Breaking News

Ramprahar Reporters

खासदार राजेंद्र गावितांना शिवसेनेकडून उमेदवारी

मुंबई : प्रतिनिधी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार राजेंद्र गावित यांनी मंगळवारी (दि. 26) शिवसेनेत प्रवेश केला. गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना पालघरमधून लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर पालघरची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली होती. त्यामुळे …

Read More »

सर्वांचीच भाजपला पसंती अभिनेत्री; जयाप्रदा यांचा पक्षप्रवेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपमध्ये इनकमिंग सुरूच आहे. समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी मंगळवारी (दि. 26) भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात जयाप्रदा यांनी ‘कमळ’ हाती घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित असल्याची प्रतिक्रिया या वेळी त्यांनी दिली. जयाप्रदा या समाजवादी पक्षातून दोन …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाच्या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम आहे. सी-व्होटर या सर्वेक्षण संस्थेने पंतप्रधान मोदींच्या कामगिरीवर विविध राज्यांतील किती टक्के जनता समाधानी आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असून, इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांत काही …

Read More »

अश्विनच्या ‘त्या’ कृत्यावर दिग्गज नाराज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था यंदाच्या आयपीएलमधील पहिला सामना जिंकून किंग इलेव्हन पंजाब संघाने विजयी सुरुवात केली आहे, मात्र राजस्थान फलंदाज जोस बटलरला ज्या पद्धतीने बाद केले त्यानंतर अश्विन दिग्गजांच्या टिकेचा धनी बनला आहे. बटलरला बाद केल्यानंतर अश्विनच्या अखिलाडू वृत्तीवर अनेक दिग्गजांनी नाराजी व्यक्त केली आहे. पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विन गोलंदाजी …

Read More »

पंजाबची राजस्थानवर मात

बटलर ठरला अश्विनचा अजब बळी जयपूर : वृत्तसंस्था आयपीएल 12च्या साखळी लढतीत राजस्थान रॉयलने किंग्ज इलेव्हन पंजाब संघावर 14 धावांनी विजय मिळविला. पंजाबचा तडाखेबाज सलामीवीर ख्रिस गेल सामनावीर ठरला. सवाई मानसिंग मैदानावर झालेल्या या सामन्यात पंजाबने दिलेले 185 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थान संघाची सुरुवात चांगली झाली. जॉस बटलर …

Read More »

फणसाड अभयारण्यात रानगव्यांचे आगमन

मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात रानगवे आढळून आले आहेत. त्यामुळे पशु-पक्षीप्रेमी आणि अभ्यासकांना ही नवी पर्वणी मानली जात आहे. वनविभागाने रानगव्यांच्या वावरास दुजोरा दिला आहे. मुरूडपासून 14 किमी अंतरावर फणसाड अभयारण्य असून, त्याचे क्षेत्रफळ 54 चौमी आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे महाबळेश्वर, माथेरान यासारख्या उंच टापूत आढळणार्‍या वनस्पती येथे …

Read More »

नागपुरात नितीन गडकरींचे शक्तिप्रदर्शन

मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी विविध जागांवर जवळपास सर्वच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे उमेदवारही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याच्या सोमवारच्या (दि. 25) शेवटच्या दिवशी दिग्गज उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री …

Read More »

बांधपाडा ग्रामपंचायतीमध्ये ‘कमळ’ फुलले

जेएनपीटी, उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण तालुक्यात भाजपची घोडदौड सुरूच असून, सोनारीपाठोपाठ महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या बांधपाडा (खोपटे) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपच्या सरपंचपदाच्या उमेदवार विशाखा प्रशांत ठाकूर यांनी तिरंगी झालेल्या लढतीत सर्वाधिक मते मिळवून बांधपाडा ग्रामपंचायतीवर स्वबळावर ‘कमळ’ फुलविले आहे. 11 सदस्यपदांसाठी प्रभाग क्रमांक 1 ते 4मधून भाजपचे …

Read More »

रायगड जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला यश

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप व मित्रपक्ष शिवसेनेने चांगले यश प्राप्त केले आहे. श्रीवर्धन तालुक्यात दांडा, मारळ, काळींजे, वेळास या चार ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला. उरण तालुक्यातील बांधपाडा (खोपटे) ग्रामपंचायतीतही ‘कमळ’ फुलले; तर पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ ग्रामपंचायतीत भाजप-शिवसेना युतीची सरशी झाली आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल …

Read More »

विन्हेरेत पिसाळलेल्या कुत्र्याचा बालकांवर हल्ला

महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यातील विन्हेरे गावात घरासमोर खेळत असलेल्या लहान बालकांवर पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि. 25) घडली आहे. या हल्ल्यात तीन मुले जखमी झाली आहेत. त्यांच्यावर विन्हेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर महाड ट्रामा केअर सेंटरमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी …

Read More »