

मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा मुंबई : प्रतिनिधी कर्णधार राहुल त्रिपाठीने (नाबाद 63) पाच सामन्यांत अपयशी ठरल्यानंतर साकारलेल्या झंझावाती अर्धशतकाला अझीम काझीच्या (नाबाद 71) धडाकेबाज अर्धशतकाची उत्तम साथ लाभल्यामुळे महाराष्ट्राने सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत बलाढ्य पंजाबला 45 धावांनी धूळ चारली. सात सामन्यांतून पाचव्या विजयाची नोंद करणार्‍या महाराष्ट्राने ‘क’ …

Read More »

धोनीमुळे माझे वर्ल्ड कपमधील शतक हुकले -गौतम गंभीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने एका गोष्टीबाबत आपले मौन सोडले आहे. विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यामुळे माझे शतक हुकले, असे गंभीरने म्हटले आहे. भारतीय क्रिकेट संघाने 2 एप्रिल 2011 रोजी आयसीसी वन डे वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे …

Read More »

क्रिपझो कंपनीचे मालक आणि संचालकांविरोधात गुन्हा दाखल

अलिबाग : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रात क्रिपझो इंजिनिअरींग कंपनीत झालेल्या दुर्घटनेप्रकरणी कंपनीचे मालक आणि संचालकांविरोधात माणगाव पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला. निष्काळजीपणामुळे कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप या तिघांवर ठेवण्यात आला आहे. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला, तर अन्य 16 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर पोलिसांनी …

Read More »

शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाली नाही : शरद पवार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सरकार स्थापनेचे शिवसेना-भाजपला विचारा, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभ्रम वाढवलेला असतानाच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा झालीच नसल्याचे सांगून पवार यांनी राज्यातील सत्तास्थापनेचा सस्पेन्स अधिकच वाढवला आहे. सत्तास्थापनेसाठी किमान समान कार्यक्रम तयार करण्याचे आम्ही बोललोच नव्हतो. …

Read More »