Breaking News

Ramprahar Reporters

आरोग्य महाशिबिराची जय्यत तयारी

पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोचे अध्यक्ष, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष, कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 45व्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, रायगड मेडिकल असोसिएशन आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (4 ऑगस्ट) खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात होणार्‍या …

Read More »

विरोधकांनी आत्मचिंतन करावे

ईव्हीएमवरून गळे काढणार्‍यांना मुख्यमंत्र्यांचा टोला वर्धा : प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमुळे भाजपचा विजय झाला, ईव्हीएममध्ये घोळ आहे, असे म्हणत गळे काढणार्‍या विरोधकांना आत्मचिंतनाची गरज असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने शुक्रवारी (दि. 2) वर्धा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ईव्हीएमवर अविश्वास दाखविणे म्हणजे …

Read More »

बीसीटी विद्यालयात कबड्डी स्पर्धा रंगली

उरण : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या द्रोणगिरी नोड येथील   भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विद्यालयात शुक्रवारी (दि. 1) तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष  सायली म्हात्रे, जि. प. सदस्य विजय भोईर, दीपक ठाकूर, विस्तार अधिकारी प्रियंका पाटील, के. पी. म्हात्रे, …

Read More »

विविध समित्यांकडून नियोजन

एखादा उपक्रम यशस्वी करण्यासाठी टीमवर्क आवश्यक असते. हाती घेतलेले काम मार्गी लागण्यास सांघिक प्रयत्नांनी मदत होते. त्याची प्रचिती सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणार्‍या आरोग्य महाशिबिरात येते. महाशिबिराच्या नियोजनासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुकाणू, निमंत्रण, स्वागत, विविध रोग तपासणी, परिवहन, डॉक्टर व वैद्यकीय …

Read More »

स्मिथने ऑस्ट्रेलियाला सावरले

बर्मिगहॅम : प्रतिनिधी जवळपास दीड वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार्‍या स्टीव्ह स्मिथने इंग्लंडच्या वेगवान मार्‍याचा आणि चाहत्यांच्या टोमण्यांचा सक्षमपणे मुकाबला करून अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात झुंजार शतक साकारले. त्यामुळे सुरुवातीला स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीसमोर ढेपाळणार्‍या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 284 धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम …

Read More »

पनवेलमध्ये राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धा

पनवेल : बातमीदार पनवेलमध्ये 4 ऑगस्टला विशेष बालवयोगटासाठी मिनी जलद चषक राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धा व खुल्या गटासाठी मिनी ब्लिट्झ (अती जलद) चषक अशा दोन स्पर्धांचे आयोजन विरुपाक्ष मंगल कार्यालय सभागृहात करण्यात आले आहे. अस्मिता चेस अ‍ॅण्ड स्पोर्ट्स अकॅडमी, पनवेलद्वारे आयोजित करण्यात आलेल्या मागील चार राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये एक हजार 500हून …

Read More »

गुजरातने रोखला दिल्लीचा विजयरथ

मुंबई : प्रतिनिधी प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात अखेरीस दबंग दिल्लीचा विजयरथाला गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने रोखला आहे. मुंबईत झालेल्या सामन्यात गुजरातने दिल्लीवर 31-26च्या फरकाने बाजी मारली. रंगतदार झालेल्या सामन्यात दिल्लीने आपल्या पराभवाचे अंतर सात गुणांपेक्षा कमी ठेवल्यामुळे त्यांना एक गुण देण्यात आला. या एका गुणामुळे दिल्ली आपले पहिले स्थान कायम राखून आहे. …

Read More »

स्थायी समिती सभापतीपदासाठी प्रवीण पाटील यांचा अर्ज

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक प्रवीण पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी (दि. 1) नगरसचिव तिलकराज खापर्डे यांच्याकडे सादर केला. स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी शनिवारी (दि. 3) निवडणूक होणार आहे. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, प्रभाग समिती ‘अ’चे …

Read More »

आरोग्य महाशिबिराची आज नियोजन बैठक

पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडकोचे अध्यक्ष, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, रायगड मेडिकल असोसिएशन आणि भाजप पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महाशिबिराच्या नियोजनासंदर्भातील आढावा बैठक शुक्रवारी (दि. 2) सायंकाळी 5 वाजता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली खांदा कॉलनी …

Read More »

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना; पनवेलमध्ये 1069 लाभार्थी

पनवेल : रामप्रहर वृत्त शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना पिवळे व केशरी रेशनकार्डधारकांना लागू असून, पनवेल महापालिका क्षेत्रात आठ हॉस्पिटलची यामध्ये निवड करण्यात आली आहे. 1069 लाभार्थ्यांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत याचा लाभ मिळणार आहे. ही योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचावी यासाठी पनवेल महानगरपालिकेने सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार …

Read More »