Breaking News

Pravin Gaikar

श्रीक्षेत्र महड येथील पथदिवे बंद

खोपोली : प्रतिनिधी – अष्टविनायकापैकी एक असलेल्या खालापूर तालुक्यातील महड येथील वरदविनायकाचे मंदिर आहे. येथील मुख्य कमानीपासून मंदिरापर्यंतचे पथदिवे बंद आहेत. मंदिराच्या परिसरात मुख्य रस्त्यावर स्वागत कमान आहे. तिथूनच पथदिवे लावण्यात आलेले असून, सद्यस्थितीत ते बंद आहेत. महड हे खालापूर नगरपंचायत हद्दीत असल्याने मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे, मात्र …

Read More »

रान अळंबी बाजारात दाखल

माणगाव : प्रतिनिधी – पावसाळ्यात उगवणार्‍या रान भाज्यांपैकी खवय्यांची पसंती असलेली रान अळंबी बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. भूछत्रसारख्या असलेली ही अळंबी पावसाळ्यातील ठराविक दिवसांतच उगवते. त्यामुळे या अळंबीला बाजारपेठेत चांगली मागणी असते. पावसाळ्यातील विशिष्ट दिवसांत रानात उगवणारी अळंबी रुचकर असते. त्यामुळे खवय्यांची या अळंबीला पसंती असून, अनेक जण तिची …

Read More »

मुरूडमध्ये पोलिसाने केली कोरोनावर मात; सहकार्यांकडून जोरदार स्वागत

मुरूड : प्रतिनिधी – कोरोनाचा सामना करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग तसेच प्रशासनातील विविध घटक अहोरात्र मेहनत घेत आहेत, मात्र यातील काही योद्द्यांना कोरोनाने आपल्या विळख्यात ओढले आहे. अशाच प्रकारे मुरूड पोलीस ठाण्यातील शिपाई परेश म्हात्रे यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना पनवेलमधील कोविड केअर सेंटर तसेच मरोळ (मुंबई) येथील सेवन …

Read More »

रायगडात रुग्ण संख्या 12 हजार पार

पाली : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना वेगाने फोफावत असून, बघता बघता जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्येने 12 हजारांचा टप्पा पार केला आहे. याबरोबरच जिल्ह्यातील मृत्यूदरदेखील वाढत असून गुरुवार (दि. 23)अखेर कोरोनाने 323 जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्याची चिंता दिवसागणिक वाढत आहे. अशात जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे सात हजार 960 …

Read More »

वाहनचालकास लुटणारे गजाआड; पनवेल शहर पोलिसांची कारवाई

पनवेल : वार्ताहर – पनवेल शहरालगतच असणार्‍या उड्डाणपुलावर एका रुग्णवाहिका चालकाला लुटणार्‍या अज्ञात आरोपींना पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखे पथकाने गजाआड केले असून त्यांच्याकडून दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर या टोळीतील आरोपी हे उरण येथील असून तेथील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. यातील एका आरोपीवर …

Read More »

पनवेल तालुक्यात 220 नवे कोरोनाग्रस्त

12 जणांचा मृत्यू; 186 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि.23) कोरोनाचे 220 नवीन रुग्ण आढळले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे तर 186  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत 171 नवीन रुग्णांची नोंद झाली असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर 151 रुग्ण बरे …

Read More »

सोने दरवाढ दिलासादायक

कोरोनाच्या या भीषण संकटकाळात सतत कानावर आर्थिक मंदीचीच चर्चा येत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या सातत्याने वाढत चाललेल्या किंमतींनी भारतीयांचे चेहरे उजळले आहेत. गंमत म्हणजे कोरोनामुळे निर्माण झालेली पराकोटीची अनिश्चितता हेच सोन्याच्या या किंमत वाढीचे प्रमुख कारण आहे. जोवर कोरोनाला अटकाव करणारी लस बाजारात येत नाही तोवर अवघी अनिश्चितता …

Read More »

मुरूड समुद्रकिनारी कचर्याचे साम्राज्य

मुरूड : प्रतिनिधी – मुरूड समुद्रकिनारी कचर्‍याचे साम्राज्य झाले असून, समुद्राच्या जोरदार भरतीमुळे समुद्रातील कचरासुद्धा मोठ्या प्रमाणात किनार्‍यावर आला आहे. त्यामुळे जिथे पहावे तिथे कचराच कचरा दिसत आहे कोरोना विषाणूमुळे संचारबंदी असल्याने सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ मुरूड या ठिकाणी पर्यटक येत नसल्याने समुद्रकिनारे सुनसान झाले आहेत, परंतु स्थानिक नागरिक या ठिकाणी येत …

Read More »

कोविड योद्धे बनून काम करा : रामदास आठवले

पाली : प्रतिनिधी – कोरोनाच्या जैविक महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. आपल्या राज्यासह देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. ते पाहता सर्वांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या. नियम पाळा व कोरोनाला टाळा तसेच या संकटात कोविड योद्धे बनून काम करा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय …

Read More »

अवैध दारूविक्री करणार्यांना अटक

पेण, माणगाव ः प्रतिनिधी – विनापरवाना दारूविक्री करणार्‍या पेण आणि माणगावमधील दोन वेगवेगळ्या व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यांवर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पेण तालुक्यातील वाशी येथे कोणत्याही प्रकारचा विदेशी दारूविक्रीचा परवाना नसताना एकूण 9970 रुपये किमतीची विदेशी दारू बेकायदेशीररीत्या स्वतःजवळ बाळगून विक्री करताना आरोपी आढळून …

Read More »